पैश्याबद्दल बोलू काही…

Written by

नमस्कार मित्रांनो,

आज मी माझा पहिला ब्लॉग लिहायचा असे ठरवले. बराच विचार केला की कोणत्या विषयावर लिहावे. सरतेशेवटी असे ठरवले की सर्व सामान्य मराठी समाजाला ज्याचा काहीतरी उपयोग होईल असे काही तरी लिहावे. मग मे विचार करायला लागलो की असे कोणते क्षेत्र आहे जिथे मराठी माणूस कमी पडतोय, तर सर्व प्रथम डोळ्यासमोर आले ते आर्थिक क्षेत्र.

आर्थिक दृष्ट्या मराठी manus इतर समाज पेक्षा बराच मागे असलेला दिसतो. याचे कारणे शोधायचं झालं तर सर्वात महत्वाचे कारण असते आर्थिक साक्षरता चा अभाव. खासकरून ग्रामीण भागात. ग्रामीण भागात कष्ट करण्याला लोक कुठेही मागे नाहीत पण मग आर्थिक दृष्टा ते मागे का राहतात बरे ? याचे कारण म्हणजे पैश्याचा पाहिजे तसा विचार करण्याचा अभाव.

आर्थिक भान, आर्थिक साक्षरता निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी खूप अवघड , समजायला कठीण गोष्टीच करायला पाहिजे असे काही नाही. अगदी साध्या छोटय्या छोटया गोष्टींमधून ही खूप काही साध्य करता येऊ शकते.

मला स्वतःला आर्थिक विषयावर रस आहे. याचा कुठेतरी सर्व सामान्य बंधू बहिणी ला फायदा करून देता येईल का ह्या साठी मांडलेला हा प्रपंच.

चला तर मग आजपासून आपण ह्या आर्थिक पैलूंचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करुया. तुमचे काही अभिप्राय असतील तर नक्की कळवा. आर्थिक दृष्ट्या कोणत्या विषयावर लेख पाहिजे असतील तर ते ही कळवा. मी त्यावर लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेल.

टीप : मी मान्यता प्राप्त फिनान्सिअल advisor नाहीये. आर्थिक साक्षरता वाढवणे हेच लेखाचं कारण .

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत