पैसा आणि नात्यातील वितुष्ट….

Written by

प्रज्वलला त्याच्या वाहिनीचा फोन येतो… त्यांच्यातील संभाषण आणि पैसा, नाती आणि त्यामुळे नात्यातील वितुष्ट याची कथा पुढील प्रमाणे..

प्रज्वल फोन उचलतो :- हॅलो..

वहिनी :- मी बोलतेय वहिनी नागपूर वरून.. ओळखलं नाही का?

प्रज्वल :- असं कस वहिनी.. आवज ओळखला मी. पण नंबर अनोळखी आहे हा.. बदलवला का पुन्हा नंबर.

वहिनी :- हो, तो जुना देखील सुरु आहे हा सुद्धा घेतला.

प्रज्वल :-कशा आहात? बऱ्याच दिवसांनी आठवण आली माझी?

वहिनी :- असं काही नाही.. आम्हाला नेहमीच आठवण येते. आज म्हंटल आपणच फोन करावा. तू तरफोन करतच नाहीस.

प्रज्वल :-कामाचा व्याप वाढलाय वहिनी, सुट्ट्या देखील मिळत नाही. त्यामुळे तिकडे येन देखील झालं नाही.. आणि फोन करायला देखील सवड नाही.

वहिनी :- बर बाबा.. तुम्ही आता मोठे झाले, पैशेवाले, आम्हा गरीबाची आठवण कशी येणार न तुम्हाला? वहिनी कशी आहे?  अडचणीत आहे का?  असं विचारायचं तरी.

प्रज्वल :-काय झालं वहिनी काही अडचण आहे का? माझी काही मदत होईल का? सांगा मला.

वहिनी :- कस सांगावं तुम्हाला, मदत तर हवी होतीच. पण तुम्ही म्हणाल, “वहिनीला गरज होती म्हणून फोन केला ” असं म्हणाल.

प्रज्वल :- सांगा आता काय झालं व कशी मदत हवी आहे?

वहिनी :- जरा पैसे हवे होते.. घर बांधायचं म्हणतोय. तर लोन मंजूर होईपर्यंत मिळाले असते तर…. (जरा कचरतच वहिनी बोलल्या )

प्रज्वल :- अच्छा. किती हवे होते..?

वहिनी:- एक लाख मिळाले असते.. सध्याचे तर….

प्रज्वल :- आहेत माझ्याजवळ तेव्हडी सेविंग. आणि मला तिकडेच यायचं देखील होती. तर येतो मी रविवारी… काय वहिनी इतकीशी गोष्ट आणि तुम्ही मला परकं करून टाकलं.

प्रज्वल शिक्षणासाठी नागपूरला होता तेंव्हा होस्टेलवर नंबर लागून देखील याच वहिनींनी त्याला घरी नेलं होतं. स्वाताच्याघरी ठेऊन त्याला शिक्षण पूर्ण करायला लावल होतं. जेवणाचा खर्च देखील घेतला नव्हता त्याच्या कडून. या वहिनी म्हणजे त्याच्या आतेभावाची बायको. प्रज्वलला मात्र ती आईसारखी वाटायची. त्यांचे मुलं प्रज्वल पेक्षा 4-5वर्षांनी लहान असेल. त्यामुळे वहिनी नात्याने असल्या तरी आई इतकाच आदर त्याच्या मनात होता. शिवाय आपण त्याच्या घरी राहून शिक्षण घेतलं, त्या उपकाराची जाणीव देखील होती त्याला.. म्हणूनच वहिनींनी पैसे मागितले तर प्रज्वल नाही म्हणू शकला नाही. आणि बऱ्याच दिवसाची भेट नाही झाली तर त्या निमित्ताने भेट होईल सगळ्यांशी म्हणून प्रज्वल स्वतः पैसे घेऊन वहिनींकडे गेला.

वहिनींनी आणि आतेभावाने … त्याला आश्वासन दिले की “आमचं लोन मंजूर झालं की पहिले तुझे पैसे परत देऊया ”

प्रज्वल म्हणाला.. मला सध्या गरज नाही पैशांची… सवडीने करा परत.

झालं….. पैसे दिल्याने प्रज्वल बद्दल जरा जास्तच जिव्हाळा निर्माण झाला वाहिनीच्या मनात. सवडीने परत करा म्हंटल्यावर तर त्याना हायस वाटलं. आणि इकडे प्रज्वल देखील आपण काहीप्रमाणात का होईना आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड केली.. मदत करून म्हणून रिलॅक्स होता.

अशातच दोन वर्ष झालीत, वाहिनीच घर बांधून.. झालं,. मुलीचं लग्न देखील झालं. पण त्यांनी स्वतःहुन कधीच पैसे देण्याचं नाव घेतलं नाही.  प्रज्वलला देखील गरज नव्हती म्हणून तो देखील त्या पैशाविषयी बोलला नाही.

त्याला कार घ्यायची होती.. आणि आपलेच तर पैसे आहेत वहिनींकडे, मागून घ्यावे म्हणून त्याने वहिनीला कॉल केला. “वहिनी मी कार बुक करतोय तर मला मी दिलेले पैसे परत मिळाले तर बर होईल. म्हणजे मला इनकॅश कार घेता येईल.

वहिनी :- अरे प्रज्वल.. दिले असते रे पण सोनूचं लग्न झालं नुकतंच.. तू तर बघितलंस किती मोठ सासर मिळालं तिला, त्यांच्या बरोबरीने मानपान करता करता आणखी कर्ज घेऊन बसलो आम्ही. आता तर जमणार नाही. आणि इनकॅश घेतल्या पेक्षा हप्ते भर ना कारचे. मी जमले तशे परत नक्की करीन. बर प्रज्वल ठेवते फोन. सोनूच्या सासरचे येत आहे, तयारी करायची आहे.. बाय…

इतकं बोलून वहिनींनी फोन ठेवला देखील, प्रज्वल काय म्हणतोय हे देखील ऐकून घेतलं नाही.

प्रज्वलला वाटलं, नवीन नवीन लग्न झालं मुलीचं, पाहुणे येत असतील तर गडबडीत असतील म्हणून फोन ठेवला वहिनींनी. पण या सगळ्यात मात्र त्याची पैशाची नड जशीच्या तशी होती. वहिनींकडून पैसे मिळणार नाही म्हणून तो दुसरीकडून त्याची तजवीज करू लागला. पैशांची जुळवाजुळव करून त्याने त्याच स्वप्न.. फोर व्हीलर घेण्याचं पूर्ण केल.

वहिनीला वाटलं याच्या कडे तर भरपूर पैसे आहे, म्हणूनच याने शेवटी कार घेतलीच.

या सगळ्यात आणखी दोन वर्ष गेलीत. म्हणजे प्रज्वलने पैसे देऊन आता चार वर्ष होतं आली होती.. त्या पैशाला जर बँकेत ठेवलं असत किंवा व्याजाने दिले असते तर आज किती पैसे मिळाले असते प्रज्वलला?? 🤔🤔 तो मात्र साध्यापनात राहिला. देतील त्यांच्याजवळ होईल तेंव्हा, आपलेच नातेवाईक आहेत असं म्हणून त्याने  त्याकडे दुर्लक्ष केल.

वर्ष होतं आल… आणि प्रज्वलच लग्न देखील ठरलं. बाकी सगळी अरेंजमेंट झाली होतीच. आता वाहिनीने जर पैसे दिले तर बायकोच्या अंगावर चार दागिने जास्त घालता येईल असा विचार तो करत होता.त्यामुळे त्याने पुन्हा विचार केला फोन करण्याचा. पण लगेच लक्षात आल.. यावेळी स्वतः जाऊनच मागावे पैसे तसेही आता बरीच वर्ष होतं आली, आपण त्यांच्या अडचणीत कामी आलो न. मग आता ते स्वतः तर कधी म्हणतं नाहीच की “तुझे पैसे घेऊन जा ” आणि मागे अडचणीत असतांना मी मागितले तरी देखील दिले नाही. याचा सर्व विचार करून प्रज्वल वहिनींकडे गेला..

वहिनींकडे गेल्यावर… प्रज्वलच स्वागत झालं “अरे आज सूर्य पश्चिमेकडून उगवला का?  आज कस काय घर दिसलं तुम्हाला.. ”

वहिनींनी पाणी दिल, चहा नाश्ता दिला.. प्रज्वल मात्र त्यांच्या या शब्दांचा विचारच करत राहिला. थोडं रिलॅक्स झाल्यावर प्रज्वल म्हणाला ” वहिनी…. दादा नाही आले अजून?  मला जरा पैशाचं बोलायचं होतं. लग्न ठरलंय न माझ. तर मी दिलेले पैसे परत मिळतिल तर बर होईल. ”

वहिनी :- हो कळलं आम्हाला लग्न ठरलं ते. तू तर कार घेतलीस, स्वतःचं घर देखील बांधलस मग लग्नासाठी पैसे नाहीत का तुझ्या कडे?

प्रज्वल :- सगळी अरेंजमेंट झाली आहे.. बस दागिने तेव्हडे राहिले. तुम्ही दिले पैसे तर जरा चार दागिने जास्तच टाकता येईल. शेवटी माझी बायको शोभायला हवी न.

वहिनी :- काय सोन्याच्या दागिन्यांचं घेऊन बसलाय. आता काय जमाना राहिला का सोन घालून मिरवण्याचा. चोरीला गेले दागिने तर अट्याक येऊन मारायची वेळ येते. ते गोल्ड प्लेटेन्ट का काय म्हणतात तेच का नाही घेत. खर्च कमी व हरवले किंवा चोरीला गेले तरी वाईट वाटत नाही.

प्रज्वलला वाहिनीच्या बोलण्याचा रोख कळला.. याचा अर्थ त्यांना याचे पैसे परत द्यायचे नव्हते तरी देखील तो पुन्हा हिम्मत करून म्हणाला “वहिनी माझी नोकरीं, घर, गाडी हे सगळं बघता मी जर गोल्ड प्लेटेन्ट दागिने घातले तर काय इज्जत राहिल माझी. लग्नाला अजून तीन महिने बाकी आहेत. तो पर्यंत तुम्ही मला पैसे द्या काही माझ्याजवळचे टाकून मी सोन्याचेच दागिने बनवणार बायकोसाठी. मी कधी येऊ पैसे घ्यायला ते सांगा ”

वहिनी :- इतकी मोठी रक्कम तर या तीन महिन्यात जुळवणं शक्य नाही. दहा, वीस हजार जमतील ते देईल मी घरीच आणून. त्याच्यावर काही माझ्यानी जमणार नाहीत.

आता मात्र त्याचा संताप खुप वाढला होता. वाहिनीच्या एका कॉलवर याने तिला कुठलाही विचार न करता. एक लाख रुपये दिले.  “लोन पास झाल्यावर तुझे परत करू या बोलीवर ” पण त्या गोष्टीला आता पाच वर्ष होतं आली. मुलीचं लग्न देखील केल यांनी. आणि मला म्हणतेय की नकली दागिने घाल बायकोच्या अंगावर.

त्यांच्याकडे शिक्षणासाठी राहिलो म्हणून हे असं करत असेल का?? 🤔 आपल्या आईच्या वयाच्या आहेत, यांना उलट तरी कस बोलाव म्हणून सगळा राग मनात ठेऊनच तो म्हणाला. “दहा, वीस हजारानी काय होणार वहिनी, मला पूर्ण हवे होते, बघा जमवून तीन महिन्यात. ”

वहिनी :- नाही जमणार, दहा, वीस हजारच जमेल. ते घेऊन जाल मी कॉल करेल.

आता मात्र प्रज्वलला स्वतः किती मूर्खपणा केला आपण याचा विचार येत होता. “या बाईच्या एका कॉलवर आपण इतकी मोठी रक्कम हिच्या घरपोच आणून दिली, अडचणीत मागितली तरी नाही दिली. आणि आता चक्क तोंडावर म्हणतेय जमणार नाही. म्हणजे यांची अडचण मी भागवली पैशाची, आणि मी माझेच मागतोय तर चक्क तोंडावर नाही म्हणतं आहे.

काय समजतं होतो मी यांना, माझं शिक्षण यांच्या कडे झालं तेंव्हा पैसे देत होतो राहण्या.. खाण्याचे तर एकही पैसा घेतला नाही. देवमाणूस आहेत असं वाटायचं मला. आणि गोड बोलून इतकी मोठी रक्कम घेतली तीही परत करण्याच्या बोलीवर आणि आज नाही म्हणताय..

याच रागारागात जास्त वाद न घालता तो तिथून निघून आला. त्यानंतर तीन महिने झाले, लग्नाचा दिवस आला तरी देखील त्याचे पैसे त्याला वाहिनीने आणून दिले नाही. याने देखील पैशाची तजवीज करून बायकोला सोन्याचेच दागिने घातले लग्नात आणि लग्न देखील थाटामाटात केल.

लग्नात आल्यावर त्याच वाहिनी पुन्हा याला बोलल्या “पैसे तर होते तुझ्याकडे मग मला कशाला मागितले.. सोन्याने पिवळी दिसतेय तुझी बायको ”

लग्नात येउन देखील ही बाई अशी बोलतेय.. याचा विचार आला त्याला. आणि नात्याला महत्व नाही तर फक्त पैशाला आहे. हे देखील कळलं. पैसा असला तर नातेवाईकांचा गोतावळा सभोवताल  असतो. आपण त्यांची मदत केली तर आपणही गोड असतो. मात्र आपल्याला गरज असली तर आपलेच पैसे अपल्याला मिळणे कठीण होते.

त्या दिवसापासून आज दोन वर्ष झालीत,  प्रज्वलने वहिनीला कॉल केला नाही किंवा पैसे मागितले नाही, आणि त्या देखील इतक्या हुशार की त्यांनी पुन्हा पलटून याला पैसे परत देण्याची गोष्ट केली नाही. उलट नातेवाईकांमध्ये सांगितलं “माझ्या कडे राहून शिकला पण लग्न झालं तर एक दिवस नाही आला घरी. उपकाराची जाणीवच नाही आजकालच्या मुलांना ”

हे शब्द जेंव्हा त्याला कळले तेंव्हा त्याचा विश्वास नाते व नातेवाईक यांच्यावरून उठला… आणि पैसा दिला  तरच नाते टिकतात आणि परत मागितले तर नात्यात वितुष्ट येत हे देखील पटलं. ते एक लाख..शिक्षणासाठी राहण्याचा व खाण्याचा तेंव्हाचा खर्च म्हणून प्रज्वल ने सोडून दिले..

समाप्त….

खरंच पैसा आणि नाते यांचा मेळ बसवणं कठीण आहे. पैसा नाते जुळवतो तसाच तो नाते तोडतो देखील. कुणीही मदत केली तर त्याची परत फेड नक्की करावी त्याने नाते टिकते, नाहीतर चांगल्या नात्यात वितुष्ट येते.

लेख आवडल्यास like करा, कमेंट करा, शेअर करायचा असेल तर नावासहित करा. माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा. ©जयश्री कन्हेरे -सातपुते फोटो साभार गुगल

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा