पोटचा गोळा फेकून दिला …..!

Written by

मुंबईतल्या रस्त्याच्या बाजूला कुणी, असह्य मातेने आपला पोटचा गोळा फेकून दिला होता. तेव्हा तो रडत होता .त्यामुळे तो एका गिरणी कामगाराने उचलून नेला. त्या कामगाराचं नाव म्हणजेच गंगाराम सुर्वे .काही दिवसांनी बाळ हळुहळु मोठं होऊ लागलं.मग काही वर्षांनी गंगाराम सुर्वेनी त्या मुलाला सांगितले ,आमची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ,आता आम्हाला मुबईत राहणं शक्य नाही .त्यामुळे आम्ही गावाकडे चाललो आहे . तरीसुध्दा हे 10 रुपये घे तुझा रस्ता तु शोध ….
सुर्वेंचं चौथी पर्यंतच शिक्षण झाले असल्यामुळे ते शाळेत शिपाईचं काम करु लागले .नंतर त्यांनी बऱ्याच वर्षांनी म्हणजेच वयाच्या 31व्या वर्षी 7वी ची परीक्षा देऊन पास झाले व नंतर शिक्षक झाले .
नारायण सुर्वे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एक लघुपट निघाला .त्या लघुपटला भारत सरकारचे सुवर्णपदक मिळाले. त्याची सुरवातच अशी आहे .
नाव :- नारायण गंगाराम सुर्वे.
जात :- माहीत नाही.
धर्म :- माहीत नाही.
गाव :- माहीत नाही.
आई वडिलांचं नाव :- पाळलेल्या वडिलांचं नाव गंगाराम सुर्वे.
सुर्वेनी आयुष्यात अनेक कामे केली. गिरणीतला बालमजुर तसेच शाळेतला शिपाई, कॉम्रेड, स्वातंत्र्य चळवळीत लाठी खाणारा तसेच नंतर ते कथा आणि कवितांच्या माध्यमातुन जगभरात जाऊन पोहचले.ज्यांची मराठी अशुद्ध म्हणुन हिणवलं गेलं तेच सुर्वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले.त्याच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणुन भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरवलं .सुर्वे नेहमीच म्हणायचे…..
‘मी जन्माला आलो तेव्हा
काही नाव धारण करून आलो नाही
पण नसेन पृथ्वीच्या पाठीवर तेव्हा
सोडून जाईन एक नाव-
नारायण गंगाराम सुर्वे !’
सुर्वे गेले तेव्हा सरकारी इतमात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .दुसऱ्याच दिवशी उत्तम कांबळेंनी सकाळ पेपर मध्ये लेख लिहला होता की ‘ तिरंग्यातून गेला बाप ‘ ….. – ऋषिकेश पवार

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत