पोट्रेट

Written by

पोट्रेट
– भाग 1 ©®

गुलाबी शहर जयपुर मधे थंडीची नुकतीच चाहूल लागायला सुरुवात झाली होती. राजस्थान मधे भयंकर उकड्या नंतर आलेले हे थंडीचे दिवस सगळ्यानाच सुखावून सोडतात. रंगीबेरंगी स्वेटर्स आणि मफ् लरीत नटलेल शहर बघायला मिळण ही एक आनंदाची पर्वणीच जणू! तरुणांईला तर सारेच ऋतू छान वाटतात. पण खास जिव्हाळ्याचा असतो तो म्हणजे सुखद हिवाळा.

असा हा हिवाळा तिचाही खूप खुप आवडता ऋतू होता. यावर्षी तर थंडी पडण्याची ती अगदी चातका सारखी वाट पहात होती. त्यामुळे थंडीची चाहूल आज लागल्याने सकाळ पासून ती खूप खूष होती. आणि का होऊ नये? थंडी सुरु झाली की तिचा आनंद वाढवणार आणखी एक मोठ कारण असायचं…..ते म्हणजे तिचं बहरलेल फुलांच दुकानं आणि वाढ़लेली कमाई!
एकिकडे तिचं दुकान रंगीत फुलांनी सजायच तर दुसरीकडे तिच्या ‘नीवई’ या छोट्या खेडे गावाजवळच असलेलं गुलाबी शहर जयपूर! या काळात ते पर्यटकांनी गजबजलेल असायचं. फुलांची मागणी वाढायची तशी चार पैसे दर दिवसाकाठी अधिक जमायचे आणि ती त्यांना पुन: पून्हा मोजण्यात हरखून जायची.

आई वडीलांच्या शेतीला त्यांच्या माघारी तिने खूप कष्ट घेऊन हिरवी करुन परत उदरनिर्वाह करण्याचे साधन बनवले होते. तिने त्या दोघांना दिलेली ती एक प्रकारे श्रध्दांजली होती.
शाळेत असतानाच तीच्या आई वडीलांनी दुश्काळात पिकांचे झालेले नुकसान बघून ‘आता कर्जाची परतफेड अशी करायची ?’ या काळजीने आत्म्ंहत्या केली होती.

खेडे गावात आजही माणुसकी जीवंत आहे. शेतकरी आत्महत्या करतो पण त्याला समजून घ्यायला आणि मदत करायला आपण पुढे येऊ शकलो नाही याची सल तिथल्याच गरीबांना पण मनाने श्रीमंत असंणार्या गावकरी मंडळींनाच येते. अश्याच माणुसकी जीवंत असलेल्या आजुबाजुच्या घरांची दारे खुली झाली मग तिच्या साठी, ती मोठी होऊन कमवायला लागे पर्यंत ! तिची शेती त्यांनीच जमेल तशी सांभाळली होती. जी आता तिने फुलांनी सजवली होती.

सुरुवातीला बरीच वर्षं तिने उन्हा तान्हात रस्त्यावर हिंडून फूल विकली. हिवाळा काय तो सुकर असायचा फूल विकायला. तिच्याकडे निवडक ताजी फूल असल्याने लवकर विकली जात आणि संपत असत. नंतर आलेल्या गिर्हाईकांची मन दुखवू नये असं वाटायच तिला. ती मग कमाईतून मिळालेल्या थोड्या पैशांची परत एकदा फूल आणायची गावातल्या इतर शेतकरी संघटनांच्या बांधवांन कडून…जेणे करुन त्यांना ही चार अधिक पैसे मिळोत.
गावाकडची शुध्द हवा जणू त्या सर्वांचे हृदय अगदी साफ ठेऊन होती आजच्या काळात ही!

फुलं न मिळाल्याने नाराज होऊन परतलेल्या तिच्या नेहमीच्या आणि पत्ता दिला तर नव्या ही लोकांच्या घरी ती दुसर्या
खेपेत आणलेली फूलं नेवूंन द्यायची.

अशीच होती ती. काहीशी हळवी. जितकी कष्टाळू तितकीच मनाने कनवाळू. स्वभावाने खुप लाघवी आणि उदार! दिसायला एकदम साधी पण नाकी डोळी अगदी सुबक अन देखणी. खर तर सतत आनंदी असल्याने बहुदा सौंदर्या पेक्षाही प्रसन्नता जास्त वाटायची तिच्याकडे पाहून आणि त्यानेच ती अधिक सुंदर आणि लोभस वाटायची ती! तिच्या दुकानात असलेल्या फुलांशी ती खुप एकरुप झाली होती म्हणुनच प्रसन्न आणि ताजीतवानी असायची. कितीही काम केल तरी न थकता.

एकदा एक नेहमी फूल घ्यायला येणारं वयस्कर जोडपं आलं नाही म्हणून ती त्यांना शोधत त्यांच्या घरी गेली फूल द्यायला. त्यांच्या कडून तिला समजलं की दरवर्षी डिसेंबर महिन्यात जयपूर येथील ‘अलबर्ट महाल’ येथे बरेच कार्यक्रम होतात. आलेल्या विदेशी पर्यटकांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. शहरातील सर्वांना ईथे यायला मग कारण मिळते आणि लोकांची गर्दी होते. त्यावेळी तीची फुलांची विक्री खुप होऊ शकते.
: नीलिमा देशपांडे

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा