प्रतिभेचे तारण..

Written by

एक लेखक दुसरं काय ठेऊ शकतो तारण म्हणून.. माझी प्रतिभा, माझी लेखणी तारण म्हणून ठेवत आहे.. बघा काही जमतंय का?
म्हणाल तर हसवू शकतात माझे शब्द, म्हणालात तर डोळ्यात पाणी देखील आणू शकतात.. बघा काही जमतंय का?
सांगाल तितक्या अलंकारिक रचना, द्याल त्या छंदात जोडून मिळतील.. बघा काही जमतंय का?
नदी, फूल, पाऊस, प्रेम, विरह, संसार इथपासून ते वकील, कर्ज, तारण,वीज,विमा यावरही लिहू शकतो.. बघा काही जमतंय का?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत