प्रत्येकाला सासू हवी… मला सासू हवी भाग 2

Written by

भाग पहिला इथे वाचा..

https://www.facebook.com/581606972323826/posts/644991925985330/?substory_index=0&sfnsn=xwmo

भाग दुसरा… पुढील प्रमाणे..

  ©जयश्री कन्हेरे -सातपुते 

सासू आहे म्हणून…मुलांना सांभाळायला बर आहे…
नवीन आले तेंव्हा सासूबाईंनी सर्व समजावून दिले… त्यांच्या चालीरीती सांगितल्या..

कुणाला काय हवं…. काय नको ते सांगितलं.. आवडीनिवडी….

कधीतरी तर सासूबाईने तुम्हांला दुसऱ्यांसमोर सांभाळलंहीं असेल… हे कुणीच सांगितलं नाही…

आपली आई पण तर वहिनीची सासूचं असते न..तरीही आपली आई खूप छान सासू आहे. असा गोड गैरसमज असतो आपला… कारण ती आपली आई असते न… आणि हीं (सासू )नवऱ्याची आई...
जसं आपण इथे बसून आपल्या सासूचे गाऱ्हाणे सांगतोय न.. तसंच आपली वहिनी… आपल्याच आई विषयी असच काहीतरी बोलत बसली असेल कुठे तरी…. याचा विचार करून कीव येते मला सर्व आयांची…
लग्न करून आपण गेलो तसच आपल्या सासू पण आल्या न त्या घरात… त्या आल्या तेंव्हा त्यांच्या पण सासूने असच सारख्या सूचना देऊन त्यांना सरळ केल असेल…

त्यांच्या पण माहेरची सवय त्यांना मोडावी लागली असेल… मग 35…..38 वर्षाची त्यांची सवय.. त्या सुनेसाठी का बदलवतील…? आणि का बदलावी?

सांगाल का कुणी मला…
सगळ्यां जरा विचारात पडल्या… ?

अग एक उदाहरणं देते… माझ्याच आईच… माझ बाळंतपण झालं… सिझेरियन झालं… इतकी काळजी घेतली माझी... सगळ्यांच्याच आई घेतात. म्हणूनच बाळंतपणाला मुलीला माहेरीच जातात…. सासरी जाताना पण आईने समजावून सांगितल ” हे बघ जास्त काम करायचे नाही… बाळाला आधी बघायच…बाकीच होत राहील नंतर...उशीर झाला तरी चालेल ” यात माझ्याविषयीची व बाळाची काळजीच होती…
जेंव्हा तीच माझी आई सासू बनली व माझ्या वहिनीच बाळंतपण आलं.. वहिनीला आई नाही त्यामुळे बाळंतपण इकडेच केल…नॉर्मल झालं बाळंतपण… तीन महिने होत नाही तेच माझी आई “आम्हाला पण 3मुलं झाली… आम्ही एक महिन्यात कामाला लागलो..” बाळाला घेतलं वहिनींनी व जरा कामाला उशीर झाला कि लगेच… “काय ग किती वेळ झाला हे काम नाही झालं अजून.. फक्त बाळाला घेऊन बसतेस…” असं माझी आई वहिनीला म्हणते. हा फरक असतोच ग आईसासू मधे…
तो सुनेलाच जाणवतो…. म्हणून आपण सुना सासूची बुराई करतो व आईला छान म्हणतो...
सगळ्यां सासू वाईट नसतात ग… कारण त्या पण कुणाची तरी आई असतात..त्यांच्यासोबत जो भेदभाव होत आला तोच त्या आपल्यासोबत करतात…
चला आपण शपथ घेऊया कि आपल्या सुनांना मुलीसारखं वागवू.. मुलीत व सुनेत भेदभाव नाही करु..
परंपरेने चालत आलेलं वागणं कुठेतरी बदलायला हवं असं मला वाटते…सुरुवात आपणच करूया.. काय म्हणताय सखींनो…

हो.. ग… वकिलीणबाई पटलं आम्हाला…. घेतोय आम्ही शपथ…. “सगळ्या एकसाथ म्हणाल्या…

नेहा :-जयश्री नशीबवान आहे कि हिची सासू, हाच विचार करतेयस मी… ?

रेखा :-जयश्री तुझी सासूचं नशीबवान आहे. इतका विचार करणारी सून मिळाली त्यांना…

प्रीती :- अग जयश्रीची सासूच चांगली असेल समजदार… म्हणून हीं सासूला छान म्हणतेय व स्वतःच्या आईची  सासूसोबत तुलना करतेय…
खरंच वाटत तुम्हाला मी नशीबवान आहे…..

नाही ग माझं नशीब इतकं पण चांगलं जितकं तुम्हाला वाटते...

सासू -सुनेचं नातं मी अनुभवलच नाही... पण शेजारणीच्या सासूविषयीच्या गोष्टी(गाऱ्हाणे ) ऐकल्यावर मी समजवायला गेले ….”नका बोलत जाउ सासू विषयी वाईट ” तर  म्हणतात.. ” तुला काय जात ग सांगायला… तुला सासूचं नाही… “ तेंव्हा फार वाईट वाटते ग मला…..

ज्यांच्या जवळ जे असते त्याची किंमत नसते म्हणतात न तेच खरं आहे.. मला सासू नाही… पण माझ्या आईच्या वागण्यातून मला सासू व आई मधला फरक जाणवला… मी नेहमी माझ्या वाहिनीचीच बाजू घेते….कारण मी सासू नसलेली सून आहे… माझी आई पण छान आहे वाहिनीची काळजी घेते… पण मुली इतकी नाही….

सर्वच सासू वाईट नसते ग….. म्हणून मी नेहमी म्हणते “मला सासू हवी “

स्वाती :- चल मग जयश्री एक कविता होऊन जाउ दे तुझी  “मला सासू हवी “ वर

हो तर का नाही  पण तुम्हाला माझा राग तर नाही आला न ग…

रेखा :- नाही ग उलट माझा दृष्टिकोन बदलला सासू कडे बघण्याचा..  मीच स्वतःला बदलवीन सासू मधली आई जागी करण्यासाठी…
हो ग जयश्री तू छानच सांगितलं आम्हाला कुणालाच वाईट नाही वाटल… सगळ्या म्हणाल्या..

स्वाती :-चल ग तुझी कविता राहिली न….आता हिची कविता आजच्या आपल्याला मैफिलीचा समारोप करेल… काय… ग… आता Next गेटटुगेदरलाच ऐकायला मिळेल मग जयश्री ची कविता एका नवीन विषयावर…. ???????????????सगळ्या हसायला लागल्या…

बर…बर…नीट लक्ष देऊन ऐका..  शब्दबद्ध करण्याचा माझा प्रयत्न…माझ्या अनुभवातून.. सासू नसलेल्या सुनेच्या बर का… ऐका तर मग 

     “सासूबाई
आहे ज्यांना सासू
त्या ओरडत असतात, ?
नाही ज्यांना सासू
त्या मात्र रडतात….?

गेलो आपण समजवायला कि
लगेच आपल्यावर चढतात,
तुला काय जात बोलायला
तुला नाही सासू असंच म्हणतात…..??

त्यांना तरी कुठे कळते, सासूविना
घर म्हणजे बशीविना कप असतो,
सांडला जर चहा त्याला
वाचवायला कुणीही नसतो…..??

मुलं झाल्यावर कळत
याची आजी हवी होती,
कशीही का असेना मला
माझी सासू पाहिजे होती…. ??

मीही असते भांडले,
रागावले सुद्धा असते, ??
सासू सुनेचे नाते निदान
अनुभवले तर असते….??

मी सुद्धा गाऱ्हाणे तुमच्या
जवळ सांगितले असते,
कडू गोड आठवणींना
मनात माझ्या साठवले असते…..??

ऐकलं सगळ्यांकडून मी
सासू ही सासूच असते,
त्या सखींन सारखं सासुरवाशीण पण
मी देखील अनुभवले असते….??

का?  सासूबाई तुम्ही
घाई केली जाण्याची,??
कशी बसवू घडी नीट मी
तुमच्याच या संसाराची,.….??

आई तुम्ही का घाई केली
आम्हांला सोडून जाण्याची. ?????

    कविता ऐकून सगळ्यांचे डोळे पाणावले..
व सगळ्याजणी ????????
????????
पाणावलेल्या डोळ्यांनी आमच्या गेटटुगेदरचा समारोप झाला…
बदलेल कुठेतरी नाते सासू -सुनेचं,
या अपेक्षेने आमची पावलं…
आपापल्या घरा कडे वळली,

पण माझी ओंजळ मात्र कधीच नाही भरली….

रित्या ओंजळीने मी देखील परतली,

सासूबाईंच्या आठवणीने पुन्हा एकदा मी मुसमुसली ?

मला सासू हवी ” असच पुन्हा एकदा म्हणाली… ????????

लिहायचं म्हणून नाही पण खरंच
सासू -सुनेचं कडू गोड नातं
मला अनुभवायच होत…
सासूबाई तुम्ही असायला हवं होत ?????????
हा लेख व कविता माझ्या स्वर्गवासी सासूबाईंना समर्पित… स्व. पूर्णाबाई बाबुरावजी सातपुते ???
हा लेख बराचसा सत्यघटनेवर आधारित आहे.. आशा करते आपल्याला आवडेल….? ?©जयश्री कन्हेरे -सातपुते
वाचकांनो माझा लेख लिहिण्याचा उद्देश फक्त माझे विचार तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा आहे… त्यातून जर खरंच बदल घडत असेल तर मला फारच आनंद होईल…  तुम्हाला माझा लेख आवडल्यास like करा… तुमच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहे मी… नकारात्मक प्रतिक्रियेच  सहर्ष स्वागत आहे…कंमेंट बॉक्स मधे कमेंट नक्की द्या… माझे लेख ?वाचण्यासाठी? मला फॉलो करा.. व आवडल्यास माझ्या नावासकट शेअर करा… सर्वांचे मनापासून आभार….. ?©जयश्री कन्हेरे -सातपुते ?

फोटो साभार गुगल.. ?

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा