प्रत्येक मराठी माणसाने जापनीज लोकांकडून शिकावे हे तंत्र

Written by

IKIGAI हा शब्द कधी ऐकलाय??  नुकतेच मी एका ऑस्ट्रेलियन कंपनीचा एक इ-लर्निंग प्रोजेक्ट पूर्ण केला, त्यात त्यांना IKIGAI बद्दल आपल्या कामगारांना प्रशिक्षण द्यायचे होते. हा प्रोजेक्ट करत असतांना खूप सुंदर अशी माहिती मला मिळाली, आणि सर्व स्त्रियांनी या माहितीचा उपयोग करून घ्यावा असं मला मनापासून वाटतंय… जपान मध्ये घडलेली घटना, एक स्त्री कोमात असतांना आपल्या शेवटच्या घटका मोजत होती..ती स्वर्गात गेली, तिला एक आवाज आला,  “तू कोण आहेस??” तिने उत्तर दिले, “मी एका अमुक अमुक ची बायको आहे” “मी हे नाही विचारलं की तू कोणाची बायको आहेस, तू कोण आहेस?” “मी 4 मुलांची आई आहे” “मी हे नाही विचारलं की तू कोणाची आई आहेस, मी विचारलं तू कोण आहेस??” “मी एका शाळेत शिक्षिका आहे” “तुझा व्यवसाय नाही विचारला मी, मी म्हटलं की तू कोण आहेस??” त्या स्त्रीच्या कुठल्याही उत्तरावर तो आवाज समाधानी नव्हता, मग असे अनेक अटेम्प्ट झाले, मग शेवटी ती म्हणाली, “मी अशी एक स्त्री आहे की जीची सकाळ सुरू होते ती कुटुंबाचं पालनपोषण करण्यात आणि रात्र होते ती शाळेतील मुलांचं भविष्य घडवण्यात…” या उत्तराला मात्र तो आवाज थांबला, तथास्तु म्हणाला…आणि त्या स्त्रीचे चमत्कारिक पणे मृत्यूच्या दारातून जीवनाच्या दारात पुनरागमन झाले, ती कोमातून बाहेर आली…आणि तिचं दैनंदिन जीवन पुन्हा एकदा सुरू झालं… Ikigai ची ही मूळ कल्पना या गोष्टीतून जन्माला आली असे म्हणतात.. मग ikigai म्हणजे काय?? तर आपला स्व शोधणे, आपल्या अस्तित्वाची ओळख पटणे, आपल्यातला मी शोधणे… कोणी आपल्याला विचारले की “तू कोण आहेस?” काय उत्तर असेल आपलं?? मी गृहिणी आहे, अमक्याची बायको, तमक्याची सून, तमक्याची मुलगी, अमक्याची आई…यापलीकडे आहे काही उत्तर?? अध्यात्मिक दृष्टीनेही आपल्याला आपला स्व ओळखणे महत्वपूर्ण आहे, याच स्व ची ओळख करून घेण्यासाठी कित्येक अध्यात्मिक साधू वर्षानुवर्षे तपश्चर्या करतात…इक्बाल चित्रपटात एक डायलॉग आहे…”भगवान ने हर किसीं को एक काम करणे के लिये दुनिया मे भेजा है, जो ये पेहचानता है वही आगे जाता है…” जगातल्या सर्व मोठ्या लोकांनी आपले ikigai शोधून काढले होते…आणि म्हणूनच ते यशस्वी झाले.. मग हेच आपल्याला शोधायचे आहे आज… कागद पेन घ्या आणि माझ्यासोबत लिहायला सुरुवात करा… दिलेल्या चित्रात तुम्हाला 4 गोल दिसताय, त्या प्रत्येकात आपले कौशल्य लिहून त्या सर्वांचा मध्य आपल्याला काढायचा आहे..

1.सर्वप्रथम एक गोल काढा, त्यात लिहा की “तुम्हाला काय करायला खूप आवडते”

उदा. चित्रकला, लिखाण, डान्स वगैरे

2. आता दुसऱ्या गोलात लिहा की “तुम्हाला काय उत्तम जमते”

मग मागे लिहिलेल्या उदा. मधून असे पर्याय निवडा की त्यात तुम्ही पारंगत आहेत. दोन्ही गोलातील मॅच होणारे कौशल्य लिहा…

3. तिसऱ्या गोलात लिहा की “तुम्हाला यापैकी कोणत्या गोष्टींमधून पैसे मिळू शकतात किंवा कमाई होऊ शकते?”

मग पुन्हा मागील निवडलेल्या कौशल्यातून पुन्हा असे गाळून काढा.

4. आता लिहा की “जगाला किंवा समाजाला काय हवे आहे? कशाची गरज आहे??” उदा. जगाला मनोरंजन हवे, उत्तम साहित्य हवे इत्यादी..

आता या चारही गोलातील कॉमन असे कौशल्य शोधा..म्हणजेच आपले ikigai शोधा…  हेच ते की त्यासाठी आपला जन्म झालाय.. हेच ते ikigai जी आपली ओळख आहे… Ikigi अशी गोष्ट आहे की ज्यात कमाईचा मार्गही आहे, जे जगाला पाहिजे आहे, जे आपल्याला आवडतं आणि आपण त्यात तरबेज आहोत…या दोन वर्तुळातील सामाईक गोष्टींनाच पॅशन, मिशन, प्रोफेशन आणि व्हॅकेशन म्हटले जाते…

नोकरी करणारे नवरे किंवा आपण स्वतः कितीदा कंटाळलो आहे आपल्या नोकरीला किंवा कामांना?? कारण आपण ते करतोय ज्यात आपणाला आवड नाही, ज्यात आवड आहे ते करत नाही, जे करतोय त्यातून कमाई नाही आणि ज्यात कमाई आहे ते आपण ओळखलेच नाही… विराट, धोनी…यांना कधी आपल्या कामाचा कंटाळा आलाय का हो?? नाही, कारण त्यांनी ते केले ज्यात त्यांना आवडही आहे, जे जगालाही हवे आहे, ज्यात ते निपुनही आहे आणि ज्यातून कामाईही होते आहे… चला तर मग, पटापट आपला ikigai शोधा आणि कॉमेंट मध्ये सांगा मला….

Article Tags:

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत