प्रबळ इच्छाशक्ती

Written by

गायत्री एक हुशार मुलगी. घरात अठरा विश्व दारिद्र्य. वडील दारू प्यायचे. मोठा एक भाऊ आणि दोन बहिणी. दोघी बहिणींची लग्न झालेली. भाऊ बारावी पास होऊन एका किराणा दुकानात नोकर म्हणून काम करायचा. गायत्री आई बरोबर दुसर्‍यांच्या शेतात कामाला जायची. त्या दोघींनी काम केले तरच त्यांना जेवायला मिळायच. गायत्रीला खूप शिकायच होत. तिने दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवले. पण रोज शेतात जाव लागत त्यामुळे कॉलेजला जायला मिळेल की नाही या विचाराने तिने अकरावीत शास्त्र शाखा न निवडता कला शाखेत प्रवेश घेतला. तिला शिक्षणाची आवड आहे हे भाऊ जाणून होता त्यामुळे त्याने तिला शास्त्र शाखा निवडण्यास सांगितले. भाऊ म्हणाला तू फक्त अभ्यास कर पैसे जमवायचे मी बघतो. भावाच्या पाठिंब्यामुळेच तिला अजून हुरूप आला आणि तिने आवडत्या शाखेत प्रवेश घेतला. तसे आई आणि वडील दोघे तिच्या शिक्षणाच्या विरोधात होते. बारावी झाली की लग्न करून टाकायचे अशी त्यांची इच्छा होती पण तिचा भाऊ आईला समजावायचा. असे करत करत हळू हळू त्याने आईला गायत्री च्या शिक्षणाबद्दल तयार केलेच. शिक्षणाच महत्व पटवून दिले. आता गायत्री च्या शिक्षणासाठी आई पण पाठिंबा देऊ लागली. गायत्री ने अकरावी मध्ये भरपूर अभ्यास करून चांगले गुण मिळवले.
आता बारावीच्या अभ्यासाला तिने आधीपासून सुरुवात केली. घरी आई तिला काहीच काम लावत नसे. पण तीच आईला एकटीलाच सगळे करावे लागते हे बघून थोडी थोडी काम करायचीच. असेच घरचे काम, कधी शेतात आई सोबत काम करत तिने बारावी चा अभ्यास केला. परीक्षा संपल्यानंतर सुद्धा ती घरात बसून राहिली नाही तर तिने रोज आई बरोबर शेतात काम करणे सुरूच ठेवले. आता बारावी चा रिजल्ट लागला. गायत्री चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. गणितात तर कॉलेज मध्ये पहिली आली. गणितात तिने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि एका चांगल्या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून रूजू झाली. आता ती आईला शेतात काम करू देत नाही. तसेच भावाला स्वतः चे दुकान सुरू करायला पूर्ण मदत केली.त्यामुळे मुलींनी ठरवल च की आपल्याला शिकायच आहे, स्वतःच्या पायावर उभे रहायचे आहे आणि जर घरचे तिच्या पाठीशी असतील, तर तिच्यासाठी अशक्य अस काही नाही.

Article Categories:
शिक्षण

Comments are closed.