प्राक्तन

Written by

 

डोळ्यातली स्वप्न…
कितीही सुखद असली
तरी प्राक्तनाचं गणित
काही वेगळंच असतं
जिवतीने मांडलेलं कोडं आहे
आपलं आपणच उकलावं लागतं
मनातलं दुःख विसरून
ओठांवर हसू आणावंच लागतं

प्रारब्धात नसलेल्या गोष्टी
दूरच जाणार…आनंदाने जाऊ द्याव्यात
पलीकडचं कितीही साजरं असलं
तरी अलिकडचच आपलं असतं
सुखदुःखांचा झगडा काही संपत नाही
जगण्यासाठीचं बळ जपावंच लागतं
मनातलं दुःख विसरून
ओठांवर हसू आणावंच लागतं

मेघना

Article Categories:
कविता

Comments are closed.