‘प्रिय चहा’☕☕

Written by

 

संपुर्ण जगात ‘चहा’ हे सर्वात जास्त आवडत गोड पेय आहे.आळस,मरगळ दूर करून तरतरी आणणार हे पेय सर्वांच्या आवडीचे आहे.आतिथ्यशिल असलेल्या आपल्या देशात घरी आलेल्या पाहुण्यांना पहीला गरमागरम चहाच दिला जातो‌.
सकाळची सुरुवात वाफाळत्या चहाने झाली की आळस कसा चुटकिसारखा दुर होतो.मित्रांबरोबर, पाहुण्यांबरोबर बरोबर चहाचे घोट घेत छान गप्पा रंगतात.एकवेळ जेवण नाही दिलं तरी चालेल पण पाहुण्यांना चहा द्यावाच लागतो.आता जेवणार आहोत आता चहा कशाला असं म्हणून चालत नाही,प्रथम चहा हवाच.सकाळ,दुपार संध्याकाळ ,कधीही चहाची तल्लफ आली की  लगेच चहा पिणारे शौकिन आहेत.अशा काही लोकांना कडक उन्हाळ्यातही  इतर थंडगार पेयाऐवजी चहाचं प्यायला हवा असतो.हा चहा पित खिडकितून पडणारा पाऊस बघण्याची मज्जा काही औरच.
या चहाची रूप ही अनेक.एकदम कडक चहा,स्पेशल,कटिंग,ग्रीन टी,हर्बल टी,आता तंदूर चहा ही मिळतो.
थंडीच्या दिवसात चहात आलं आणि गवती चहा टाकला की सर्दी, खोकल्यावर गुणकारी चहा तयार होतो.काळीमीरी, दालचिनी,जायफळ,वेलची प्रमाणात घेऊन मिक्सरमध्ये घालून बारीक पूड करून घेतली की चहाचा मसाला तयार होतो. ही पावडर घालून केलेला चहा ही औषधी, चवीला उत्तम असतो.काळ्या चहात म्हणजे चहा पावडर कमी घालून व दुध न चालता बनवलेला चहा,त्यात लिंबू पिळून घेतला की मुरडा येऊन होणारा पोटदुखी वर औषध  म्हणून घेता येतो.
हा चहा सगळ्यांना एवढा प्रिय आहे की   गावात  एखादा कार्यक्रम असेल,मिटींग असेल तेव्हा जमलेल्या लोकांना चहा द्यावाच लागतो.गावातल्या लग्नसमारंभासारख्या मिटींगमध्ये अगदी रात्री बारा वाजता,किंवा भजनी मंडळांना दोन वेळा चहा द्यावाच लागतो.असा हा चहा सर्वांना अमृततुल्य वाटतो.
सगळ्यांचा आवडता चहा असला तरी तो प्रमाणातच घ्यायला हवा.अती उकळलेल्या चहात टॅटीन हा घटक असतो तो आरोग्याला हानिकारक असतो.काही लोकांना अती गोड चहा आवडतो.परिणामता मधुमेह उद्भवल्यावर चहा पुर्णपणे वर्ज करावा लागतो. म्हणून चहा प्यावा पण जपूनच.
आता येथे मी एक कविता देतेय.
माझ्या आईच्या तोंडून ऐकलेली.तिला प्राथमिक शाळेत असताना तिच्या गुरूजींनी शिकवलेली ही चहा या विषयावरच आहे.

चहा एके चहा,
डोळे उघडून पहा,
चहा दुणे कप
बोलू नको गप्प,
चहा त्रिक बशी
अक्कल गेली काशी,
चहा  चोख चमचा
तु नव्हे आमचा
चहा पंचे साखर,
थोडी जाते भाकर
चहा सक किटली,
बुध्दी सारी विटली,
चहा सत्ते कोको,
तुझी संगत नको
चहा आठे पोट,
चहाचा एक घोट
चहा नव्वे कॉफी,
पिनारा तो पापी,
चहा दाहे पेला,
थापड बे चा प्राण गेला.
कशी वाटली चहाची ही कविता,कदाचित तुम्ही ही कुठे ऐकली नसेल किंवा वाचली नसेल.पण या कवितेतून कविला बहुतेक  चहाचे दुष्परिणाम सांगायचे असतील.
ते काहीही असले तरी थंडीच्या या दिवसात मस्त आले आणि गवती चहा टाकून चहाचे  गरमा,गरम घोट पिताना जो आनंद मिळतो तो काही औरच असतो…..

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.