प्रिय पावसा

Written by

प्रिय पावसा,
तू मला बहुरूपीच वाटतोस..
कधी गर्द वनराईत पाचू होवून बहरतोस,
तर कधी भरलेल्या आभाळाआड भेदरलेल्या पिल्लासारखा लपतोस..
कधी मोठ्या माणसासारखं मन मोकळं करत बरसतोस ,
अन् कधी शुभ्र वस्र ल्यालेल्या बैराग्यासारखा रित्या मेघानिशी वाट शोधत निघतोस…..
तुझं गर्द भारलेपण..
अव्यक्त रितेपण..
तुझ्या थेंबांचं पसरलेलं दाट जाळं;प्रत्येकालाच हवंहवंसं वाटतं..मग;
राग, लोभ,मोह,माया नसलेल्या तुला आम्ही पैशांची लालुच देवून बोलावतो..
अन् तुझ्या मोठेपणापुढे अजूनच लहान होवून जातो……

– प्रणाली

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत