प्रेमविवाहा आधीचा विचार… चुकले का मी? ?

Written by

प्रेमविवाहा आधीचा विचार…
?✒️जयश्री कन्हेरे -सातपुते

 

वाहिनी…

अग ये वाहिनी…

काय करतेयस?

काही नाही ग रूपा… पण तुला काय झालं… आल्या आल्या माझ्या नावाचा गजर करतेयस…

वहिनी… मला न जाम संताप आलाय रियाचा…

का ग.. आता रियाला काय झालं… तू सांगितलं होतंस न “ती खूप खुश आहे… तिच्या घरचे पण तिच्या Love marriage ला तयार झाले… “

हो ग वहिनी… इतकंच नाही तर दोन्ही कडे तयारी पण सुरु झाली लग्नाची..

अरे वा.. छानचं कि मग… तिच्या लग्नाच्या तयारीचा संताप तुला का येतोय पण…?

तिच्या लग्नाच्या तयारीचा नाही ग वाहिनी… रियाचा…

बघ ना.. आधी रियाचे आई -बाबा तयार नव्हते…तर तिनी त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करून, हातपाय जोडून लग्नाला तयार केल…जाम खुश होती स्वारी… लग्न आई बाबा करून देत आहे म्हणून…

काल रियाच्या आईने तिच्या लग्नासाठी काही दागिने घेतले व प्रेझेंट ची म्हणजे सर्व सामानाची ऑर्डर पण दिली… ”

अरे वा… किती छान ग म्हणजे जाम जोरात तयारी सुरु आहे म्हणा लग्नाची…

ऐक न ग वाहिनी पूर्ण..

सांग… सांग… रागावू नको ग रूपा..

ह.. तर मी कुठे होते…

प्रेझेंट च्या ऑर्डरीवर ???

वाहिनी माझ डोकं नको फिरवू… जा मी नाही सांगत… मला टेन्शन आलं म्हणून.. तुला सांगायला आले तर तू माझीच गम्मत घेतेयस..

Sorry ग.. मॅटर सिरीयस दिसतेय.. तू इतकी चिडलीस माझ्यावर.. बर आता नाही बोलत मी मधे.. सांग काय झालं ते…

मीच sorry वाहिनी.. मीच जास्त रागावले… या रियामुळे न…

बर.. असू दे .. सांग काय प्रॉब्लेम आहे ते…

काल तिच्या आईने सर्व शॉपिंग केली… मग रात्री मग गप्पा झाल्या असतील..त्या अशा… “आपण इतके श्रीमंत.. इतके छान दागिने घेतले… रियाच्या सासरचे घालू शकतील का इतके दागिने तिच्या अंगावर…? प्रेझेंट तर सगळंच घेतलं आपण, ते हिच्या त्या लहानशा सासरी मावेल कि नाही काय माहित ?… आपण हिला काही… काही कमी पडू दिल नाही… हिचा तो प्रशांत काय माहित कसे काय हिचे लाड पूरवेल ते… कितीही झालं तरी ते लोक आपल्या पेक्षा गरीबच आहे.. नाही का…. लग्नात पाहुण्यांसमोर आपली नामुष्की नको व्हायला… चार दागिने तरी घातले पाहिजे पोरीच्या अंगावर… नाहीतर लोक म्हणतील काय गरीबाच्या घरी पोरगी दिली… “ हे सगळं रियानी मला सांगितलं…

आता शहाणी म्हणते कशी.. “रूपा…मी चूक केली का ग प्रशांतला निवडून ?.. माझ्या आईला वाटते.. मी चुकीचा निर्णय घेतला…? मी प्रशांतच्या घरी ऍडजस्ट नाही करू शकणार का? … त्या लोकांनी मला जास्त दागिने नाही घातले तर..? प्रशांत छान आहे ग. खुप प्रेम करतो माझ्यावर.. खुप जपतो मला… त्याची फॅमिली आमच्या इतकी श्रीमंत नाही पण मनाने खूप चांगली आहे.. मी भेटली ग रूपा त्यांना…

पण माझी आई… नेहमी… नेहमी

आम्ही तुला काही कमी पडू दिल नाही.. ते लोक करतील का तुझ्या इच्छा पूर्ण…तुला त्रास होईल सासरी ? “ असं म्हणते मग मला कसतरी वाटते…

निर्णय बदलवासा वाटते

वाहिनी तीच हे बोलण एकूण असं डोकं सटकल न माझ…काय मूर्ख तिची आई…. व ही रिया महामूर्ख….. काय बोलाव तिला काही कळलंच नाही मला.. मी तिला वाईट वाटेल म्हणून काही बोलले नाही… पण याला प्रेम म्हणावं का ग वाहिनी ? तूच सांग…

हे घे…. पाणी पी आधी व शांत हो… हाच प्रॉब्लेम आहे love marriage वाल्यांचा.. विचारच करत नाही… कशाचाच..

तिला भेट संध्याकाळी व मी जे सांगते तेच शब्दनिशब्द बोल तिला…

बर मला सांग कशामुळे त्रास… दागिने घेऊन नाही दिले म्हणून…? तिची हौसमौज पूर्ण होणार नाही म्हणून..?

आई वडिलांना वाटत आपल्यापेक्षा श्रीमंत घरी पोरगी द्यावी…

तिच लव्ह मॅरिज आहे न.. तर.. प्रशांत, त्याची फॅमिली कशी आहे हे माहित आहे न तिला … मग आईला सांगायचं म्हणा “मी त्याच्यासोबत कोणत्याही परिस्थितीत खुश राहील… मला दागिने व श्रीमंती नको… मी प्रेम केल व ते शेवट पर्यंत निभाविन.. वाटल्यास तुम्ही पण मला दागिने… प्रेझेंट नका देऊ “

आणखी रूपा.. तिला काही प्रश्न पण विचार खडसावून… तुझी best friend आहे न ती.. हे प्रश्न विचार तिला..

1) पैसा पाहून प्रेम केलंस का?

2) लग्नानंतर तू त्याला टोमणे मारशील का तू माझ्या बाबापेक्षा गरीब आहे?

3) त्याच्या बजेटच्या वर त्याच्याकडून अपेक्षा ठेवशील का?

4) त्याच्या घरच्यांना सतत गरीब गरीब म्हणून हिंनवशिल का?

5) तुझी मनाची तयारी आहे का.. मध्यमवर्गीय कुटुंबात राहायची?

6)तुला त्यांची पुढे चालून लाज वाटेल का?

याची उत्तर दे स्वतःला.. व ठरव..

प्रेम मन बघून केल जात.. पैसा व श्रीमंती बघून नाही… आई असं म्हणते..

पण तुझं प्रेम का डळमळत आहे?

तू खंबीर राहा न… स्टेटस बघून लग्न करायचं होतं तर.. अरेंज करायचं होतं.. “

असं कडक बोल तिला…

रूपा… प्रेम हा असा खेळ आहे जो, दोघांनी खेळला तरच जिंकतो… एकाने जरी माघार घेतली, तर खेळ हरलो म्हणून समजायचं....

बघ तुला पटल का माझ बोलण…

वहिनी किती छान सांगितलंस तू… तिला चांगलीच खडसावते संध्याकाळी… बघू काय फरक होते तिच्यात.. आणि काय निर्णय घेते ती तर…

Ok.. तुझा राग शांत झाला का नणंद बाई…?

हो ग वाहिनी…कस करतात न मुली, प्रेम करतात मग निभवायची वेळ आली कि… मग श्रीमंती व गरिबी बघतात..मला न लग्नच नाही करायचं वाहिनी…

अग बाई आयुष्यभर का माझ्या डोक्यावर बसणार आहेस का…

काही पण बोलतेस वाहिनी तू…

आम्ही दोघी????

समाप्त….

माझा लेख वाचला त्यासाठी धन्यवाद … कसा वाटलं माझा लेख.. प्रेमाचे वारे वाहत आहेत.. काही सैराट होतील.. तर काही रियासारखं इमोशनल ब्लॅकमेल करतील… घरचे तयार झाल्यावर.. मग विचार करत बसतील… त्या सर्वांसाठी हा खास…

माझा लेख आवडल्यास like, कंमेंट करायला विसरू नका… जास्तच आवडल्यास शेअर करा माझ्या नावासकट … न आवडल्यास आपल्या नकारात्मक प्रतिक्रियेच सहर्ष स्वागत आहे…
?जयश्री कन्हेरे -सातपुते

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा