प्रेमाचा कवडसा ….!!

Written by

🔴प्रेमाचा कवडसा…

हृदयात तुझ गुंफताना
बहर मनात येतो
वाटेत या काटे असताना
आठवणींचा कहर होतो

वाट तु पहावी
या वेड्या जीवाची
भेट ही व्हावी
ओल्या भावनांची

काया ही तुझी
मिलनास आसुरलेली
आगतिकता ही क्षणांक्षणांला
मनात ओथंबलेली

दुरुनच दिसे
तुझ्या प्रेमाचा कवडसा
प्रतीबींब तुझे पहाता
मोह हा आवरु कसा

©नामदेवपाटील ✍

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा