प्रेमाची एक नवी परिभाषा

Written by

मागील भागात आपण बघितलं की अनघा अनिकेतशी बोलणार की नाही? अनघा त्याच्याशी बोलते तर तो म्हणतो की ती फक्त त्याची एक चांगली मैत्रीण आहे व बाकी काहीही नाही.एक दिवस अनिकेत व अनघा कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असताना अनिकेत तिच्या हातावर लिहीलेला A बघतो.तिला तो म्हणतो A म्हणजे अनघा ना?? तर ती बोलते A म्हणजे अनिकेत….अनिकेत हे ऐकून शांतच झाला.त्याला विश्वासच बसत नव्हता की अनघा असे काही बोलेल… तुला जर असाच विचार करायचा असेल तर तु आजपासून माझ्याशी बोलली नाहीस तरी चालेल,असं अनघाला बोलुन तो तिथून निघून गेला… त्याला वाटलच नव्हतं की त्यांच्या मैत्रीला असं काही वळण लागेल…
त्या दिवशी पासून दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. इकडे अनघा मात्र सारखी त्याच्या बोलण्याची वाट बघायची व रडायची… अशातच एक आठवडा गेला. हे सर्व जेव्हा बाकी मित्र मैत्रिणींना समजलं तेव्हा त्यांनी दोघांना परत बोलण्यास भाग पाडले. पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीत प्राण आले होते.
अशातच एकदा ग्रूपमधील एका मुलाने अनघाला प्रपोज केलं..अनघाने अनिकेतला हे सांगितले… अनिकेत त्या मुलावर खूप चिडला व काहीच न बोलता तो तिथून निघून गेला. पण त्याला हेच वाटत होत की अनघाने त्याला नाही म्हणावे. पण तो काहीच बोलला नाही.पुढचे काही दिवस तो अनघाची खूप काळजी घेत होता..
सरतेशेवटी काँलेजची परीक्षा झाली…आणि अनघाचे काँलेजचे दिवस संपले… तो दिवस अजुनही तिला आठवतो.१४ एप्रिल ज्या दिवशी तिने पुणे कायमचं सोडलं…त्या दिवशी अनिकेत तिला सोडायला पुणे स्टेशनला आला होता. त्याने चष्मा घातला होता… त्याने तिला गाडीत बसवलं.
तूझी खुप आठवण येईल म्हणून तो खाली उतरला. गाडी सुरू झाली…. अनघाने खिडकीतुन मागे वळून बघितले तर अनिकेत चष्मा काढून डोळे पुसत होता.. अनघाने लगेचच त्याला फोन केला… तर त्याचं उत्तर असे होते की तो तिला जातांना बघू शकला नसता म्हणून त्याने तो चष्मा घातला होता.. शेवटी मी तुझ्यावर खुप प्रेम करतो,मी तुला खूप मिस करेन,नेहमी माझ्या सोबत रहा असे म्हणून त्याने फोन ठेवला.. अनघा अजूनही खिडकीतुन बाहेर बघत होती.आज तिच्या मनाप्रमाणे झाले होते,पण ती अनिकेतसाठी थांबू शकत नव्हती..
आता तर खरी त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली होती.अनघा व अनिकेतच्या प्रेमाचे पुढे काय होते ते बघुयात पण पुढील भागात..

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत