प्रेमाची परवड भाग अंतिम

Written by

प्रवीण नव्वद टक्के भाजला होता तर सुमेधा साठ टक्के भाजली होती. प्रवीण दोनच दिवसात मरन पावला. सुमेधा मृत्यूशी झगडत होती. तीच्या मुलान्ना तीच्या नातेवाईक त्यांच्या घरी घेऊन गेले. इतक सगळ झाल्यावर सुमेधाची आई व भाऊ नसते आले तरच नवल सुमेधाचा भाऊ आता चांगल्या सरकारी नोकरीला लागला होता. त्याने सुमेधाच्या उपचाराची सगळी जबाबदारी घेतली . त्याने सुमेधाला सरकारी दवाखान्यातुन एका चांगल्या खाजगी दवाखान्यात नेले. तेथे सुमेधाला चांगले उपचार मिळाले . सुमेधाच्या भावाने तीची चांगली काळजी घेतली.

सुमेधा हळूहळू बरी होऊ लागली. ती सतत भावा जवळ प्रवीणची विचारना करत असे पन तीचा भाऊ काही तरी बहाण्याने सुमेधा पासून सत्य लपवत होता .आता सुमेधा पूर्ण बरी झाली .मग तीच्या भावाने तीला प्रवीण गेल्याचे सांगीतले . सुमेधाला प्रवीण गेल्याचा धक्का बसला ती खूप रडली . तीने प्रवीणवर खूप प्रेम केले होते .पन प्रवीणने तीला प्रेमाच्या बदल्यात तीच्या शरिरावर जळण्याचे व्रण व मनात खूप सारे घाव दिले होते.

https://www.swamini08.ml/2019/10/blog-post_14.html

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत