प्रेमाला उपमा नाही….!! #प्रेमकथा

Written by

एक छोटस टुमदार गाव होत.गावात माणुसकिने भारलेली माणस गल्लोगल्ली भरलेली होती.नदीचा वेढा गावाला समृद्ध करत होता .पीक जोमदार येण्यासाठी ईथला शेतकरी घाम गाळत होता.अशा कष्टाचे चिज करणारा शेतकरी म्हणून रामाची ओळख होती ….रामाच कुटुंब लहान…!!पोटाला एकलती एक मुग्धा नावाची मुलगी होती.मुलीवर जीवापाड प्रेम होत आईवडिलांच …!मुग्धा दिसायला नाकी डोळी छान होती ..रंग गोरा ..टपोरे डोळे…चाफेकळी नाक…आरस्पानी .सौंदर्याची खाण होती मुग्धा ….!! लहानपणापासूनच सार शिक्षण गावातील शाळेत चालू होत…प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गावापासून जवळच्या शाळेत ती शाळेला जात असते…शिक्षणात ती हुशार होती..शाळेत वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन नेहमी केल जायाच… मुग्धाला भाषण करण्याची आवड होती , परंतु तिला भाषण स्वतः तयार करता येत नव्हते यासाठी ती गावातील प्रतिक नावाच्या मुलाकडे भाषण घेण्यासाठी यायची… प्रतीक कॉलेजला असल्यामुळे बर्यापैकी त्याला कला अवगत होती…ज्यावेळी शाळेत स्पर्धा असायची त्यावेळी मुग्धा प्रतिककडे भाषण घेण्यासाठी यायचीच…अस हे निरंतर चालुच होत…मुग्धाच हे सारख येणजाण यामुळे प्रतिकच्या मनाला वेगळीच पालवी फुटली.. मुग्धाचा गोड स्वभाव त्याला आवडू लागला…तिच्या सौंदर्यावर तो फिदा होऊ लागला …झपाटलेल्या मनाला मुग्धाची चाहुल लागली होती…मुग्धाही नकळत त्याच्याकडे ओढली जाऊ लागली ..त्याच बोलण..हसण..वागण..हळूहळू हृदयाकडे वळू लागल…नजरेच बाण सळसळू लागले …दोघांच्या गाठीभेटी वाढू लागल्या ….एकमेकांची आतुरता शिगेला पोहचली …आणि आपण एकमेकांच्या प्रेमात पडलोय हे त्यांना कळलेच नाही.
मुग्धा आता कॉलेजला जायला लागली .प्रतिकचे कॉलेजमध्ये जाणे सुरुच होते …गावातील भेटीच्या ओढीपेक्षा कॉलेजमध्ये दोघं अधिक रमू लागली …बागामध्ये तासनतास गप्पा मारण , मस्त फिरण , आवडीनिवडीच्या गोष्टी खाण यामुळे ती दोघ आता मनाने एकरुप झाली होती.मुग्धाला क्षणांक्षणांला त्याची आठवण येऊ लागली व प्रतिक चातकासारखी तिची वाट पहात असत . प्रत्येक गोष्टींत भास आभास त्यांना जाणवत होता…मुग्धाला या हृदयस्पर्शी प्रेमाला आयुष्यात परावर्तीत करण्यासाठी घाई लागली होती.पण मुग्धाला घरातील आईवडीलांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते , त्यांना कसे समजावुन सांगायचे हेच मुग्धाला समजत नव्हते …शेवटी जीवन जगण्याचा प्रश्न असल्यामुळे आईवडील विचार करणारच…कारण प्रतिक कुठे नोकरीला नाही…कॉलेज शिकतोय…नोकरीची शाश्वती नाही..अशावेळी प्रतिकशी लग्न म्हणजे अश्यक्यच होत.. सगळा सारासार विचार मुग्धा व प्रतिकने केला यातुन मार्ग काढल्याशिवाय आपल्या प्रेमाचा काय उपयोग नाही हे दोघांनी जाणले होते…पण अडचणींचा चक्रव्युव्ह कसा भेदायचा हे त्यांना समजत नव्हते…शेवटी दोघांच्यात खलबते होऊन घरात न सांगता पळून जायाचे ठरले….प्रतिकने तशी जोडणी पुण्यातिल मित्राकडे केली…दररोजची कामे आटोपून घरात जाण्याचे नियोजन करत बसली होती.घरात न समजता कसे जायाचे व प्रतिकला कुठे भेटायचे हे सगळे फोनवर बोलणे झालेमुळे फक्त घरातुन बाहेर पडणे महत्त्वाचे होते…
संध्याकाळ झाली होती..दिवे लागण्याची वेळ होती …मुग्धाच्या घरात सुनसान शांतता होती..मुग्धाचे आईवडील शेतातुन आले नव्हते हीच संधी साधून मुग्धाने घरातुन पळ काढला…लगेच प्रतिक तयार होताच…दोघे लगेच पुण्यकडे रवाना झाले….प्रतिकने मित्रांकडे सारी व्यवस्था केली होती..दुसर्यां दिवशी एका मंदीरात दोघांचा विवाह अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला…दोघांनी आता सुस्कारा सोडला होता…. मुग्धाचे प्रेम सत्यात उतरले होते ….दोघांनी दृढ निश्चय केला होता… प्रेम निभवायचे व संकटांचा सामना करत जीवन जगायचे…
पुढे मुग्धा व प्रतिकने निकराची झुंज देत शिक्षण पुर्ण केले व दोघेही शाळेत शिक्षक म्हणून नव्या पीढीला सुसंस्काराचे धडे देऊ लागले…खरे प्रेम यालाच म्हणतात…खरोखरच या प्रेमाला उपमा नाही…!!

©नामदेव पाटील

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा