प्रेम इंद्रधनुचे

Written by

#प्रेम_इंद्रधनुचे

आभायाच्या मुक्तपटावर
सप्तरंगात मी रंगितो
मी एक इंद्रधनु
साऱ्या दुनियेस भुलवितो

हरेक रंगाशी आहे
माझे नाते अतुट
तरीही मी एक आभासी
आहे मज ठाऊक

प्रेमात झुरतो वर्षे तुझ्या
पाहुनी तव न्रुत्यकला
परि नसे गं तुज पर्वा
तु तर त्या ढगावर फिदा

तरीही करितो प्रेम तुजवर
विसरुनी सारे देहभान
कधीतरी माझी होशील
ही जपतो मनाशी आस

मिठीत लपतेस ढगाच्या
परि तो ढग निरस
सोडुनी देतो तुजला
अगदीच आहे बावळट

मग ओघळतेस खाली
तुझी ती रिपरिप
तुझी ती टिपटिप
जाणवते मजला सारी

रंगुनी रंगात साऱ्या
रंग माझा वेगळा
तव अल्लड प्रितीचा
दे मजला सहारा✍️

—————गीता गजानन गरुड.
छायाचित्र सौजन्य: भन्नाट फोटोग्राफी

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा