प्रेम कमी नाही झालं.. दृष्टीकोन बदलला

Written by

प्रेम कमी नाही झालं… फक्त दृष्टिकोन बदलला बघण्याचा

    सुरभी आणि सागर… एक छान व सुखी जोडपं. लव्ह + अरेंज मॅरिज झालेलं.. त्यामुळे प्रेम तर होतच दोघात त्यासोबत मोठ्यांचा आशीर्वाद सुद्धा होता.

           सुरभीला जरा घरात ऍडजेस्ट व्हायला वेळ लागला.. त्यातल्यात्यात तिच्या मनात भीती की “आपल लव्ह मॅरिज आहे.. घरच्यांनी होकार तर दिला,  पण खरंच त्यांनी आपल्याला स्वीकारलं की नाही.”  ती तिच्या परीने प्रयत्न करत होतीच सगळ्यात मिक्स होण्याचा. सासरचेही तिला वेळ देत होते घरात व घरातील लोकांमध्ये मिसळण्यासाठी..
दोन महिने झाले आणि सागरला परत नोकरीच्या ठिकाणी जायचं होत.. सुरभीचाही जॉब होता.. पण या सर्व लग्नाच्या गडबडीत तिने जॉब सोडला.. सागरला कपंनीने बरेच दूर पाठवले होते.. दोघांनीही जॉब करायचा म्हणजे पुन्हा बॅचलर लाईफ जगण्यासारखंच होत. आणि ते दोघांनाही नको होत.. या सर्वांचा विचार करून दोघांनीही निर्णय घेतला होता की एकाने जॉब सोडायचा काही दिवस.. नंतर पुन्हा करता येईल..
या सर्वात एक महत्वाची गोष्ट होती की दोघांनाही मुलं लवकर हवं होत.. म्हणजे सुरभीला जास्त रजा घ्याव्या लागणार होत्या.. पुढील दृष्टीकोन ठेऊन.. सुरभीच म्हणाली.. “सागर तू जॉब कर मी काही दिवस ब्रेक घेते. आणि घरी राहून ऑफिस मधून परतणाऱ्या नवऱ्याची वाट बघत दारात उभी राहील.. तू आलास की चहा बनवून देत जाईल. टिपिकल बायको सारखं, ???”  हे सगळं गमतीने व प्रेमाने सुरभी म्हणायची.
या  सगळ्यात दिवस, महिने, वर्ष निघून चालली होती.. सुरभी आता सासरी सर्वांच्या लाडाची झाली होती.. तिने जॉब सोडून घर सांभाळण्याचा निर्णय घेतला त्यामुळे खास करून सासूचं मन जिंकलं होत तिने. इकडे वर्ष होत आलं लग्नाला तरी अजून “गोड बातमी” कानावर आली नव्हती. घरच्यांचा आग्रह नव्हताच त्यांना..”आजकालची मुलं.. त्यांना त्यांच लाईफ enjoy करू द्यावं” असा विचार करून घरचे काही बोलले नाही..
आता सुरभीला मात्र कंटाळा येत होता, दिवसभर घरीच राहायचा.. इकडे good news पण नव्हती.. तिने सागरला या बाबतीत विचारले..”मी पण जॉब शोधते..जेंव्हा बाळ होईल तेंव्हा पुन्हा सोडेल”..  सागरला हरकत नव्हतीच. “कर ग राणी.. तू ज्यात खुश राहशील ती गोष्ट करायला मी कस अडवेल बर तुला.”
सुरभीने लवकरच जॉब मिळवला.. ती होतीही तशीच.. कामात व बोलण्यातही हुशार..
सागरला तिची घरी असण्याची सवय झाली होती… जेंव्हापासून तिने ऑफिस जॉईन केल तेंव्हा पासून सागर तिच घरी असणं खूप मिस करायचा.. वर्कलोड मुळे सुरभी उशिरा यायची.. आणि हा तिची वाट बघत.. काळजीत तिला फोन करून विचारत राहायचा..कधी येतेयस?  जेवलीस न दुपारी.? . मी वाट बघतोय ” यातून त्यांच प्रेम अजून फुलत होत.. पण त्यांच्या संसारवेलीवर फूल काही उमललं नव्हतं…
वर्ष भरात सुरभी काम करत असलेल्या कंपनीचं दिवाळ निघालं.. आणि कंपनी बंद पडली. त्यामुळे पुन्हा एकदा सुरभी नवीन नोकरीच्या शोधात होती..
सागर म्हणाला.. “अग राणी तू आता नोकरीच्या भानगडीत पडू नकोस.. आपण तसंही baby प्लॅनिंग करतोय..त्यावरच लक्ष दे.. आणि मला कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जावंच लागत.. तर तू ही माझ्या सोबत येत जा.. मस्त घुमायचं.. फिरायचं लाईफ एन्जॉय करायचं.. बाकी मी करतोय नोकरीं ”
सुरभीने देखील आता ठरवलं की नोकरीच डोक्यातून काढून टाकायच…आणि सागर म्हणतोय तस लाईफ एंजॉय करायचं..
काही दिवस ठीक ठाक चालल.. पण नंतर सागरच काम खुप वाढलं.. तो तिला सोबत न नेताच चार.. पाच दिवस कामानिमित्त शहरा बाहेर राहत होता..  आधीसारखा वेळ मिळत नसल्याने कॉल पण कमी करायचा.. घरी आल्यावरही इतका थकलेला असायचा की सुरभीला काही बोलायचं असलं तरी… “नंतर बोलू ग ” म्हणून सागर तिला थांबवायचा…

या सर्वांमुळे सुरभींची चिडचिड खूपच वाढली होती. सागरला तिच्यासाठी वेळच नाही अस वाटायचं तिला. एव्हाना लग्नाला चार वर्ष होऊन गेली होती.. अजूनही बाळ होत नाही.. आपण घरीच राहतो.. या सर्व विचारांनी सुरभी भांबावली होती… नको नको ते विचार ती करत होती… असं म्हंटल तर वावगं ठरणार नाही की सुरभीला शंकेने घेरलं होत..
क्रमशः…..
कोणती शंका होती सुरभीच्या मनात..?
काय ती खरी होती?
खरंच सागरच प्रेम कमी झालं होत का?  तो बदलला होता का?
की….
त्या प्रेमाला बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता..?
या सर्व प्रश्नांचा भडीमार होत असेल न.. पुढील भागात सर्व उलगडेल.. धन्यवाद ?
?✒️जयश्री कन्हेरे -सातपुते
आवडल्यास like करा..  काही सूचना असेल तर कमेंट करा.. शेअर करायचा असेल तर नावासहित करा.. धन्यवाद ? जयश्री कन्हेरे -सातपुते.

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा