प्रेम कमी नाही झालं… फक्त दृष्टिकोन बदलला (अंतिम भाग )

Written by

भाग तिसरा पुढील प्रमाणे 

सुरभी विचार करून करून शेवटच्या निर्णयापर्यंत पोहचली.. आपल्याला मुलं होत नाही आहे.. नोकरीं देखील करत नाही या सगळ्यामुळे सागर च प्रेम राहीलच नाही.. यानिष्कर्षाप्रयत्न ती पोहचली होती.. love marriage केल असलं तरी घरच्यांची सहमती होती तिला. त्यामुळे अशा परिस्थिती इतर मुलीन प्रमाणे तिला माहेर परकं नव्हतं.

सागर किती चांगला आहे याची प्रचिती तिच्या माहेरच्यांना या चार वर्षात आलेली होती..

एक दिवस सुरभी कुणाचाही व कशाचाही विचार न करता.. इतकंच काय तर सागरला देखील कल्पना न देता माहेरी निघून आली. इतक्या लांबचा प्रवास(700km) करून आली थकली असेल म्हणून आईने काही जास्त विचारलं नाही तिला..  तरीही काळजीने “सागर नाही आलेत तुझ्यासोबत? एकटीच आलीस?  काही कळवलं देखील नाही तू. साधा फोन तरी करायचा न बेटा येतेयस म्हणून ” असे साधे प्रश्न केलेच आईने..

थोडी त्रासिक होऊनच सुरभी –  आई मी फ्रेश होऊन येते.. मला जरा काहीतरी खायला करून दे न तुझ्या हातच व चहा पण. आणि ते सगळं रूम मधे आन मी फ्रेश होऊन तिथेच आराम करते.

मुलगी इतकं म्हणतेय तर आईने पण प्रश्नांची सरबत्ती कमी केली व तिच्यासाठी छान तिच्या आवडीचे बटाटे पोहे करायला घेतले.. तयार झाल्यावर रुममधे सुरभीला नेऊन दिले..

वा.. आई किती दिवसांनी खातेय ग तुझ्या हातचे पोहे.. सुगंधानेच भूक वाढली माझी.. जास्तीचे केलेयस न?

हो ग मला माहिती आहे तुला खूप आवडतात ते. हे संपव मी आणून देते आणखी..

हो… आणि “अद्रक वाली चाय ” पण बर का आई..

हो आणते तू खाऊन घे आधी. सुरभींची आई किचन मधे गेल्या.. मुलगी आनंदानेच बोलतेय तर आताच विषय नको म्हणून त्यांनी पुन्हा तिला विचारलं नाही..

आई.. आन न ग पोहे पटकन..

हो ग…. कशी लहान मुलांसारखी ओरडतेस ग..

मी आहेच अजून लहान.. बर आई मला जाम झोप येत आहे.. मी झोपते जरा वेळ..

हो.. थकली असशील आराम कर..

इकडे सागर घरी आला.. त्याला सुरभीच कोणतंच सामान दिसत नव्हत. तिला फोन करावा तर फोनही लागत नव्हता.. तिच्या व त्याच्या कॉमन फ्रेंड्स ला कॉल केला.. पण ही कुठेच नव्हती.. सुरभीला राग आला हे त्याला माहिती होत रात्री झालेल्या भांडणामुळे तो सकाळी न सांगताच निघून गेला आणि रात्री परत आला तर त्याला सुरभी घरी दिसलीच नाही.  आता काय करावं?  सासरी व माहेरी विचारावं का?  पण तस केल तर त्यांना कळेल आमच्यात काहीतरी झालेलं आहे म्हणून..  त्याने बरेचशे msg send केले सुरभीला पण ती त्याला रिप्लाय देत नव्हती.. एव्हाना तिने त्याला ब्लॉक केल होत.. इकडे काळजीने सागर तडफडत होता.. “सुरभी एकदा बोल ग मी तुला सगळं सगळं सांगतो.. मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो.. ते कमी नाही झालं.. तुझा दृष्टिकोन बदलला ग माझ्या प्रेमाकडे बघण्याचा ” काकुळतीला येउन सागर एकटाच जोराने बोलत होता…

इकडे सुरभी झोप घेऊन उठली… बाबा, दादा सगळेच घरी आले होते.. आई ने त्यांच्या कानावर टाकलेलं सुरभी आली म्हणून.. त्यांची चर्चा सुरु होती… सुरभी हॉलमधे आलेली बघून आई.. “अग ये.. तुझ्याविषयीच सांगत होते.. झाली का झोप? ”

हो.. झाली न..

दादा -: काय ग जावई नाही आले सोबत…?  साधा फोन msg काहिच नाही.. अचानक काशीकाय आलीस?

मी येऊ नाही शकत का?  हे माझ घर नाही का?  मला अधिकार नाही का इथे येण्याचा?  की तुझी परमिशन घ्यावी लागेल मला यायला?

दादा -:अग वेडाबाई किती रागावतेस…  मी सहज विचारलं तुला.. इतकं रागवायला काय झालं.. भांडण करून आलीस की काय सागरशी?

बाबा -: काहीही काय बोलतोस रे विनय तू.. मोठा आहेस न मग गम्मत काय करतोयस तिची..

त्यांनी तुला कॉल करून सांगितलं न सगळं… वाटलंच होत मला.. माझ्याच चुका दाखवेल तो.. माझ्याच भावाला माझ्या विरुद्ध सांगतोय काय.. थांब म्हणा जरा..

दादा -: अग.. कुणी सागरणी का?  मला कॉल केलाच नाही. काय बोलतेयस तू?

बाबा -:सुरभी शांत हो व नीट काय झालं ते सांग. दादा तुझी गम्मत करत होता पण तू इतकी रागावलीस याचा अर्थ बरंच काही झालं तुमच्या दोघात.. निवांत बस आणि सांग काय झालं ते..

काही सांगायचे नाही मला.. मला घटस्फोट हवा आहे.. म्हणून मी आली आहे इथे..

(आई, बाबा व दादा तिघेही आश्चर्याने एकसाथ ) घटस्फोट!

काय वेड बीड लागलंय का तुला… (आई )

बाबा -:असं तडकाफडकी निर्णय घ्यायला झालय तरी काय?  त्याच्या घरच्यांना माहिती आहे का हे?

दादा -: उतरली का नशा प्रेमाची.. याचा विचार लग्नाआधीच करावा लागतो.. सोपं नसत love marriage शेवट प्रयत्न नेणं..

आई -:विनय तू गप बसतोस का जरा.. काय झालं ते कळू दे आधी..

दादा -: तू मलाच बोल आताही.. जास्तच लाडावून ठेवलंय तुम्ही हिला..

बाबा -: विनय विषयाचं गांभीर्य तर लक्षात घे काहीही बोलतोस.. जरा शांत हो. कारण कळू दे आधी. सुरभी कारण सांगशील या मागचं?

आई -बाबा,  चार वर्ष झालीत लग्नाला.. आधी सगळं ठीक होत पण आता सागर बदलला… त्याच प्रेमच नाही राहील माझ्यावर.. आधी सारखी काळजी नाही करत माझी.. काम.. काम व फक्त कामातच असतो.इतका बिझी असतो तो की माझ्याशी बोलायला पण वेळ नसतो त्याला.. मी जॉब सोडला आणि आम्हाला बाळ पण होत नाही आहे ??म्हणून कदाचित त्याच प्रेम कमी झालं आता.. ???? (इतकं बोलेस्तोवर सुरभी रडायला लागली होती )

आई जवळ येउन तिला “रडू नकोस बेटा.. तो वेळ देत नाही म्हणून घटस्फोट घेणं योग्य नाही. त्याच प्रेम कमी झालं कशावरून म्हणतेस..?  तो रागावतो का तुझ्यावर? तुझ्या चुका काढतो का प्रत्येक गोष्टीत?  मुल होत नाही याला सर्वस्वी तुला जबाबदार ठरवतोय का? त्याने तुला नोकरीं करायचीच नाही असं खडसावून सांगितलं का? ”

नाही ग आई.. असं तर काहिच नाही म्हणाला तो स्वतःहून.. (सुरभी विचार करत होती आईच्या प्रश्नाचा )

बाबा  -: काय ग प्रेम करणे म्हणजे नेमक काय हवं तुला..?  तो एकटा जॉब करतोय तर त्याच्या ऑफिसातल्या व घरच्या दोन्हीही जबाबदाऱ्या वाढल्यात की नाही?  हेच वय आहे काम करण्याचे.. पैसा कमावण्याचे. करत असेल जास्त काम. वर्कलोड असेल.. थकून जातं असेल तो. तुही नोकरीं केलिसचं न तुला ही माहिती आहे हे सगळं मी वेगळं सांगायला नको तुला कामाचं टेन्शन.

दादा -: तुला प्रेम म्हणजेलग्नाआधीसारखं.. घुमणे.. फिरणे, हॉटेलिंग, आणि I LOVE YOU म्हणणं असच वाटत का आताही?  लग्नाच्या चार वर्षानंतर.  थोडी तर मॅच्युरिटी घे.. तुम्हा बायकांचे डोके न.. खरंच भुसा असतो त्यात.. कितीही शिका, नोकरीं करा तुम्ही पण एका पुरुषाचं/नवऱ्याचं मन नाही समजू शकत..  नक्कीच शंकेची पाल चुकचुकली असेल तुझ्या मनात की  “सागरच बाहेर अफेअर सुरु असेल म्हणून ”

(दादाला थांबवत ) तुला कस कळलं हे.. त्याने सांगितलं का?

दादा -: बावळट पोरगी.. पुरुष अशा गोष्टी जगजाहीर नाही करत.. नवरा -बायकोच्या भांडणाच्या.  तो कशाला सांगतोय मीच आपला अंदाज लावला.. याचा अर्थ तो अंदाज खरा आहे.. म्हणून तुला घटस्फोट हवा आहे.. बाबा -आई  बघा ही वेडाबाई… इतका चांगला नवरा व हिच मन फक्त शंकेने भरलं आहे..

आई -: तू गप रे विनय.. ही काय पद्धत झाली का समजावण्याची.. जरा प्रेमानी पण बोलू शकतोस की नाही..

बाबा -: विनय बरोबर बोलतोय सुरभींची आई.. आपली मुलगी आहे म्हणून तिच्या हो मधे हो मिसळण्यात अर्थ नाही. सुरभी तू सागरला सांगितलंस का माहेरी जातं आहेस म्हणून?

(सुरभी खाली मान टाकून ) नाही बाबा…

बाबा :-त्याचे तिकडे काय हाल झाले असेल माहिती आहे का तुला..?

कसले हाल.. मजेत असेल तो. आता माझंही बंधन नाही न त्याला.. मनमोकळ जग म्हणावं..

बाबा -: शांत बस आणि जरा तोंड सांभाळून बोल. नवऱ्याविषयी बोलतेयस तुझ्या.

आई -: अहो.. रागवताय काय पोरीला असं.. जरा समजून सांगा न..

बाबा -: तूच सांग समजावून तिला.. गेली सहा महिने ही कशी वागतेय त्याच्याशी ते विचार.. तो कुणासाठी करतोय हे सगळं तर मॅडम च ड्रीम हाऊस नाही नाही ड्रीम बंगलो पूर्ण करण्यासाठी.. हिच्या वाढदिवसापर्यन्त निदान जागा घेऊन ते कागदपत्र हिला गिफ्ट द्यावे.. म्हणून झोकून घेतोय स्वतःला कामात.. आणि ही म्हणते त्याच प्रेम कमी झालं.. त्याच बाहेर…… शी.. मला लाज वाटते माझी मुलगी असा विचार करू शकते याची..

(सुरभी आश्चर्याने बाबांकडे बघत ) बाबा हे काय बोलताय..? तुम्हाला कुणी सांगितलं हे सगळं आणि कधी.?

बाबा -:विनय आधी सागरला फोन लाव व सांग सुरभी इकडे आलेली आहे व व्यवस्थित आहे.. काळजीत असेल तो बिचारा…

बाबा सांगा न तुम्हाला हे सगळं…

बाबा -: हे मी सांगायची गरज पडायलाच नव्हती पाहिजे.  तू प्रेम केलंस न त्याच्यावर.. मग विश्वास का नाही ठेवलास? त्याच वागणं बदललं मान्य आहे पण का?  याचा विचार केलास.  तुला बाळ होत नाही म्हणजेच त्यालाही न ग.. त्यालापण तर ती सल टोचत असेल न.. तरीही तो तुला खुश करण्यासाठी धडपडतोय व तू त्याला मानसिक आधार देण्याऐवजी त्याला उलट सुलट बोलतेयस..

तुझी आवड -निवड काय आहे.. लहानपणीच एखाद स्वप्न जे तुला सत्यात उतरवावंसं वाटत.. हे विचारलं होत त्यांनी मला वर्षाभरा आधी.. आणि बाळ होत नसल्यामुळे तुझी होणारी चिडचिड.. तसेच तू जॉब सोडलास त्यामुळे नकळत तुझ्यात निर्माण झालेली संशयी वृत्ती हे सागरला वर्षभराआधीच कळली होती..व त्याने बोलता बोलता हे सांगितलं होत मला..  म्हणून तो जास्त न बोलता शांत पणे ऐकायचं तुझं.. कारण मीच त्याला म्हणालो होतो “माझी मुलगी हट्टी आहे, रागाच्या भरात बोलून जाईल काही त्याच इतकं मनावर घेऊ नका ” म्हणून तो शांत होता आजपर्यंत.

आणि तू काय केलंस.. त्याला न सांगता निघून आलीस..

अग त्याच प्रेम कमी नाही झालं.. तुझा त्याच्या प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

त्याच हे चुकलं की “तुझा ड्रीम बंगलो ” जो मी पूर्ण नाही करू शकलो एक बाप म्हणून.. तो पूर्ण करण्यासाठी त्याने तुझ्याकडे दुर्लक्ष केल.. त्याला दुर्लक्ष करणं नाही म्हणतं बेटा.. त्याला गृहीत धरण म्हणतात.. “आपण हिच्यासाठीच तर करतोय मग आता वेळ नाही दिला तरी घरी सोबतच तर असतो न नजरेसमोरच असते ती ” हे चुकलं सागरच

एक बाप म्हणून मी जे समजावू शकत होतो ते समजावलं.. तुझ्या लग्नाच्या निर्णयात पण आम्ही सहभागी होतो व आता जो निर्णय घेशील त्यातही सहभागी राहू… तू हुशार आहेस स्वतःचे निर्णय घेऊ शकतेस..  हे तुझं माहेर म्हणजे तुझं हक्काचं घर आहे..  तेंव्हा निर्णय घे.. म्हणजे उद्या वकीलाकडे जायला बर होईल.. (दुःखी मनाने सुरभीचे बाबा तिला सांगत होते )

आई, दादा व सुरभी विचारच करत राहिले.. बाबांना सागरने इतकं सगळं कधी सांगीतल?  लग्नाला आधी बाबांचाच विरोध होता.. आणि आता तेच बाबा सागरची बाजू घेऊन लाडाच्या लेकीला रागवत आहेत…

आई :- सुरभी जरा शांत डोक्याने विचार कर.. विनय केलास का जावयांना फोन..?

दादा :-हो आई.. सांगितलं. ते विचारातच होते.. की फोन करावा.. पण आपल्याला टेन्शन येईल म्हणून त्यांनी कॉल नाही केला..

दादाच, बाबाच बोलण एकूण सुरभीला स्वतःची चूक उमगली होती. रडतच ती रूममधे गेली.. सागर ला अनब्लॉक केल.. लगेच कॉल लावला तर त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया दाखवत होता..

अगदी पाच.. पाच मिनिटांनी सुरभी कॉल लावत होती पण कधी रिंग जाऊनही तो उचलत नव्हता व कधी आउट ऑफ कव्हरेज एरिया दाखवत होता.. सुरभी आता काळजीत होती.. दोन तासांनी जेंव्हा पुन्हा कॉल लावला तेंव्हा मोबाईल स्विच ऑफ सांगत होता… आता सुरभी पुरती घाबरली होती.. घरी सगळे तिलाच रागावले त्यामुळे कुणाला सांगू ही शकत नव्हती ती.. अश्याच विचारात, रडत रडत तिने रात्र जागून काढली… सकाळ होताच तयार होऊन बॅग घेऊन ती सागर कडे परत जायला निघाली… दरवाज्या जवळ जातं नाही ते.. सागर कार मधून उतरला व धावतच घरात येउन सुरभीला मिठीत घेतलं…

सुरभी देखील सगळं विसरून स्वतःची चूक कबूल करत “सॉरी रे सॉरी, I Love You ” म्हणतं सागरच्या मिठीत विसावली..

आणि पुन्हा तुझा मोबाईल का बंद होता म्हणून भांडू लागली सागरशी.. ???

अग वेडाबाई.. तू घरी नाहीस म्हणून सगळ्यांना कॉल केले.. चार्जिंगला लावायला विसरलो.. विनय दादा चा कॉल आला तसाच सतीशची कार घेतली व निघालो.. मोबाईल सायलेंट वर कधी झाला व नंतर स्विच ऑफ कधी झाला कळलंच नाही.. बस इथे पोहचायचं होत मला.. तुझ्या जवळ.. आता सोडून नको जाऊस मला.. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर.. रोज I Love You  म्हणतं जाईल मी तुला.. ok..

I Love you सागर..

चला काल पासून काही खाल्लं नसेल जावयानी.. फ्रेश होऊन या नाश्ता तयार आहे.. मग दुपारचं जेवण करा व निघा तुमच्या घरी दोघेही.. “नांदा सौख्यभरे ” बाबा हसतच म्हणाले… घरातील वातावरण देखील हास्याने बहरून गेलं..

समाप्त…..

?✒️जयश्री कन्हेरे सातपुते

एकंदरीत सागर ❤सुरभीचा संसार तुटण्यापासून वाचला.. तेंव्हा वाचकांनो प्रेम कमी नाही होत बर का.. बघण्याचा दृष्टिकोन बदलतो व मग भांडण, शंका आणि घटस्फोट असा प्रवास सुरु होतो..

सुरभीच्या बाबाबासारखं समजावणार कुणी भेटलं तर कित्येक संसार जे गैरसमजानाने तुटतात ते वाचतील..

कसा वाटला लेख नक्की सांगा व शेअर करायचा असेल तर नावासहित शेअर करा.. धन्यवाद ?जयश्री कन्हेरे- सातपुते

Article Categories:
सामाजिक

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा