प्रेम कमी नाही झाल.. फक्त दृष्टीकोन बदलला भाग 2

Written by

पहिला भाग इथे वाचा.. 

https://www.facebook.com/581606972323826/posts/634133093737880/?sfnsn=xwmo

भाग दुसरा. पुढील प्रमाणे..

एकांतात सुरभी विचार करत राहायची.. 4 वर्ष झालीत.. आधी कसा वागायचा न सागर.. किती प्रेम.. किती काळजी करायचा. आणि आता ???

सुरभी जुन्या आठवणीत हरवून गेली…

” काय करतेयस ग?.. 

कुठे आहेस?.. 

नीट पोहचलीस न घरी?… 

किती उशीर झाला…” असे सारखे प्रश्न करणारे फोन करायचा सागर..

पण….

आता तस काहीच उरलं नव्हतं.

सागरचे फोन कमी झाले होते… तिला वाटत होतं कि सागरच प्रेम कमी झालं… त्याला आपल्यासाठी वेळच नाही… मीच वाट बघत असते याची… याला माझी काळजीच नाही... सगळं प्रेम फक्त लग्नाआधीच होतं….” सागर ने लग्नाआधीसारखच वागावं असं तिला वाटायचं..

इकडे सागर कामात खूप गुंतला होता…त्याला वाटत होतं “सुरभी खुश आहे…लग्नाआधी आपण दूर होतो.आता एकत्र आहोत… दिसतेच की अपल्याला रोज. नजरेसमोरच तर असते ती. संध्याकाळी घरी गेल्यावर तिला बघितलं कि सगळा  थकवा दूर व्हायचा त्याचा..कामाचा सर्व ताण विसरून जायचा तो तिच्या एका स्माईलमुळे…. तिच्या मनात असं काही चालू असेल याची पुसटशी कल्पनाही नव्हती त्याला…

आपल प्रेम आपल्या सोबत आहे.. आपण जे काही करत आहोत ते सुरभी व आपल्या भविष्यासाठीच न.. आता जरा जास्त काम केल कि पुढे आयुष्य सुखकर होईल.. ” हे विचार सागर चे होते… तो तिला गृहीत धरूनच वागत होता… आणि इथेच तो चुकला.

प्रेमविवाहा मधे, लग्नाआधी कस छान रोमँटिक असत सगळं.. फिरणं, हॉटेलिंग, तासातासाला येणारे काळजीचे.. मिस you चे msg.. सगळ कस हवंहवंस आणि रोमँटिक असत. 

लग्नानंतर ते सगळं बदलून जातं.. प्रत्येक गोष्टीत गृहीत धरलं जातं.  इथेच सगळं चुकत जातं.. पुरुषांना तसंही व्यक्त होता येत नाही.. (आता हे नका म्हणू लग्नाआधी कसे व्यक्त होतात ?) पण पुरुषांनी देखील पत्नीला गृहीत न धरता.. तिला खरंच काय वाटते व काय हवं हे विचारावं… घरी असणाऱ्या (गृहिणी ) तर वाट बघत असतात हक्काच्या माणसाची (पती ची ) बोलण्यासाठी.

“घरी आहे ती…. तर जेवली असेलच.

संद्याकाळी जाणार आहोच घरी मग कशाला msg किंवा कॉल करायचा… गेल्यावर बोलूच की.”

घरी आल्यावर…ती हसून स्वागत करते.. आणि हा पुन्हा तिला गृहीत धरतो की ती तर चांगलीच आहे.. आणि तो तिला आधिसारखं फारस(रोमँटिक ) न बोलता बोलता पुन्हा आपल्या कामाला लागतो….. असं वागणं सुरु होत सागरच 

या सर्वात सगळी घुसमट होत होती ती सुरभीची त्यातल्यात्यात बाळ होत नाल्यामुळे, जॉब सोडल्यामुळे तिच्या डोक्यात भलतेच विचार यायचे.. 
सुरभीचा राग… चिडचिड वाढतच होती…

हा असा का वागतो..?

हा आपल्याला टाळत आहे?

त्याच कुठे काही बाहेर तर नसेल न? असं तिला वाटत होतं..

याच रूपांतर शंकेत झालं..

आणि शंकेचं रूपांतर भांडणात कधी झालं हे कळलंही नाही… प्रेमळ नात्याचा अस्त होऊ पाहत होता… 

या अस्ताला कारण काय? तर “तो मला वेळ देत नाही.”

आणि तो तिच्याच साठी जास्त वेळ काम करतो.. तिला खुश ठेवण्यासाठी… त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने जास्त मेहनत घेत होता.. समाधान इतकंच होत त्याला की “ती आपल्या सोबत आहे” पण तिच्या मनाच्या घालमेलीची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती.

दोघांमधील अंडरस्टॅण्डिंग कुठेतरी डळमळली होती...गृहीत धरण खूप जड  गेलं सागरला.

त्यामुळे सुरभीच्या डोक्यात नको ते विचार पिंगा घालत होते आणि त्यातून भांडणाला सुरुवात झाली होती. एकमेकांना समजून न घेण्याचं प्रतिफळ म्हणजे हळू हळू दोघात होणारी भांडणे.. आणि मग जर समजून घेतलं नाही तर याचा शेवट नात्याच्या अस्ताने होतो.. ज्याची सुरवात सागर सुरभीच्या नात्यात.. भांडणाने झाली होती…

 कालांतराने असे बदल होतातच आयुष्यात… आपण प्रत्येक नात्याला वेळ दिला पाहिजे.. न सांगताही एकमेकांनच मन ओळखता आलं पाहिजे… “हा बदल का झाला?.. व कशासाठी झाला …” हे समजायला पाहिजे.. आपल्या माणसाला समजून घेता आलं पाहिजे…
तेंव्हा नातं बहरत…
फुलत व आयुष्य आनंदाने जगता येत..
प्रेम आपणही केल असत..
त्या प्रेमाला वेळ द्यायचा…

लगेच कोणत्याही निर्णयाला पोहचायचं नाही… आपल्याला त्याच्या वागण्यामागचं कारण कळत नसेल तर आपलंच प्रेम कमी पडत आहे असं समजावं….. स्वप्नातील दुनियेतून बाहेर येऊन वास्तवात जगण्याचा प्रयत्न केला कि या अडचणी संसारात येतच नाही..

सागर जे काही करत होता… ते दोघांसाठीच न… फक्त कामाच्या व्यापात त्याला त्याच्या भावना व्यक्त करता येत नव्हत्या... याचा अर्थ सुरभी भलताच काढत होती.. तिला हवा होता तो काढत होती. दोघांनीही एकमेकांना समजून घेतलं कि विस्कटलेली संसाराची घडी पुन्हा नीट करता येते… पण तेच जमत नव्हतं त्यांना.

( तेंव्हा आपल्या प्रेमाला जपा… उमलू द्या… बहरू द्या.. लग्नानंतरच हे प्रेम आयुष्याची कोणतीही लढाई जिंकू शकते.. स्वप्नाच्या , खासकरून टीव्ही सिरीयल च्या दुनियेत जगल्यापेक्षा प्रत्यक्षात जगा…. आपल्या साथीदाराला समजून त्याला साथ द्या… संसार तोडल्यापेक्षा… संसार करा…. …….. )
आता या प्रेमविवाहाचा अंत होतो की.. पुन्हा याच्या संसाराची विस्कटलेली घडी नीट होते.. ??  पुढील भागात..

क्रमशः…

?✒️जयश्री कन्हेरे -सातपुते

आवडल्यास like करा, कमेंट करा व शेअर करायचा असेल तर नावासहित करा धन्यवाद ?

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत