प्रेम कि आकर्षण –एक कथा

Written by

   सोनाली लहान पणापासून च हुशार,दिसायला सुंदर,सडपातळ बांधा व चेहऱ्यावर तेजस्वी अशी चमक असणारी मुलगी.आई वडिलांचे आपल्या परीने तिला शिकवंण्याचे काम चालू होते.ती पण आपल्या अभ्यासातील प्रगतीने आपल्या घरच्यांना खुश ठेवत होती. तिलाही वाटे तिच्या सोबतच्या मुलींसारखा आपल्याला देखील एखादा जवळचा मित्र असावा परंतु घरच्या  दराऱ्या ने हे अजून तिचे स्वप्न च होते..हळू  हळू  तिचा डिप्लोमा पूर्ण  होत होता..परंतु तेवढ्यात तिच्या वडीलांना नातेवाईक लग्ना बद्दल विचारू लागले .लग्न असे ऐकले तरी सोनालीच्या मनात कालवाकालव होत असे .पण घरचे म्हणतील तसे करणे तिला भाग होते म्हणून ती ने तिच्या पुढच्या स्वप्नांचा जास्त विचार करणे थांबवून दिले कारण म्हणतात ना की अपेक्षा ठेवल्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीतर माणसाला सर्वात जास्त दुःख होते असेच काहीसे सोनालीच्या बाबतीत घडले.
         अचानक एके दिवशी निरोप आला स्थळ बघण्याचा मग काय तिच्या वडिलांनी आदेश च दिला घरात की उद्या आपल्याकडे मुलगा बघायला येणार आहे तर सर्व तयारी करून ठेवा. निराश सोनाली ने मनाची तयारी केली आणि दुसऱ्या दिवशी ची तयारी सुरु केली आणि तो दिवस आला.सोनाली ने मस्त गुलाबी रंगाची साडी नेसली त्यावर शोभतील असे कानातले, हलकीशी लिपस्टिक एकदम सुंदर अशी दिसणारी सोनाली कोणालाही बघताच पसंत पडेल अशीच वाटत होती..पण मनातून मात्र ती थोडी निराश होती कारण कॉलेज लाईफ एन्जॉय करण्या आधीच तिला असे सामोरे जावे लागत होते.
            काही  वेळात पाहुणे पोहचले आणि मुलीला बघण्याचा     कार्यक्रम  सुरु  झाला..सोनाली तर बघता क्षणी त्याना आवडली होती ते सर्व खुश  होते  परंतु मुलगा बघून सोनाली खूप नाराज झालेली   कारण सावळा वर्ण ,जाडसर बांधा  असा काहीसा असल्याने  तो तिच्या मनातील जोडीदाराच्या प्रतिमेत कोठेच बसणारा नव्हता..पण ती गप्प बसली. नंतर त्याना दोघांना बाहेर बोलण्यासाठी एकटे पाठवण्यात आले. तेथे पण सोनाली एकदम शांत होती .मुलाने जुजबी प्रश्न विचारून नंतर ते दोघे घरात आले.. व नंतर कळवू असं म्हणून पाहुण्यांनी निरोप घेतला..इकडे मुलगा व त्याचे कुटूंबीय अतिशय खुश होते. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर होकार कळवला.मात्र हा निरोप ऐकून सोनाली अतिशय घाबरली. आपल्यला पसंत नसलेल्या मुला सोबत आयुष्य काढावे लागेल ह्या विचाराने..सोनालीच्या घरचे पण खुश झाले होकार ऐकून. कारण त्याच्या दृष्टीने स्थळ मोठे होते व्यावसायिक मुलगा होता. वडील सरकारी अधिकारीं होते. त्यामुळे त्यांनी सोनाली ला समजावून तयार केले लग्नासाठी..
         झाले  लग्नाची तारीख ठरली एकी इकडे सोनाली आणि होणारा नवरा राहुल यांची देखील फोन वर ओळख वाढत गेली . राहुल दिसायला तिच्या अपेक्षेतला नव्हता पण तिला वाटले स्वभावात असेल  आणि तसा त्याचा स्वभाव पण चांगला असल्याने ती पण थोडी खुश होत होती. असे करता करता दिवस सरत होते आणि त्यांची लगीन घाई चालूं होती.बघता बघता लग्नाचा दिवस आला आणि लग्न व्यवस्थित पार पाडले.
       नवीन जोडपं नव्याची नवलाई सर्व काही ते अनुभवत होते .आता बरेच दिवस उलटले होते आता त्यांना वेध लागले त्याच्या नोकरी च्या ठिकाणी जाण्याचे..दोघांनाही आई  वडीलांपासून दूर जावेसे वाटत नव्हते परंतु नाईलाज असल्याने ते लवकरच तेथून निरोप घेऊन शहरात परतले.. आता फक्त घरी दोघेच असायचे राहुल सकाळी आपल्या व्यवसाय च्या ठिकाणी जात तर रात्रीच घरी येत असे..असे काही दिवस जाऊ लागले आणि  सोनाली  स्वतःला  एकटे समजू लागली.घरातली  काम आटोपून  तिचा बराच वेळ उरत असे. त्यांनतर काही दिवसात त्याच्या घरात बाळाची चाहूल लागली सर्व एकदम खुश होते एका मुलीच्या जन्माने.. असे करत करत दिवस पटापट जात होते.
      मुलगी थोडी मोठी होताच सोनाली ला वाटू लागले आपण आपली डिग्री पूर्ण करावी. कारण तिच्या सोबत च्या मुलींना जॉब ला बघून तिला स्वतःचा राग येई.असा प्रस्ताव तिने घरी मांडला असता  राहुल ने विरोध  केला.  मुलीचे  कारण  सांगितले  परंतु सोनाली  हट्टाला पेटली होती शेवटी मुलीच्या सांभाळा साठी एका बाईची कायम स्वरूपी व्यवस्था करून तिने तिचे ऍडमिशन केले..
       घर कॉलेज असा एकेक टप्पे सोनाली पार पाडत होती . राहुल चे मित्र त्यांच्या बायका व हे असे सर्व मिळून बाहेर सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जात मजा करत..पण म्हणतात ना एवढे सर्व सरळ सर्व घडले तर ते आयुष्य कसले.
       असे सर्व व्यवस्थित चालू होते परंतु सोनाली ला कॉलेज मधील मुलींचे प्रेम प्रकरण बघून मनात सल असे आपल्यावर पण अस आवडणाऱ्या मुलाने प्रेम करायला हवे होते. असे विचार असतांना एकीकडे राहुल ला देखील आपल्या व्यवसायाच्या व्यापातून तिला वेळ देता येत नसे  त्यामुळे  सोनाली  नकारात्मक बनत गेली  आणि  तिला फक्त संसार, मुलगी ह्या मध्ये अडकल्या सारखे वाटत होते. असे असतांना च राहुल चा एक मित्र अनिल आणि सोनाली यांची बाहेर येता जाता ओळख झाली. तो देखील बायको वर खुश नसल्याने त्यालाही वाटे आपली बायको सोनाली सारखी हवी होती. म्हणून नकळतपणे तो तिच्याकडे आकर्षित  होत होता..इकडे सोनालीच्या पण मनांत असेच काहीसे  चालले होते.लग्न लवकर झाल्याने तिला कोणी आवडेल असा वेळ  च मिळत नव्हता. परंतु आता कॉलेज मध्ये जाण्यासाठी मिळणारी मोकळीक, फोन ह्या सर्वांचा ती आता गैरफायदा घेऊ लागली.हळू हळू  अनिल शी तिचा संपर्क वाढत गेला. त्याच्या रूपावर  ती भाळत चालली होती. त्याची पण परिस्थिती वेगळी नव्हती.कॉलेज बुडवून तिचे अनिल सोबत फिरणे वाढत चालले होते .तिला ती एक बॅचलर मुलगी असल्याचा भास वाटू लगला आणि तिला ते सर्व आवडत चालले होते. कारण त्या वयात तिने हे काहीच अनुभवले नव्हते चोरून फिरने वगैरे…
      तिच्या वागण्यातील बदल आता राहुल च्या लक्षात येत होता. सतत फोन वापरणे, बाहेर जाणे, मुलीकडे होणारे दुर्लक्ष यामुळे तो चिंतेत चालला होता.पण त्याला हे सर्व एवढे काही असेल  अशी मुळीच कल्पना नव्हती.त्याने तिला वेळ दिला की आज नाही उद्या बदलेल पण हे  सर्व  दिवसेंदिवस  वाढत  चालले होते.  ती  आता घराकडे अजिबात नीट लक्ष देत नव्हती. आता मात्र राहुल च्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तो आता तिच्या मागे बस स्टॉप पर्यंत  जाऊ  लागला  तेव्हा त्याला लक्षात यायला लागले  की सोनाली कॉलेज च्या  बस ने  न जाता  दुसरीकडे गेली.त्याला आता खप पश्चाताप वाटत होता आपण दिलेल्या स्वातंत्र्याचा.परंतु मुलीकडे बघून, आपला संसार वाचवण्यासाठी तो गप्प बसत असे आज नाही उद्या सुधारेल ह्याच आशेवर.
     मात्र  आता  परिस्थिती  हाताबाहेर  जात होती इकडे सोनाली आणि अनिल चे एकमेकांबद्दल चे आकर्षण वाढत च चालले होते ते सतत आपल्या  साथीदारासोबत त्यांची तुलना करून आपण च किती एकमेंसाठी योग्य आहोत ह्या विचारांवर ठाम राहत. ते आता एकेमेकांशिवाय राहू शकत नव्हते. शेवटी त्यांनी ठरवले की आपण पळून जायचे. आणि असे घडले. परिस्थिती ची जाणीव नसणाऱ्या त्यानां, पुढे  काय  वाढून  ठेवले याचा  काहीही विचार न करता  ते पळून गेले. सोनालीने आपल्या मुलीला देखील सोबत आणले आणि ते एका हॉटेल मध्ये लपून बसले.
       इकडे मात्र राहुल व त्याच्या कुटुंबियांची एकदम बिकट अवस्था झाली होती.हे असे घडले च कसे यावर कोणाचा च विश्वास बसत नव्हता.   त्याचे पूर्ण प्रयत्न चालू होते त्यांना शोधण्यासाठी.  आपल्याच जिवलग मित्रा सोबत आपली बायको पळून जाऊ कस शकते याचे कोडे राहुल ला न उमगणारे होते व त्याला अतिशय वाईट होते की काय कमी केले आपण असे कि आपल्याला बायकोला हे पाऊल उचलावे लागले ते पण लहान मुलगी असतांना…खरं तर यात राहुल ची चुकी नसताना  फक्त  त्याच्या चांगुलपणाचा,  विश्वासाचा सोनालीने फायदा घेतला होता.ते पण क्षणिक सुखासाठी, क्षणिक आकर्षणासाठी.
       अनिल आणि सोनाली काही दिवस बाहेर काढत होते मजा करत होते . नव्याची नवलाई आता संपली होती.म्हणतात ना आकर्षण हे क्षणिक वाटू शकते तसे त्यांचे झाले त्याचे एकमेकांत खटके उडू लागले.इकडे पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करून त्यांना शोधत होते. इकडे अनिल ची बायको आणि एकीकडे राहुल आणि कुटुंबीय त्यांच्या काळजीने ग्रस्त होते.  वाईटाचा शेवट होतोच ह्या पंक्ती प्रमाणे च घडले. काही दिवसात पोलिसांना त्या दोघांना पकडण्यात  यश  आले .इकडे यांचे पण पटत नव्हते.    त्यांना पोलिसांनी पोलीस स्टेशन ला नेऊन त्यांच्या कुटुंबियांना कळवले आता  मात्र ह्या  दोघांना अतिशय अपराधी वाटत  होते  आणि कुटुंबियांना  कसे तोंड दाखवावे ह्या विचारांनी ते घाबरून गेले. काही वेळात च कुटुंबीय आले .राहुल ला आपल्या मुलीला बघून आपल्या भावना लपवता आल्या नाही त्याने तिला घट्ट मिठी मारली आणि आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
        आता प्रश्न त्या दोघांच्या त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारण्याचा होता. तेव्हा राहुल ने स्पष्ट सांगितले की मी बळजबरी करणार नाही तू स्वातंत्र आहेस आपले निर्णय घेण्यास तेव्हा मात्र  सोनालीला आपले  रडू  आवरले नाही .तिने मनात विचार केला  क्षणिक आकर्षणा साठी, बाह्य रूपावर भाळून मी आयुष्यात किती मोठी चूक केली होती. असेही तिला अनिल सोबत राहून च राहुल ची किंमत समजली होती. असेच काहीसे अनिलच्या  बाबतीत पण होते.  त्यालाही  आपली घोड  चूक समजली होती.  दोघांनीही आपल्या साथीदारांची  पोलीस स्टेशन  मधेच माफी  मागून आपण  किती चुकलो हे स्पष्ट केले..त्यांच्या साथीदारांनीही मोठ्या मनाने त्यांना माफ करून पुन्हा अशी चूक न करण्याचे वचन घेतले.
        सामंजस्याने आज दोन संसार तुटता तुटता वाचले होते. याचा आनंद  पोलिसांना देखील झाला.  तेव्हा पोलिसांनी त्यांना  सुनावले की हे सर्व  क्षणिक  असून बाह्य रूपावर भाळून फक्त वरवर गोष्टी बघून प्रेम होत नसते  तर ते  फक्त  आकर्षण असते आणि हे जास्त दिवस टिकत पण नाही.  तेव्हा  कोणीही  उगाच दुसर्याशी तुलना करून आपला संसार बिघडवू नये. व महिला किंवा पुरुष यांनी ही आपल्याला  दिलेल्या  स्वातंत्र्याचा  गैरफायदा  घेऊन  आपल्या साथीदाराला फसवू नये. यातुन आपले व आपल्या मुलांचे नुकसान असते जे भरून निघणारे नसते.हे ऐकून  सर्वांनी  पोलिसांना  दाद दिली व आनंदाने आपल्या घरी परतले.
    टीप-कथा काल्पनिक असून वास्तवाशी संबंध नाही तस असल्यास योगायोग समजावा

(  तात्पर्य एकच सांगायचे  की लग्ना नंतर आपल्या साथीदारांची फसवणूक न करता दिलेल्या स्वातंत्र्या चा गैरफायदा घेऊन घरातील सर्वांचे नुकसान करू नये तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकांना पुरेसा वेळ देऊन संवाद वाढवावा जो एकमेकांच्या नात्याला घट्ट करणारा नक्की ठरेल??)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा