प्रेम “बहिण भावाचं”..!

Written by

©नेहा खेडकर…

प्रेम “बहिण भावाचं”..!

बहीणभाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोत असतात.
आपलीबहीण सुखात राहावी अशी‍ प्रत्येक
भावाची मनोकामनाअसते. बहीण लहान असली तर भाऊ
वडिलांचीच भूमिका पार पाडत असतो. लहान पणी तिला
खेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत . दादाची ती लाडकी छकुलीचअसते. आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वान व्हावे अशीच दादाची इच्छा असते.

अशीच राजुल होती. सगळ्या बहीन भावांमध्ये लहान…म्हणून सगळ्यांचीच “लाडोबा”. एका खटल्याचा घरात वाढलेली ती. सख्ख- चुलत अस काही नव्हतंच तिचा घरात. अगदी हसत खेळत वातावरण होत तिचा घरी. तिचा कोणी विचारलं तिला किती बहीण भाऊ तर अगदी अभिमानाने ती सांगायची ” आम्ही ६बहिणी, ६ भाऊ..”  आणि हे सांगायला तिला कधीच वावगे वाटले नाही. कधी नवीन ड्रेस हवा, कधी पर्स हवी किंव्वा आणखी काही अगदी हक्काने दादा जवळ हट्ट पुरवायची . आणि तिचे दादा सुद्धा अगदी प्रेमाने तिचे लाड पुरवत.

त्या दिवशी “रक्षाबंधनाचा” दिवस . नेहमी प्रमाणे घरात वर्दळ सुरु होती. पण अचानक पोट दुखत असल्याने राजुल एका खोलीत रडत बसली होती. आई ला तिने अनेक आवाज देऊनही तिचा आई पर्यंत ते गेलेच नाही. जेवायला बसायचं म्हणून तिचा दादांची लाडोबा दिसतं नाही म्हणून आवाज देणं सुरु होतं. आज सगळे बहीण भाऊ एकाच
ताटात जेवायला बसणार होते. शेवटी  मोठ्या दादानेच विचारले..

” राजुल कुठे आहे?. अजून दिसली नाही”. तिचा आई ने म्हंटले “अरे असेल इथेच बघ आवाज देऊन”.पण एकाही आवाजाला प्रतिउत्तर नाही मिळाल्याने तिचा शोधाशोध सूरु झाला. एका खोलीत रडत होती चिमुकली. राजुलचा रडका चेहरा बघून तिचा दादा आई वरचं रागावला जरा. “अहो काकू, कधीची आवाज देते आहे ती. तुम्ही लक्ष का नाही देत तिचा कडे. ती हातातली कामे बाजूला ठेवा . होतील ती नंतरही. पहिले तिला बघा. ती जास्त महत्वाची आहे “…

प्रसंग छोटासा होता पण तिचा दादा डोळ्यांतलं तिचा बद्दलच प्रेम तिला आजही अगदी special feel करवत…

स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तीच्या
भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृदयात कायमच जपून ठेवत असते….

©नेहा खेडकर…

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा