प्रेम म्हणजे यातना भाग 2

Written by

बाबा गेले अचानक.. रात्री कळलं त्यामुळे तुम्हा कोणालाही सांगायला नाही जमल. भरपूर पाऊस त्यामुळे गावी फोनही बंद…अस बोलून लावण्याचे वडील रडू लागले.

राहुलचा जीव भांड्यात पडला.. पण लावण्या?? विचारणार तरी कसं. माझी लावण्या कुठे आहे म्हणून.

तोच बाजूच्या काकूंनी विचारलं…

“बाय कुठय आपली, दिसत नाही”.

तिला गावी ठेवलं..आईची देखील तब्येत जरा बरीच नाही. लावण्याचे वडील सांगत होते.

अखेर दोन दिवस सरले.. राहुलने लावण्याला फोन लावला. अखेर फोन लागला रिंग होत होती पण ती उचलत नव्हती. राहुलला ही अशी का वागते काहीच कळत नव्हतं. अर्ध्या एक तासाने राहुलने पुन्हा लावण्याला फोन लावला.

राहुल : अग तु फोन का नाही उचलत आहेस माझा? काय झालं..?

लावण्या : घरी पावणे आलेत. नाही जमलं फोन उचलायला.

राहुल : अग पण एवढ्या दिवसांनी तुझ्या फोनला रेंज अली तर तू स्वतः फोन लावू शकत होतीस ना?? सोड तु फोन सुद्धा नाही लावलास. आणि मी लावला तर अस..

लावण्या : तू खुप पजेसिव्ह होऊन बोलतोयस. नाही जमलं फोन उचलायला. थोडं तरी प्रसंग समजून बोल.

राहुल : पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेत. आपण बोललो नाही लावण्या. तुला कस काही वाटत नाही का? एक तर तू मेसेजसुद्धा नाही केलास. कुठे गेलीस काही कळायला मार्ग नाही.

लावण्या : परिस्थिती तशी नव्हती. तू थोडं समजून घ्यायला हवं.
मला तुझ्याशी वाद घालण्याचा जरासुद्धा मूड नाही मी नंतर बोलते.

लावण्याने रागाने फोन कट केला.

आतापर्यंतचा सर्व राग तिने राहुलवर काढला. तिला खर तर मुंबईला यायचं होत. कामावरून सुट्टी देखील नाही. वडिलांना सांगितलं. पण तूच थांब आजीजवळ अस बोलून तेही निघून गेले. इथे कोणी तरी थांबणं गरजेचं होतं पण आई राहिली असती तरी चालणार होत. मी सगळं आवरून गेली असती कामावर इथे सुद्धा काम करतेच.. पण पप्पांपुढे कोणाचं काहीच चालत नाही.

इथे राहुलला आता खर तर राग आलेला. पण आपणच जास्त अपेक्षा ठेवली तिच्याकडून. तीसुद्धा गडबडीत असेल म्हणून त्याने स्वतःला शांत केलं.

दोघांची देखील एकमेकांवर हक्क दाखवायची सुरुवात इथूनच झाली.

थोड्यावेळाने लावण्याने राहुलला फोन केला..

लावण्या : आय एम सॉरी राहुल.. माझी खूप चिडचिड झालेली आणि मी सगळा राग तुझ्यावर काढला.
राहुल : ते कळलं मला. बट एवढे दिवस झाले तुझ्याशी न बोलता मला नाही जमलं ग राहायला. म्हणून मी पण थोडं जास्तच बोललो.
लावण्या : मला जॉबच टेन्शन आलंय राहुल. मला पंधरा दिवसांच्या वर सुट्टी नाही मिळणार. सरांनी जॉईंट व्हायला सांगितलंय. पण पप्पा समजत नाहीत. आई राहिली असती इथे तर नाही. स्वतः चे वांदे होतील जेवणाचे म्हणून मला इथे ठेवलंय. आई असली की कस सगळं हातात मिळत त्यांना मी कामावर गेले तर जेवण वैगेरे स्वतःच स्वतः वाढून घेऊन घ्यावं लागेल ना.. आ…..

( लावण्याला मध्ये तोडतच राहूल बोलला)

राहुल : हे बघ तू शांत हो. मोठे जे विचार करतील ते आपल्या भल्यासाठी. आणि आजीलाच तुझी सोबत हवी असेल ह्या हिशोबाने सुद्धा ते बोलले असतील. आणि जॉब खूप मिळतील ग. एवढं का टेन्शन घेतेस. अश्या वेळेला ऍडजस्ट करत नाही तुझी कंपनी मग तिथे तू काम न केलेलच बर. आणि मला वाटत की आजीपेक्षा जॉब काही महत्वाचा नाही. जॉब हजार भेटतील पण आजीची सोबत नशिबाने मिळेल ग. तुला माहिती का तू खुपच लकी आहेस कारण तुला आजी आहे. मला अस कोण बोललं असत ना तर मी एका पायावर उभे राहून जॉब सोडला असता.

लावण्याला देखील राहुलच बोलणं पटत होत.

लावण्या : थँक्स राहुल.. नाही तर मी विचार करून वेडी झाली असती.
राहुल : बर झालं वेडी नाही झालीस नाही तर मला पण लोक वेडे बोलले असते..

लावण्या : काय??

राहुल : वेडीचा नवरा वेडा..

लावण्या : राहुल तु पण ना…

आणि दोघेही हसायला लागतात.खप दिवसांनी लावण्या अशी मनमोकळे पणाने हसत होती.

राहुल : ऐकणा एक तुला गुड न्यूज द्यायचीय आणि एक बेड न्यूज. आधी कोणती न्यूज ऐकणार सांग.?
लावण्या : आधी बेड न्यूज ऐकव.. गुड न्यूज ऐकून बेड न्यूज विसरायला मदत होईल.
राहुल : मग ऐक.. मी पुण्याला शिफ्ट होतोय कायमचा आणि प्लिज का म्हणून विचारू नकोस… फक्त गुड न्यूज विचार.
लावण्या : तु अस कस बोलू शकतोस यार.. मी का हे विचारणारच ना.. बर ठिक आहे. गुड न्यूज काय आहे.. मला पुण्यात XXX ltd कंपनीत एज मॅनेजर म्हणून जॉब मिळालाय. मी त्या कंपनीच्या एक्सामसाठी प्रिपरेशन करत होतो. तुला सरप्राइस द्यायचं ठरवलेलं. आणि मी 1st अटेम्प्टमध्येच ती परीक्षा पास झालो.
लावण्या : खरच.. बघ मी बोलली ना तुला. तूझ्या गुड न्यूजने मी बेड न्यूज विसरून जाइल म्हणून. पण तू रोज दिसणार नाहीस ना मला..
राहुल : ए वेडाबाई 3 तास लागतात फक्त पुण्याला जायला. आणि व्हिडीओ कॉल करू शकतो ना.
लावण्या : हम्म ते पण आहे. पण खरच मी खुप खुप खुश आहे. लव्ह यु राहुल
राहुल : लव्ह यु 2 माय स्वीटी…

दिवसांमागून दिवस जात होते. जवळजवळ 1 महिन्याने लावण्या मुंबईत आली. हातात जॉब नाही. खूप चिडचिड होत होती तिची. तिने इंटरविव्ह द्यायला सुरुवात केली. जवळ जवळ पंधरा एक दिवसांनी तिला पाहिजे तसा जॉब मिळाला.

राहुल पुण्याला गेल्यापासून दोघांचंही फोनवर बोलणं असायचं. शिवाय राहुलच्या आई बाबांशीही तीच बोलणं असायचच. राहुलने पूर्ण गावातच लावण्या आणि त्याच्या प्रेमाची कबुली देऊन टाकली होती. आता वेळ होती लावण्याने तिच्या घरी सांगायची. पण राहुलनेच तिला थोडे महिने थांब. आपलं हक्काचं घर होउदे म्हणून सांगितलं होतं. त्या प्रमाणे ती थांबली. राहुल तसा येत होता तिला भेटायला.

राहुलने सूंदर अस घर पुण्यातच बुक केलं. लावण्याला सरप्राइस द्यावं म्हणून तो मुंबईला येतो. लावण्याला कामावर सुट्टी घेऊन राहुल ला भेटायला जाते. राहुल तिला एक हॉटेलमध्ये लंच साठी नेतो.

राहुल : ऐकणं एक सरप्राइस आहे तुला.
लावण्या : आता पुन्हा??
राहुल : हम्मम.. पण आधी डोळे बंद कर. आणि हात पुढे कर.
लावण्या : ओके.

राहुल लावण्याच्या हातात नवीन फ्लॅटच्या किल्ल्या ठेवतो.
राहुल : आता डोळे उघडा राणी सरकार.

लावण्या : कसल्यारे किल्ल्या..?
राहुल : आपल्या रूमच्या…
लावण्या : काय???

लावण्या मोठ्याने ओरडत लंच टेबल वर उभीच रहाते.

राहुल : अग अस काय करतेस सगळे बघत आहेत आपल्याकडे. खाली बस ना..

तशी लावण्या भानावर येऊन खाली बसते.

लावण्या : ए राहुल ऐकणं आता तरी मी सांगू का माझ्या घरी. हे बघ अस फिरताना कोणी आपल्याला बघितलं ना की प्रॉब्लेम होईल.
राहुल : अजून थोडे महिने. हे बघ मी माझी सगळी इन्व्हेस्टमेंट ह्या घरात टाकलीय ग. जर तुझ्या घरचे ऐकलेच नाही तर पैस्यांचा थोडा प्रॉब्लेम होईल. थोडे महिने थांब.

लावण्यालाही राहुलच म्हणणं पटत. दोघेही जेवुन हॉटेलच्या बाहेर पडतात. आणि तिथेच राहुलला आणि लावण्याला तिच्या दादाचा मित्र बघतो. आणि तिच्या भावाला त्याबाबत सांगतो

दादा तसाच हाफ डे घेऊन घरी येतो व वडिलांच्या कानावर ही गोष्ट सांगतो. वडिलांना एकदम धक्काच बसतो.. सगळे आता घरी लावण्याच्या येण्याची वाट बघत असतात. लावण्याचे वडील कधी बाहेर तर कधी आत नुसत्या फेऱ्या मारतात.

ऑफिसमधून सुटण्याच्या वेळेवर लावण्या घरी येते. घरी येताच सगळं घर शांत. घरचे जणू तिच्याच येण्याची वाट बघत होते असे तिला वाटले. तिने हसतच सगळ्यांना विचारल काय झालं??

पप्पा : कुठे गेली होतीस?? तोंड काळ करायला.

लावण्या घाबरून तशीच उभी राहिली. नक्की ह्यांनी मला राहुलसोबत पाहिलं असणार..

लावण्या : ते मी… कामावरूनच येते..

खोट बोलताच भावाचा हात सरळ तीच्या गालावर.

लावण्या खालीच पडली..

पिऊने रडून तिला मिठी मारू लागली. दादाला अडवू लागली.. नको नारे मारू तिला.

दादा : पिऊ तू बाजूला हो.. नाही तर तुला पण मारेल मी.

ए सांगते का आता?? दादा ओरडला…

लावण्या शांतच होती. घरच वातावरण पहिल्यांदाच एवढं बिघडलेल.

दादाने पुन्हा दुसरा हात उचलला..

पिऊ लावण्याला मिठी मारून वाचवत होती.

माझं प्रेम आहे राहुलवर.. मला लग्न करायच आहे त्याच्याशी.

लावण्याची आई खालीच बसली.. पिऊ तशीच आईकडे धावत गेली. इथे दादा देखील लावण्याला मारायला लागला. पप्पांनी त्याला थांबायला सांगितलं. पण तो ऐकत नव्हता.

तोच लावण्याच्या बेगेतला फोन वाजला. दादाने लावण्याचा मोबाईल बेगतून काढून तो फोडून टाकला.

दादा : पुन्हा त्याला भेटायचा किंवा त्याच्याशी बोलायचं प्रयत्न केलास तर याद राख..

उद्या पासून हिच बाहेर जाण बंद. काही गरज नाही नोकरी करायची. दादा घरातील लोकांना सांगू लागला.

लावण्या : तुझं झालं तर माझंही ऐक. मी राहुलशीच लग्न करणार.. आणि जर कोणी अडवलं तर मी जीव देईल.

आता वडिलांचा राग अनावर झाला. ते देखील रागाच्या भरात उठले.

लावण्या : तुम्हीच बाकी होतात. आता तुम्ही पण या… गळा दाबून मारून टाका मला पण मी राहुलशीच लग्न करेल. नाही तर कोणाशीच नाही..

( लावण्या किंचाळून सांगत होती)

घरात एवढा मोठा आवाज ऐकून आजू बाजू वाले गोळा झाले..

इज्जत पूर्ण चव्हाट्यावर निघालेली बघून लावण्याच्या पप्पांना घाम फुटला. एक कळ छातीतून निघाली आणि ते खालीच कोसळले.

पप्पा…. म्हणून दादा ओरडला.

सगळ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले.

इथे घरी लावण्याची आई लावण्याला दोष देत बसली.

जर ह्यांना काय झालं तर आम्हा दोघांच्या मड्यावर रड. कोण कुठचा पोरगा तो त्याच्यासाठी बापावर आवाज चढवलास तु.

लावण्या शून्यात नजर घालून बसलेली. काय पुढे होणार तिला कळतच नव्हतं.

अश्यातच घरातला फोन वाजला. पप्पांना आय सी यु मध्ये शिफ्ट केलंय.

दुसऱ्यादिवशी लावण्याची आई, लावण्या आणि पिऊ पप्पांना बघायला गेले. दादा रात्रीपासून तिथेच होता. रात्रभर झोप नसल्याने लावण्याला बघताच त्याचा पारा चढला.

दादा : हिला कश्याला आणलस तु इथे. उरला सुरला जीव घेईल ती इथे पण पप्पांचा..

तु चल माझ्याबरोबर घरी म्हणून दादाने लावण्याचा हात पकडून तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढू लागला.

पिऊ : ए दादा राहू दे नारे.. चुक झाली तिच्या हातुन.

लावण्या नुसती रडत होती.

तोच डॉक्टर आले.

डॉक्टर : हे बघा पेशंटला कोणत्याही प्रकारे मानसिक त्रास देऊ नका. त्यांना हा मायनर एटेक येऊन गेलाय. वेळेत इथे आणलंय म्हणून बर. पण ह्या पुढे काळजी घ्या.

एवढं बोलून डॉक्टर देखील निघुन गेले.

लावण्यापुढे जाऊन बाहेरूनच पप्पांना बघते. पूर्ण मशिणींमध्ये पप्पांना अस बघुन तिला घाबरायला होत. ती पुढे येताच तिचा भाऊ देखील तिच्या मागे जातो. तो तिला काही तेही सूनवणार तोच लावण्या चक्कर येऊन खाली पडते..

ए लावण्या… दादा तिला उठवायचा प्रयत्न करतो पण ती उठत नाही.

अंग पूर्ण तापाने फनफनलेले असते.

डॉक्टर म्हणून दादा ओरडतो. डॉक्टर लावण्याला स्ट्रेचरवरून घेऊन जातात. तिला दुसऱ्या रूममध्ये ऍडमिट करतात.

तिला काही तासांनी शुद्धी येते. तेव्हा समोर दादा बसलेला असतो.. दादाला बघताच लावण्या तोंड फिरवते.

दादा : बर वाटत का?

लावण्या काहीच प्रतिसाद देत नाही.

दादा : एवढा पण वाईट नाही ग मी. भाऊ म्हणून काळजी वाटते तुम्हा दोघींची. चांगल्या घरात जावं तुम्ही. हे प्रेम वैगेरे काही नसतं ग. लग्न होऊन दोन वर्ष झालीना मग परत बोलशील ह्या दादाला तु बोलत होतास तेच खरे होत. जर तुला करायचंना फडतुस राहुलशी लग्न तर मी देतो लावून पण एकदा पप्पांचा विचार कर. त्याला तू फक्त 3 महिने ओळखतेस आणि पप्पांना???
लावण्या : मी त्याला नाही विसरू शकतरे दादा.
दादा : प्रयत्न कर माझ्यासाठी नाही निदान पप्पांसाठीतरी.

एवढं बोलून दादा निघुन जातो..

लावण्या राहुल सोबत घालवलेले क्षण आठवत बसते.

इथे लावण्याचा फोन लागत नाही म्हणून राहुल बेचेन होतो.

शेवटी न राहवून तो लावण्याच्याच बिल्डिंगमध्ये रहाणाऱ्या एका मुलाला विचारतो.

त्याच्याकडून त्याला कळत की घरी खुप मोठी भांडण झालीत. लावण्याच्या पप्पांना एडमीट केलंय. आणि लावण्याला सुद्धा. राहुल हॉस्पिटलचा पत्ता विचारतो. पुढचा मागचा विचार न करता थेट हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. सगळे बाबांच्याच वोडजवळ असतात. राहुल शोधत शोधत लावण्याच्या रूममध्ये जातो. लावण्या राहुल ला बघताच उठुन बसते.

लावण्या : राहुल.. सगळं संपलय.. घरी कळलं आपल्या दोघांबद्दल.. ( लावण्या रडू लागते)

राहुल तिचा हात पकडतो.

राहुल : तू शांत हो आधी.

लावण्या : मी कशी शांत होऊ. बाबांना एटेक आलाय. मला काही सुचत नाही.

राहुल : मी बघुन येतो त्यांना.

लावण्या : नको तुला दादा मारेल. तू जा इथून. प्लिज जा.

राहुल : अस काय करतेस.

लावण्या : मला नाही माहीत मी काय करते ते. पण आता तरी तू जा राहुल.

ताई कोणाशी बोलते म्हणून पिऊ पण तिच्या रूममध्ये येते.

राहुलला बघून ती देखील घाबरते.

पिऊ : राहुल तु इथे कसा आलास.
(बाहेरून कोणी येतंय का हे बघतच पिऊ राहुलला विचारते)

राहुल : लावण्या अश्या अवस्थेत असताना मी कसा नाही येणार.

पिऊ : प्लिज दादा यायच्या आत तू निघ इथून. नाही तर पुन्हा ताईला मार पडेल. प्लिज..

राहुल : काय? लावण्या तुला मारलं?

पिऊ राहुलच्या पाय पडत रडतच त्याला बोलते.. प्लिज राहुल आता सध्या तरी तू जा. थोडं इकडच वातावरण थंड झालं की मी स्वतः तुला फोन करते. पण आता जा.

(राहुल पाय मागे घेत)

हे काय करतेस तु.

लावण्या : राहुल प्लिज.

रडलेलं चेहरा करतच लावण्या राहुलला सांगते. आता राहुल ला सुद्धा रडू येत. त्याला जायचं नसत पण तरी तो जातो.

“काळजी घे तिची” अस तो पिऊला सांगतो.

तिच्यासाठी आणलेली फळ तो समोरील टेबलवर ठेऊन निघून जातो.
तो जाताच पिऊ ताईजवळ जाते.. लावण्या तिचा हात हातात घेऊन रडते.

लावण्या : पिऊ मी नाही ग राहू शकत त्याच्याशिवाय.. खुप चांगला आहे ग तो.
पिऊ : हे बघ ताई थोडं हे शांत होइपर्यंत तरी तु जरा माघार घे. पप्पांना काही झालं तर तुला ते प्रेम मिळून हवं तसं सुख नाही ग मिळणार. नेहमी बोचत राहील की आपला संसार बसवण्यासाठी स्वतःच्या आईचा संसार उध्वस्त केलास.

खर तर मोठी लावण्या पण आज पिऊ मोठी होऊन लावण्याला समजावत होती.

क्रमशः

©भावना विनेश भुतल

Article Categories:
प्रेम

Comments are closed.