प्रेम म्हणजे यातना भाग 3

Written by

 

 

लावण्याला त्याच दिवशी हॉस्पिटलमधुन सुट्टी देण्यात आली. वडिलांना देखील आय सी यु मधुन जनरल वोर्ड मध्ये ठेवण्यात आलं. काही दिवसांत त्यांना पण सुट्टी मिळणार होती. दादा हॉस्पिटलमध्ये होता. आई देखील बाबांना डब्बा घेऊन जाणार होती. घरात आता पिऊ आणि लावण्या. लावण्या शून्यातच हरवून गेलेली. जेवण देखील नीट अस जेवत नव्हती. आई खाली उतरून गेली ह्याची खात्री होताच पिऊने धावतच घरात झेप घेतली. बेडवर ठेवलेला मोबाईल उचलत ति लावण्याच्या शेजारी गेली.

पिऊ : नंबर काय?

लावण्या शून्यातच होती.

अग ताई नंबर काय राहुलचा…

लावण्या अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पिऊ कडे बघत होती.

ताई रडत बसू नकोस. दादा येईल हॉस्पिटलमधून अंघोळीसाठी.. लवकर सांग.

9699******

पिऊ : तू बोल त्याच्याशी मी बाहेर बघते दादा येईलच

लावण्याने रडतच फोन कानाला लावला..

राहुल देखील रडतच होता..

राहुल : नाही जमत ग अस राहायला. सर्वाना असच त्रास होतो का??

लावण्या : मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय राहुल. पण मी पप्पांना पण अस नाही बघू शकत. मी पुढे काहीही केलं तर त्यांना पुन्हा त्रास होईल. पप्पांना काय झालं तर मी स्वतःला नाही माफ करू शकत.

राहुल : आणि आपलं प्रेम.

लावण्या : मी काय करू सांग तु..

राहुल : मी नाही ग जगू शकत. एक दिवस तुझ्याशी न बोलता जड जातोय.

लावण्या : हे बघ मला वाटत आपण थोडे दिवस नको बोलूयात. इकडच वातावरण शांत झाल की मी फोन करेल स्वत:

राहुल : लव्ह यु…

राहुलच्या प्रेमाची कबुली न देताच लावण्या फोन ठेवते.

बाहेर जाऊन ती पिऊला घेऊन येते.

पिऊ : बर वाटतय तुला त्याच्याशी बोलून.

लावण्या : मी काय करू ग… हे अस चोरून नाही ग बोलायला आवडत. एवढा त्रास असतो का ग प्रेम करणार्यांना.

पिऊ : मला नाही ग कळत ह्यातलं काही. पण मला ना माझ्या आयुष्यात तीन गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात.

1. ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात त्या करू नये.
2. ज्यांनी दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नये. आणि

तिसरी म्हणजे…ज्या…

तितक्यात दादा येतो..

लावण्या आणि पिऊकडे एक नजर फिरवतो आणि सरळ आत निघून जातो.

अश्यातच 4 दिवस निघुन जातात. पप्पांना देखील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असतो. पण डॉक्टरांनी खूप सूचना देऊन त्यांना घरी पाठवल असत.

लावण्याचे वडील घरी येताच सगळे शेजारी त्यांना भेटायला येतात. पण त्यांची नजर लावण्याला शोधत असते. ती किचनमध्ये एका बाजूला घुडघ्यात तोंड लपवून बसली असते.

हळू हळू सगळे शेजारी निघून जातात. शेवटी बापाचा जीव न राहवून ताई कुठय म्हणून पिऊला विचारलं…

पिऊने इशाऱ्यानेच सांगितलं आत आहे…

बाबांना थोडं चालायला येत होतं. पण अशक्तपणा वाटत होता. ते बेडवरून खाली उतरले. पिऊ त्यांना धरायला पुढे येणार तोच त्यांनी डाव्या हाताची पाची बोट दाखवून थांब म्हणून तिला न बोलताच इशारा केला..

आई देखील किचनमध्येच होती..

लावण्याच्या पप्पांना आत येताना बघताच ती काही बोलणार पण त्यांनी शांत बस म्हणून सांगितले आणि बाहेर हो म्हणून सांगितले.. तशी आई किचनमधून बाहेर गेली.. लावण्याला काहीच कल्पना नव्हती.

पप्पा हळूच तिच्या शेजारी येऊन बसले..

कोणी तरी बाजूला आलंय ह्याची संवेदना लावण्याला झाली.तिने मान वर करून पाहिले तर पप्पा.. पप्पांना बघताच तिला रडू कोसळलं..तिने मिठीच मारली..

लावण्या : पप्पा मला माफ करा.. मी चुकली.. मी तुम्हाला अस नाही बोलायला हवं होतं. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला पप्पा..
पप्पा : आपल्या लेकीचा कधी राग असतो का बापाला.. आहे की मी बरा आता. पण तुझ्याकडून मी अशी अपेक्षा नाही केली होती.

लावण्या : मला माहिती पप्पा अस नाही करायच होत पण झालं पप्पा ते. पण तो खरच चांगला मुलगा आहे ओ…

पप्पा : बर कधी पासून ओळखतेस??

लावण्या : 3 महिन्यापासून.

पप्पा : गाव त्याच

लावण्या : रत्नागिरी.

पप्पा : रत्नागिरीत कुठे.

लावण्या : नाही माहीत..

पप्पा : बर ठिक आहे.. घरी कोण कोण असत??

लावण्या : आई बाबा.

पप्पा : बाबा काय करतात?

लावण्या : शेती.

पप्पा : कसली??

लावण्या : माहीत नाही…

पप्पा : इकडे त्यांचे कोण नातेवाईक रहात का??

लावण्या : माहीत नाही.

पप्पा : त्याच्या आई वडिलांचा कधी फोटो बघितलास.

लावण्या : नाही..

पप्पा : 3 महिन्यात तू नीट त्याला ओळखलं नाहीस तू त्याच्याशी लग्न करणार आहेस..

आई आणि पिऊ दोघेही ऐकत होते..

पप्पा : एक शेवटची इच्छा ह्या बापाची पूर्ण करशील.. हवं तर भीक मागतो समज.. (दोन्ही हात पुढे पसरत) नाद सोड त्या मुलाचा..

लावण्या पप्पांचे दोन्ही हात हातात घेऊन रडु लागते.

लावण्या : मी तुम्ही बोलेल तेच करेल पप्पा..

त्याच क्षणापासून ती राहुलला विसरण्याचा प्रयत्न करते.

दुसऱ्याच दिवशी सकाळी लावण्या नेहमीप्रमाणे तैयारी करते.

दादा : कुठे निघालीस..

बाबा : ती कामावर चाललीय..

दादा : पण बाबा..

बाबा : मला माझ्या मुलीवर पुर्ण विश्वास आहे ती अस काहीच नाही करणार जेणेकरून तिचे वडील पुन्हा मृत्यूच्या दारात लोटले जातील.

नकळत का होईना लावण्याचे डोळे पाणावतात.

ती तशीच कामावर जाते.

ए दि.. थांब ना.. दि…

लावण्या विचारांच्या तंद्रीत हरवलेली असते…

जिन्यावरून उतरतांना तिला राहुल आठवतो.. कशी ती रागावून त्याच्याकडे बघत असते..

पिऊ तिचा हात पकडून तिला थांबवते. अग किती आवाज देते.
डब्बा तुझा..

लावण्या : नको उपवास आहे माझा.

पिऊ : कधीपासून ग.

लावण्या : आज पासूनच समज..

पिऊ : ए वेडाबाई धर.

लावण्या : पिऊ प्लिज मला फोर्स नको करुस.. तु पण जाऊन लवकर तैयार हो. उशीर होईल तुला कॉलेज नाही का तुझं. आधीच खुप लेक्चर मिस केलेस.

लावण्या तशीच डब्बा न घेता निघुन जाते.

कामावर ती पूर्ण कामात गुंतवून घेते स्वतः ला. कामावर रीमा तिची खास मैत्रीण. तिला ती अस काही झालं हे दाखवून देत नाही. पण ती तिच्या चेहऱ्यावरचे भाव बरोबर टिपते.

रीमा : टी टाईम.
लावण्या : ऐकणं खुप काम आहे ग. तू ज मला नाही जमणार यायला.

रीमा तिची चेअर स्वतः जवळ फिरवते.

रीमा : मी करेल तुला मदत. पण तू चल.

ती जबरदस्ती लावण्याला घेऊन जाते.

रीमा : ऐकणं लावण्या कँटीनमध्ये नको आपण खाली जाऊ.. मला टपरीवरचा चहा पिण्याची तलंब आलीय ग.

लावण्या : बर चल..

दोघीही खाली येताच रीमा मुद्यावर येते.

रीमा : काय झालं?

लावण्या : कुठं काय??

रीमा : हे बघ तुला मी चांगलं ओळखते.. सांग नक्की काय झालं ते.

लावण्या : सांगण्यासारखं काही नाही ग..

रीमा : राहुल काही बोलला का? थांब त्याला आता फोन लावुन दम देते मी.

लावण्या : तो काही बोलायला दोघांत बोलणं व्हायला हवं ना ग रीमा.. सगळं संपल ग..,
आणि झालेला प्रकार ती रीमाला सांगते.
रीमा : मग तू काय ठरवलंस..
लावण्या : जर घरचे बोलतील तेच.
रीमा : आणि राहुलच काय??
लावण्या : मला नाही माहीत ग..
रीमा : एकदा नीट विचार कर..
लावण्या : एक बोलू ह्या पुढे राहुलचा विषय नको..

लावण्या डोळे वैगेरे पुसून डेस्कवर येऊन बसते.

आता हे नेहमीचच झालेलं. लावण्या कामावर यायची आणि जायची..

अश्यातच एकदा लावण्या घरी गेली तोच दारात चपला.. कोणी तरी आलेलं दिसत होत. ती आत येताच बाबांनी तिची ओळख करून दिली.

हि लावण्या…

माझी थोरली लेक….

लावण्याने एकदा माणसांकडे नजर फिरवून किचनमध्ये शिरली. तोच आईने तयार केलेलं चहाचे कप तिला द्यायला सांगितले.

तिला कळतच नव्हतं नक्की काय चाललंय ते. तिने त्याप्रमाणे सगळ्यांना चहाचे कप दिले आणि आत जाऊन आपल्याच विचारात गुंतून बसली.

काही वेळाने पावणेही निघून गेले.

लावण्या… बाबांनी आवाज दिला.

मुलाला तू पसंत आहेस.

थोडं आश्चर्य होऊन लावण्याने वडिलांकडे बघितलं. एखादा चांगला दिवस बघुन साखरपुडा उरकून घेऊयात..

मुलगा चांगल्या कंपनीत कामाला आहे. घरी लहान दिर.. आणि…

पुढे काही सांगणार तोच लावण्या किचनमध्ये निघून आली..

आईला कामात मदत करू लागली..

तिला राहुलला धोका द्यायचा नव्हता एकदा तरी त्याला फोन करून कळवाव.. तू देखील पुढे हो तुझ्या आयुष्यात.. माझ्यासाठी असाच राहू नकोस. पण मी हे त्याला नाही सांगू शकत. पिऊला सांगते ती सांगेल.

लावण्या बाहेरील गेलरीत पिऊची वाट बघत बसली. पिऊ येताना दिसताच ती जिन्यावरून पळत खाली गेली.

अग दि काय झालं तुला अस..? पळत का आलीस… पिऊने विचारलं.

लावण्या : ऐकणं.. माझं एक काम करशील.?

पिऊ : हा बोल काय करू..?

लावण्या : राहुलला फोन लाव.. त्याला बोल की लावण्याचं लग्न जमलंय. तिला तुला धोका द्यायचा नाही. पण तीला वडिलांसाठी करावं लागतंय. ती आयुष्यात पुढे जाते तसा तुही पुढे हो.

पिऊ : अग पण दि…

लावण्या : प्लिज काही विचारू नकोस फोन लाव..

पिऊ घरून कोणी बघत का हे बघत लावण्याला खेचतच घरापासून लांब नेते..

आणि राहुलला फोन लावुन फोन स्पीकरवर ठेवते..

पहिली रिंग व्हायच्या आतच राहुल फोन उचलतो जणू तो तिच्याच फोनची वाट बघत असतो.

राहुल : लावण्या किती वाट बघतोय ग तुझ्या फोनची.. जीव द्यावासा वाटतोय तू आयुष्यात नाही तर. मला नको ग अस जीवन. हॅलो.. काही तरी बोल..

पिऊ : मी तिची बहीण बोलतेय..

राहुल : पिऊ लावण्या कुठेय., ती बोलली फोन करू नकोस म्हणून मी फोन देखील केला नाही. पण प्लिज एकदा तरी तिला माझ्याशी बोलायला सांग प्लिज.

पिऊ : ती आता बोलणार नाही तुझ्याशी. तीच लग्न जमलंय. ती तिच्या आयुष्यात पुढे गेली तस तुही जावं अशी तिची इच्छा आहे.

राहुल : ती अस कस करू शकते ग. माझा जर सुद्धा विचार नाही का तिला हे लग्न करताना. लावण्या नाही तर मी नाही. फक्त तिला एकदा बोलायला सांग प्लिज.. त्यादिवशी तू माझ्या पाया पडत होतीस आता मी पडतो. पण प्लिज एकदा….

पिऊ इशाऱ्यानेच लावण्याला बोलायला सांगत होती. पण ती बोलायला तैयार नव्हती. ती तशीच घरी पळाली.

पिऊ : हे बघ राहुल.. ती नाही बोलणार. मी ठेवते.

पिऊने फोन कट केला आणि ती देखील घरी आली..

पिऊ घरी येताच लावण्याच्या वडिलांनी एक हुकूम पिऊ वर सोडला. पिऊ तुझ्या ताईच लग्न जमलंय. तुला सुट्टी घ्यावी लागेल..

पिऊ : अचानक..

पप्पा : आजच ठरलं..

पिऊ : माझे पेपर चालु आहेत. काहीही विचार न करता तुम्ही कस काय तारीख ठरवता.

पप्पा : अग साखरपुडा रविवारी आहे. रविवारी पेपर असतो का?

पिऊ : पेपर नसतो पण अभ्यास असतोना.

पप्पा : खूप अभ्यास करतेस माहीत आहे मला. ते काही नाही. पर्वा ताई आणि तू साडी आणि अंगठी घ्यायला जाऊन या.

पिऊ : मला त्यातलं काही कळत नाही. दादाला सांगा सोबत यायला.

पप्पा : त्याला दुसरी काम आहेत. सुट्या झाल्यात त्याच्या आत्ताच. अजून सुट्या नकोत.

पिऊ : आणि माझ्या सुट्या झाल्या ते. त्याच काही नाही का? मला नाही जमणार. मला कॉलेज आहे.

पिऊचा स्वभावच असा होता …

जे पटत नाही तिथे थांबत नाही।
स्वतःला त्रास करून घेत नाही.

तिने लावण्याच्या लग्नासाठी एका पायावर कॉलेज बुडवल असत. पण तीच खुश नाही तर मी सुद्धा का पुढे होऊन मोठे पण करायचा.

पिऊला खर तर वडिलांच्या वागण्याची चिडच येत असते..

रात्रीच्या जेवणासाठी सगळे जण एकत्र बसतात..

जेवण झाल्यावर पिऊ पुस्तक घेऊन नेहमी प्रमाणे दारात फेऱ्या मारत असते. तोच दादा फोन वर कुणाशी काही तरी बोलत असल्याचा आवाज तिला येतो. ती लक्ष नाही देत. पण हेरवी घरात सगळ्यांसमोर मोठ्या आवाजात फोनवर बोलणारा दादा अस मांजर होऊन कुणाशी बोलतो.. तिने हळूच कानोसा घ्यायच ठरवले. पण काही ऐकू येईना.

मग ती दुर्लक्ष करते.

एक तास होऊन गेला. पिऊला सुद्धा झोप येत असते.. ती झोपायला जाते.. घरात सगळे तसे झोपले असतात. पण दादाच्या मोबाईलमधून पडणारा उजेड ती बघत बरोबर तिच्या जागेवर जाऊन झोपते.

पिऊ सुद्धा झोपून जाते..

बोलता बोलता साखरपुढ्याचा दिवस उजाडतो.

क्रमशः

©भावना विनेश भुतल

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.