प्रेम म्हणजे यातना भाग 4

Written by

साखरपुड्याच्या दिवशी लावण्या शून्यातच होती. तिच्या मैत्रिनी तिचा मेकअप करत असतात. मुलांकडच्या लोकांनी सांगितल्या प्रमाणे साखरपुडा हॉलवर ठेवण्यात येतो. लावण्याने मुलगा काय करतो कसा दिसतो काहीच बघितलं नव्हतं. ना तीच ह्या बाबतीत मत विचारात घेण्यात आलेल. पिऊला तिच्या ताईच अस उदास रहाणं बघवतच नव्हतं पण तिच्या हातात देखील काही नव्हतं. दादा आणि वडील पुढे हॉलवर गेले असतात. गावावरून आजी देखील आली असते. उरली सुरली मंडळी गाडीत बसून हॉलवर जाणार असते. सगळीच मंडळी आता मागून निघणार होती. पिऊ ताईच्या तोंडावर हसू बघण्यासाठी एक एक कॉमेंट करून तिला हसवण्याचा प्रयत्न करत होती. पण सगळं व्यर्थ जात होतं.

ताई एक सेल्फी काढुयात ना दोघींचा..नंतर तू काय जिजुंसोबतच असशील. मग काय त्यांची परमिशन घ्यावी लागेल मला..

लावण्याने खोट हसु आणत सेल्फी काढण्यासाठी पिऊने समोर धरलेल्या मोबाईल समोर उभी राहिली.

स्माईल प्लिज…

करत एक सेल्फी पिऊने काढला..

तोच मोबाईलमध्ये 1 New Messages अस आलं.

“प्लिज लावण्याला ऑडिओ ऐकव 🙏🙏”

मेसेज राहुलकडून होता.

पिऊने मेसेज वाचताच एक ऑडिओ आली.

तिने ती ऑडिओ लगेच डाउनलोड केली. ऑडिओ डाउनलोड झाली.

पिऊ हेडफोन शोधू लागली. हेडफोन भेटल्यावर ती लावण्याकडे वळणार पण लावण्या जागेवर नव्हती..

“इथेच बसलेली गेली कुठे?” पिऊ मनातल्या मनात बोलली.

ए पिऊ तो मोबाईक ठेव नि चल.. आईने दारातूनच चप्पल घालत पिऊला आवाज दिला..

आता कस ऐकवू दि ला.. दि तर खाली गेली.

तिने मोबाईल आणि हेडफोन तसाच जवळील पर्समध्ये टाकला..

आणि खाली निघाली..

गाडीत लावण्या बसलेली.. बाजूला आजी..

हॉलजवळच होता.. म्हणून सगळे लवकर पोहचले..

गेट जवळ दिल आकारामध्ये नवरा नवरीची नाव लिहिलेली.

चि. ऋषीकेश💗

चि.सौ.का. लावण्या💗

नवऱ्या कडची मंडळी आधीच येऊन बसलेली. लावण्या ऋषीकेशला पहिल्यांदाच बघणार होती.

हळूहळू एक एक मंडळी जमत होती. इतर मंडळी इथे तिथे व्यस्त आहेत हे बघून पिऊ लावण्या जवळ जाणार तोच एक जवळच्या नातेवाईकांनी तिला आवाज देऊन थांबवलं..

आता तर शक्यच नव्हतं तिला ऑडिओ ऐकवन..

थोड्याच वेळात नवरी मुलीला घेऊन या अस म्हटल्याबरोबर लावण्याची मैत्रीण रीमा आणि पिऊ तिला स्टेजवर घेऊन येतात. लावण्या स्टेजवर आली ऋषीकेश तिच्या सुंदर रूपाकडे बघतच राहिला.. लावण्याची ओटी भरली गेली. लावण्या पुन्हा साडी बदलण्यासाठी आत आली..

पिऊ : तू खरच त्याच्याशी लग्न करणार??

(हळूच पिऊ तिच्या कानात पुटपुटली)

लावण्या काहीच बोलली नाही..

रीमा देखील आता आत आली.. पिऊ तुला बाहेर बोलवत आहे दादा..

पिऊ बाहेर जाते हे बघताच..

रीमा देखील लावण्याला बोलू लागली..

लावण्या पुन्हा विचार कर. मला नाही पटत हे सगळं..

लावण्या कोणाच्याच बोलण्याला रिस्पॉन्स देत नव्हती..

हिरवी साडी.. नेसून ती बसली.. आता बाहेर कधी बोलवतील ह्याची वाट बघत.

बाहेर बोलवताच रीमा तीला बाहेर घेऊन आली

नवऱ्या मुलाने अंगठी घाला..
लावण्या हात पुढे करतच नव्हती.. आपण खूप मोठी चुक करतोय ह्याची तिला जाणीव त्या क्षणाला झाली. मनातला राहुल त्या क्षणाला पुन्हा जागा झाला.

लावण्या अंगठी घालून घेण्यासाठी हात पुढेच करत नाही हे बघताच पिऊ तिच्या हाताला धरून तिचा हात पुढे करणार होती तोच ऋषीकेशने सरळ तिचा हात हातात घेत अंगठी घातली देखील. पिऊ रागानेच ऋषीकेशकडे बघू लागली.

नवरी मुलीने अंगठी घाला.

आता अंगठी घालण्याची वेळ लावण्याची होती. ऋषीकेशला अंगठी घालताना लावण्याचे हात थरथरत होते. थरथरत्या हातातून अंगठी पडते..

अग हे काय करतेस..?

ऋषीकेशच्या आईने स्टेजवरच सगळ्यांसमोर नाराजी व्यक्त केली..

पहिलीच वेळ आहे. घाबरून गेलीय ती.. आणि मुली अश्या घाबरतातच… पिऊने सरळ सगळ्यांपुढे उत्तर देऊन टाकले..

ऋषीकेशच्या वडिलांनी इशाऱ्यानेच त्याच्या आईला शांत केलं.
आणि इथे बाबांनी पिऊला.

तो पर्यंत रीमाने पुन्हा अंगठी उचलून तिच्या हातात दिली..

ऋषीकेशने आपल्या उजव्या हाताची पाच बोट पुढे केली..

लावण्याने थरथरत्या हाताने कशीबशी अंगठी ऋषीकेशला घातली..,
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या….
तशी लावण्या भानावर आली.. एक नजर तिने आता ऋषीवर फिरवली.. दिसायला तो सर्वसाधारण राहुलपेक्षा खुप वेगळा. पण दिसण्यावरून कोणाचीही तुलना करणे हे लावण्याला पटत नव्हत.

केमेरामेन फोटो काढण्यासाठी एक एक पोज सांगत होता. ऋषीचा होणारा स्पर्श तिला नकोसा वाटत होता.

सगळे जण साखरपुड्याच्या शुभेच्छा द्यायला स्टेजवर येत होते. हळूहळू हॉल खाली झाला.

आता शेवटी फॅमिली फोटो काढत होती. नवऱ्याची बहीण नवरीची बहिण आणि मध्ये ऋषीकेश आणि लावण्या…

अचानक ऋषीकेशने लावण्याच्या कंबरेवर हात ठेवला. लावण्याला तर जरासुद्धा आवडलं नाही.. तीने लागलीच त्याचा हात झटकला. हात झटकताना बाजूलाच उभ्या असलेल्या पिऊला तिचा हलकासा धक्का लागला. लगेच ऋषीकेशने हात खाली घेतला..

पिऊने ते बघितलं…

तरी ती शांतच बसली..

फोटो शूट चालु असताना ऋषीकेश जाणून बुजून करणारा स्पर्श लावण्याला नकोसा वाटत होता.

सर्व झाल्यावर उरलेल्या मंडळींना वेफरने भरलेल्या डिशमध्ये समोसे दिले आणि सोबत सरबत देखील.

जेवण ठेवले असते तर बर झालं असत. आमची मंडळी नाराज होऊन गेली असतील आता. लावण्याच्या सासूबाईंनी टोमणा मारला..

लावण्याच्या वडिलांना खजील झाल्यासारखे वाटले. काय बोलावे तेच कळत नव्हतं..

तुम्ही सांगायला हवं होतं तुमचे पावणे साखरपुड्याला जेवायला येतात.. मग नक्कीच ठेवलं असत.. पिऊने पण ताडकन उत्तर दिलं..

लावण्याच्या सासुला अपमान झाल्यासारखं वाटलं समोर येणारी प्लेट तीने नाही म्हणून सांगितली..

बघा तुम्ही हे खात नाही मग तुम्ही जेवण कस जेवला असता.? पिऊने हसतच पुन्हा टोमणा मारला..

पिऊ तु आत जा.. सामान बघ काय ते भरू लाग.. हॉल खाली करायचाय… शब्दाने शब्द वाढू नयेत म्हणून मुद्दामुन दादाने तिला आत पाठवलं..

त्याच काय आहे.. पिऊ लहान आहे अजून..कुठे काय बोलावे कळत नाही.. दादाने पिऊची बाजू सावरत म्हटले..

आणि आजोबा जाऊन 2 महिनेच पूर्ण होत असतील. म्हणून जास्त धुमधडाक्यात नाही जमलं करायला. दादाने आपले मत व्यक्त केले..

अरे राहू दे.. काही होत नाही.. लहान आहे ती.. आणि सुंदर झाला साखरपुडा. ऋषीकेशच्या वडिलांनी समजूतदारपणा दाखवला..

अश्यातच साखरपुडा संपन्न झाला.

सगळे आपापल्या घरी गेले.

त्यादिवशी लावण्याला झोप लागतच नव्हती. अस कस तो मला स्पर्श करू शकतो. तेही माझं मत एकदा न विचारता. पंख्याकडे बघतच ती एकटीच विचार करत होती.. डोळ्यांतून फक्त आसवे ढळत होती. ती कूस बदलून जबरदस्ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. ती जशी फिरली तीच लक्ष पिऊकडे गेले ती तिच्याकडेच बघत होती. देवाजवळून पडणाऱ्या मिनमिणत्या प्रकाशातून तिला ते दिसले. पिऊने तिच्या कानात हेडफोन टाकले आणि राहुल ने पाठवलेली ऑडिओ चालु केली.

“लावण्या मला जगणं नकोस झालाय ग. हे बघ जर माझी लावण्याचं मला मिळत नाही तर मी जगून तरी काय करू. पिऊ म्हटली ग मला तू पण पुढे हो आयुष्यात पण एवढं सोप्प आहे का ग ते.? मला नाही ग जमत. दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार नकोसा वाटतोय मला. लग्न करेल तर तुझ्याशिच नाही तर नाही. पण तू लग्न करण्याआधी एकदा शेवटच बोलना ग माझ्याशी. एवढा वाईट आहे का मी की तू एवढी कठोर शिक्षा देतेस मला. फक्त एकदा बोल लावण्या प्लिज..नंतर कधीच नकोस.. मी जगेल कसाही तुझ्या आठवणीत.. पण शेवटच बोल..

“तू सांगशील ते करेल, तुझ्यासाठी हवं तर मरेल..
पण तुझ्या तोंडून निघणाऱ्या दोन शब्दांनी
एवढ्या दिवसापासूनच आसूसलेलं मन माझं भरेल”

नकोस जीवन झालंय लावण्या.. खूप त्रास नि खूप यातना होत आहेत. खुप आठवण येते तुझी. मला माहिती तू सुद्धा तिथे असाच त्रास करून घेत असशील. अजून नाही ग बोलवत…

पण…

नाही बोलवत ग… खूप रडु येतंय..

बाय..

(राहुलने रडत स्वतः च्या आवाज पाठवलेला ऑडिओ संपला)

ऑडिओ संपताच लावण्याने पिऊच्या कानात एक हेडफोन दिला. आणि पिऊला सुद्धा तो ऑडिओ ऐकवला. पिऊचे सुद्धा नकळत का होईना डोळे पाणावले. लावण्या तर सुन्न झाली राहुलचा आवाज ऐकून.. ती पुन्हा पुन्हा त्याचा आवाज ऐकत होती. कानात हेडफोन घालूनच ती कधी झोपली हे तीच तिलाच माहिती..

(आता पुढे लावण्या करेल का राहुल ला फोन? राहुल लावण्या येतील का एकत्र? त्यासाठी वाट पहा पुढील भागाची)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

Article Categories:
प्रेम

Comments are closed.