प्रेम म्हणजे यातना भाग 5

Written by

 

 

दुसऱ्या दिवशी पिऊ कॉलेजमध्ये गेली. तिचा पेपर होता. सहाजिकच तिला घरी बसुन चालणार नव्हतं. लावण्याने सुट्टी घेतलेली. ती घरीच आईला कामात मदत करू लागली. काम पूर्ण होताच ती बाहेर येऊन पिऊची वाट बघू लागली. पिऊला यायला अजून एक तास तरी लागणार होता. तो एक तास लावण्याला एक वर्षासारखा वाटत होता. शेवटच का होईना तिला राहुलशी बोलायचं होत. ती नुसती बाल्कनीतुन खाली डोकावून बघत फेऱ्या मारत होती. थोड्याच वेळात पिऊ तिला येताना दिसली. लावण्या धावतच जिने उतरू लागली.

पिऊ मला राहुलशी शेवटच बोलायचं आहे.. लावण्याने एका श्वासातच सांगून टाकले.

त्याआधी मला तुझ्याशी बोलायचं आहे दि… पण आता नको.. पिऊ पाठी बघतच बोलत होती.. पप्पा पण पाठुन येत आहेत. तू चल घरी.. दुपारी ही लोक झोपल्यावर बोलू.. पिऊ आणि लावण्या घरी येताच काही मिनिटातच पप्पा पण आले.. मार्केट मधून आणलेल्या सामानाच्या पिशव्या लावण्याच्या आईकडे देत लावण्याकडे पाणी मागू लागले. लावण्याने लागलीच पिऊ कडे बघितलं..

पिऊ कपडे बदलुन बाहेर आली.. आई सगळ्यांची ताट मांडू लागली. लावण्या देखील आईला मदत करू लागली. पिऊ बेगेत पुस्तक चाळू लागली.

आई : पिऊ आधी जेवुन मग बस अभ्यासाला.
पिऊ : हो ग तेच करतेय. पुस्तक काढून ठेवतेय..
आई : आजीला उठव.
पिऊ : हम्मम… ए आजी उठ ग..,

(पिऊ मोठ्यानेच बोलली)

आई : अग हळू.. कधी मोठी होणार तू.? अस कोणी झोपलेल्या माणसाला उठवत का??
पिऊ : मला तर तू अशीच उठवतेस ना..

लावण्या इशाऱ्यानेच आईला शांत व्हायला सांगते.

लावण्या : पिऊ तू जेवायला बस मी उठवते आजीला..

“आजी.… जेवायला उठ बघू”।।

लावण्याने अगदी प्रेमाने आजीला उठवून बसवलं. एक टेबल तिच्या पुढ्यात ठेवला आणि तिच जेवनाच ताट तिने त्यावर ठेवलं आणि पुढ्यातच पाणी भरून ठेवलेला तांब्या देखील ठेवला.

आणि ती सुद्धा जेवायला बसली..

लावण्याला जेवण जातच नव्हतं. पण तरीही कसे बसे दोन घास पोटात ढकलून ती उठली..

पिऊ हात धुऊन बेड वर बसली.. हातात पुस्तक घेऊन ती दुसऱ्या दिवशीच्या पेपरच्या अभ्यासासाठी लागली..

आई आणि लावण्या सगळं आवरू लागले.. पप्पांनी अंथरून घालून ठेवली. थोड्या फेऱ्या मारून सरळ लाईटच बंद केली. पिऊ अभ्यास करते त्याच त्यांना काहीच नाही. आणि पिऊला सुद्धा ह्या सगळ्यांची सवय.. लोकांना सांगत सुटायचं आम्ही मूला मुलीत फरक नाही करत, पण ज्याचं त्यालाच कळत.

ए आई मी अभ्यासाठी गच्चीवर बसते ग.

इकडे मुली अभ्यास करताना लाईट जाते घरची. मुलासाठी घरभर दिवे लावलेले असतात.. स्वतःशीच पुटपुटत पिऊ धाडकन दरवाजा आपटत गच्चीवर जाऊन बसली.

सगळे झोपलेत ह्याची खात्री होताच लावण्या देखील तिचा शोध घेत गच्चीवर आली..

किती उशीर ?? पिऊ लावण्याला बोलु लागली..

अग सगळे आत्ताच झोपलेत.. लावण्या तिला समजावतच बोलू लागली..

लावण्या : मला राहुलशी फोन वर बोलायचंय. शेवटच..

पिऊ : मला पण तुझ्याशी बोलायचंय.

लावण्या : पिऊ आपण कधीही बोलू शकतो ग पण आता इथे कोणी नाही मला राहुलशी बोलु दे..

पिऊने काहीही न बोलता लावण्याला फोन दिला.

नेहमीप्रमाणे एकाच रिंग मध्ये राहुलने फोन उचलला..जणू त्याला माहीत होत ही फोन करेल.

लावण्या : हॅलो…

राहुल : लावण्या….

दोघेही रडु लावले.. एक दोन मिनिटं अशीच शांततेत गेली

राहुल : फोटो छान आलेत.

लावण्या : तुला….???(लावण्या रागातच पिऊकडे बघते)

राहुल : पिऊने दाखवले.. प्लिज तिला ओरडू नकोस लावण्या.

लावण्या मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मी पैश्याचा बंदोबस्त केलाय तू विचार कर पुन्हा हे लग्न करताना. मी तुझी स्टेशनवर वाट पाहिल हवं तर. आपण गावी जाऊ आणि लग्न करू. नंतर तुझे पप्पाही आपलं लग्न मान्य करतील. प्लिज लावण्या…

लावण्या : हे सगळं पिऊने शिकवलं ना तुला. मला माहिती मी ज्या राहुल ला ओळखते त्याचे विचार कधी असे नव्हते. पळुन लग्न करणे हे तुला कधी मान्यच नव्हतं.

राहुल : लावण्या मी वेडा झालोय ग. कामात सुद्धा लक्ष नसत. मला कोणी सांगितले ना की तू अस कर अस बोल तूझी लावण्या तुला परत मिळेल मी ते सगळं करेल ग. एवढं माझं स्वतःवरच नियंत्रण सुटलं. पिऊने आपल्या दोघांनी एकत्र यावे ह्या उद्देशाने मला सांगितलं.. पण तुझ्याशिवाय मला चांगलं कोणीच ओळखू शकत नाही.

लावण्या : तुला माझी शप्पथ आहे राहुल.. तू स्वतःला कधी त्रास करून घेणार नाहीस.. आयुष्यात खूप पुढे जा. मी कुठे काय आहे ह्याचा विचार सुद्धा तु करणार नाहीस. आणि मला भेटण्याचा किंवा माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न नको करुस. हे शेवटच बोलणं..

लावण्या रडतच बोलू लागली.. समोरून राहुल देखील रडतच होता हे तिला जाणवू लागल. लावण्या फोन ठेवायला लागली तिला अजून दोघांतील बोलणं वाढवायच नव्हतं.. पण तोच राहुल देखील बोलू लागला…

राहुल : एक मिनिट…

अस शब्दात अडकवन तुला खुप छान जमत.
आणि तु घातलेल्या प्रत्येक शब्दात मला अडकून जायला. कदाचित तु घातलेल्या ह्या शपथीत सहज अडकून जाईल ग.
कदाचित डोक्यातून सुद्धा काढेल तुझ्या आठवणी.
पण हृयातून…??
हृदयातून होणाऱ्या प्रत्येक ठोक्यातून तु आणि तुझ्या आठवणी पून्हा समुद्रातील लाटांप्रमाणे उसळून येतील..
आणि अखेर त्या लाटांतून होणाऱ्या प्रहरातून हा राहुल विलीन होईल…

तु खुश रहा मी आपणच इथे खुश राहील.. काळजी घे..

बाय..

राहुलने बोलत जावे आणि लावण्याने ऐकाव तसच होत. राहुल बोलत होता ती ऐकत होती. पण राहुलच्या बोलणाऱ्या शब्दांचा अर्थ ती लावून घेत नव्हती..

राहुलने स्वतः फोन कट केला..

तेच तेच शब्द कानावर घुमत होते.

पिऊला तिने फोन दिला.. आता नाही करणार पिऊ तो फोन.

आणि तुही त्याला फोन करायचा नाही.

नियतीला हे मान्य नाही आणि तुही ही गोष्ट मान्य कर..

डोळ्यांतील पाणी पुसत ती खाली निघून येते..

घरातले सगळे झोपले असतात..

आई शेजारी ती उशी टाकुन त्यावर डोकं टेकवते.

चादरीमध्ये स्वतः च डोकं खुपसून खुप रडते.

नेहमी प्रमाणे दिवस जाऊ लागले.. लग्नाचा मुहूर्त ठरविण्यासाठी पुन्हा आता नवऱ्याकडचे येणार होते. रविवारचा दिवस ठरवण्यात आला.

ठरल्याप्रमाणे मुलाकडचे येतात..

तीन महिन्यांतरचा मुहूर्त ठरतो. सगळे खुश होतात शिवाय लावण्या आणि पिऊ..

ऋषीकेश आणि लावण्याला बोलायला मिळावे म्हणुन ऋषीकेशचे वडील मुद्दामूनच लावण्याला ऋषीकेशला सोबत घेऊन जा आणि मिठाई घेऊन ये असे सांगतात…

लावण्या वडिलांकडे बघते.

वडील देखील मानेनेच हो सांगतात.

तिला त्याला घेऊन खाली जण भाग होत.

दोघेही जिने उतरत असताना ऋषीकेश लावण्याकडे तिचा फोन नंबर मागतो.

लावण्या : माझ्याकडे नाही फोन.

ऋषीकेश : काय?? खरच..

लावण्या : हम्मम

ऋषीकेश : मग मला तुझ्याशी बोलायचं असेल तर?? आय मिन आपण बोललो नाही तर ओळख कशी होणार..

लावण्या : तुम्ही पप्पांच्या फोनवर करा फोन.. ते देतील मला..

ऋषीकेश : हम्मम.. पण सारख सारख कस करणार ना त्यांना मी फोन..

मग तुम्हीच फोन घेऊन द्याना तिला…

पाठून पिऊ बोलली..

पिऊला अस अचानक बघुन लावण्याला हायस वाटलं.

ऋषीकेश : तु इथे..

पिऊ : का आवडलं नाही का मी आलेलं..

ऋषीकेश : तस नाही.

पिऊ : एक्च्युली आईनेच सांगितलं कारण इकडच मिठाईच दुकान बंद झालय,. दुसरीकडे एक आहे दि ला माहीत नाही.. हो ना ग दि…

पिऊ : अह… हो…

ऋषीकेशला खर तर आवडलेलं नसत पिऊ अशी मध्ये आलेली. पण कस बोलू दाखवणार??

इथे ऋषीकेशची आई त्यांच्याकडचे रीतिरिवाज वाढवून सांगत होती..

हे बघा आमची काही अपेक्षा नाही. तुम्हाला मुलीला काही द्यायचं असेल तर देऊ शकता नाही तर असच रिकाम्या हाती पाठवू शकता.

पण माझ्या दोन अटी आहेत

१. लग्नाचा खर्च संपूर्ण तुम्हीच करावा आणि

2. आमच्यात अशी पद्धत आहे की, जेवढी आमची मंडळी येतील त्यामध्ये ज्या स्त्रिया असतील त्यांची साडीने ओटी भरावी.. आणि जे पुरुष मंडळी असतील त्यांना शर्ट पीस द्यावे..

लावण्याचा भाऊ आणि वडील दोघेही एकमेकांकडे बघू लागले.

रितिरिवाजप्रमाणे हा खर्च अर्धा अर्धा असतो अस लावण्याचे वडील व भाऊ त्यांना सांगत होते.

पण नवऱ्याकडची मंडळी काही पटवून घेत नव्हती.

शेवटी हो नाही बोलत बोलत अर्धा अर्धा खर्च करण्याचे ठरते.

लावण्याचे वडील : नवऱ्याकडच्या पाच स्त्रियांची ओठी भरायची असते. सगळ्या लोकांची मला कशी जमेल. आत्ताच आजारपणातून मी उठलोय. खूप खर्च झालाय.

निदान तुम्ही तरी समजून घ्या.

ऋषीकेशच्या वडिलांकडे बघत लावण्याचे वडील बोलू लागले.

ऋषीकेशचे वडील : हिला काही कळत नाही. तुम्हाला जमेल तसं करा. आमची काही हरकत नाही.

ऋषीकेशची आई : जर तुम्ही सगळं ठरवणार होतात तर मला बोलवलं नसत तर चालल असत..

लावण्याची आई : हे बघा ताई, तुम्ही नाराज होऊन कस चालले? आपण बघु कस ते.

विषय जास्त तानु नये म्हणून लावण्याच्या आईने समजूतदारपणा दाखवला.

बसत्याला कधी बसायचं..? नवरी मुलीला मंगळसुत्र वैगेरे तुम्हाला बनवावे लागेल ना. लावण्याच्या वडिलांनी विचारले..

मंगळसूत्र आम्ही बनवून ठेवलय. आणि तिलाही आवडेल.

लावण्याचे आई वडील एकमेकांकडे बघू लागले.

थोड्याच वेळात लावण्या आणि ऋषीकेश येतात..

ऋषीकेशचे वडील लावण्याला सगळ्यांना मिठाई द्यायला सांगतात..

काही वेळांनी पावणी मंडळी निरोप घेऊन निघतात.

लावण्याच्या घरच्यांना मूलाकडच्यांच वागणं पटलं नसत.

पण आता काय??

(लावण्या आणि ऋषीकेशच लग्न होईल?? पुढील भागाची प्रतीक्षा करा.)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

Article Categories:
प्रेम

Comments are closed.