प्रेम म्हणजे यातना भाग 6

Written by

 

 

 

वडिलांना आता थोडं फार वाटू लागलं की खूप घाई तर नाही ना होत.? तस पण हे मागणं लावण्याच्या आत्याने आणलेलं. स्वतःच्या बहिणीवर त्यांचा फार विश्वास. तिने चौकशी केलीच असेल. शिवाय नवरा मुलगा हा तिच्याच शेजारी राहणारा होता. पण आतल्या आत त्यांचं मन त्यांनाच खात होत. शिवाय लावण्याची तब्येतसुद्धा दिवसेंदिवस उतरत चालली होती. डोळ्याखालील जमलेली काळी वर्तुळ जणु सांगत होती हे लग्न नको पण…. स्वतः ला त्यांना ह्या बाबतीत दोष द्यायचा नव्हता.. आणि जमलेले लग्न मोडायच देखील नव्हतं. हे असंच चालू राहील.

अश्यातच शनिवारी लावण्या ऑफिसमधून बाहेर निघाली. रीमाला बाय करून ती पुढे येणार तोच तिला ऋषीकेश दिसला.

लावण्या : तुम्ही अचानक.??

ऋषीकेश : तुझ्या पप्पांना विचारला मी तुझ्या ऑफिसचा पत्ता. म्हटलं सरप्राइस देऊयात. बाजूला हॉटेल आहे.. तिथे जाऊन बोलूयात?

लावण्या : हम्मम..

दोघेही बाजूला हॉटेलमध्ये गेले.

ऋषीकेश : काय खाणार तु???

लावण्या : मला नको काही. मी नुकतीच चहा पिऊन निघालीय ऑफिसमधून..

ऋषीकेश : काही तरी घे. आय मिन डोसा ओर सॅंडविच..

लावण्या : तुम्ही घ्या ना. मला खरच नकोय.

ऋषीकेशने ही तिला जास्त फोर्स नाही केलं.

ऋषीकेशने स्वतःसाठी कॉफी मागवली.

ऋषीकेश : ऐक ना तुला वाईट वाटणार नसेल तर बोलू का?

लावण्या त्याच्याकडे थोडं आश्चर्य होऊन बघू लागली.

लावण्या : हम्मम बोला

ऋषीकेश : हे बघ तु हे अस जिन्स वैगेरे घातलेलं मला नि माझ्या घरच्यांना नाही पटणार. आय मिन एक वेळ मला चालेल बट माझ्या आईला अजिबात नाही. सो ह्यापुढे नको जिन्स घालूस.

लावण्याने त्यावर काय बोलावं हे तीच तिला समजत नव्हतं. ती निशब्द पने ऐकत होती

लावण्या : उशीर होतोय आपण निघुयात का?

ऋषीकेश : चल मी सोडतो तुला घरी..

लावण्या : नको मी जाईल. 7.15 ची बस येईलच.

एवढं बोलून लावण्या तिथुन निघाली.

ऋषीकेशला नीट बाय ही न करता ती सरळ बस मध्ये चढली. घरी येऊन तिने कोणालाच ह्याबद्दल सांगितलं नाही. पण त्यानंतर तिने जिन्स घालुन ऑफिसला जाण टाळलं.

अश्यातच लावण्याच्या कामावर दरवर्षी प्रमाणे ख्रिसमस पार्टी होती. सर्वाना लाल ड्रेस घालून यायला सांगितलं. लावण्याकडे लाल रंगाचा ड्रेस नव्हता पण शर्ट होत. आणि एक दिवसात ड्रेस घेणं म्हणजे आणि ते ही एका दिवसासाठी?? हा विचार करून तिने आईला सांगितलं. आई बोलली की जिन्स घाल त्यात काय होत. तिने त्यादिवशी ऋषीकेश तिला काय बोलला हे आईला सांगीतिल..
आईला तर रागच आला. पण आता साखरपुडा झाला तर मुलीची बाजू पडकी.. दोघींचं बोलणं पप्पा ऐकत होते.

पप्पा : लावण्या …

पप्पांनी आवाज दिला..

जा घालून उद्या जिन्स.

पण पप्पा ते….

पप्पांनी तिला हातानेच थांबायला सांगितले.

मी ऐकल सगळं. आणि एक दिवसाचाच प्रश्न आहेना तु जा घालून.

लावण्याला खप बर वाटल दुसऱ्या दिवशी ती जिन्स घालून गेली. ऑफिस सुटल्यावर सगळे जण ग्रुप फोटो काढत बसले. लावण्या ही काही क्षणांपुरत का होईना आयुष्यातला दुःखाचा डोंगर बाजूला ठेवून त्यात मिक्स झाली. संगळ्यांचं फोटो शूट झालं. घड्याळात साडे सहा वाजून गेलेले. घरचे काळजीत असतील म्हणून तिने घरी फोन लावण्यासाठी रिमाकडे फोन मागितला. रिमानेही दिला.

लावण्या थोडी गृपमधून बाहेर येऊन पप्पांशी बोलु लागली. आणि आताच निघाली.थोडा उशीरच होईल हे देखील सांगितलं.

अचानक समोरून ऋषीकेश आला.

लावण्या त्याला बघून घाबरूनच गेली.

ऋषीकेश : अस घाबरायला काय झालं..?

लावण्या : ते तुम्ही अचानक…

ऋषीकेश : ओहह व्हावं तुझ्याकडे फोन आहे तर.. मग मला का खोट सांगितलं..?? माझ्याकडून हवा होता तर तस सांगायचं होत.. घेवुन दिला असता. मला खोट बोललेलं नाही आवडत.

लावण्या : एक मिनिट तुमचा गैर समज होतोय..

ऋषीकेश : इथे कामावर काय करायला येतेस ते पाहिलं मी माझ्या डोळ्यांनी मला काही ऐकायचं नाही. तुला संगीतलेलं मला हे असे कपडे घातलेले नाही आवडणार. तु का घातलेस.?? तुझ्याशी बोलणंच व्यर्थ आहे. सोड..

ऋषीकेश सगळ्यांच्या पुढ्यातुन रागणेच निघाला.

रीमा पाठून येऊन लावण्याला सावरते…

रीमा : लावण्या कसला चक्रम माणूस आहे ग हा… तुझं काही ऐकून न घेताच निघाला..

लावण्याने देखील एवढ्या दिवसांपासून साठवून ठेवलेला अश्रूंचा बांध सोडला.

लावण्या : मला नाही ग जगावस वाटत रीमा.. मी नाही राहू शकत अस.. मला वाचव ह्यातून..

रीमाने शांत रहाणं पसंत केलं.

आणि कसं बस तिला बस मध्ये बसवल. ती घरी पोहचली का ह्याची खात्री केली तिने..

लावण्या घरी जाताच पप्पांचा चेहरा पडलेला. आई देखील नाराज होती. तिने पिऊकडे बघितलं. पिऊने डावा डोळा मिटुन पिऊच्या भाषेत हॅप्पी वाली स्माईल तिला दिली. म्हणजे नक्कीच ऋषीकेशने घरी फोन करून काही तरी सांगितलंय.

लावण्या कपडे वैगेरे बदलून बाहेर आली.

पप्पांनी इतर कुठला विषय न काढता थेट मुद्यावर हात घातला.
पप्पा : ऋषीकेश आलेला का तिथे ?
लावण्या : ……हम्मम
पप्पा : त्यांना तुझं कामावर जाण. पुरुषांप्रमाणे जिन्स घालुन हिंडण पसंत नाही.

लावण्या डोळ्यांत पाणी आणून पप्पांकडे बघत होती.

पिऊ : म्हणजे तिने तिला हवं ते करूच नये का पप्पा..

पप्पा : अग पण तिच्या घरच्यांना नकोय तर आपण काय करायच. आणि काही गरज नाही नोकरी करायची. तिचीच दग दग होईल. उद्या पासून तु कामावर जायचं नाही..

लावण्या येणार अश्रू पुसत बाहेर जाऊन बसली.

दरवाजाला कुलूप असणाऱ्या राहुलच्या खोलीत एक टक बघत होती. जुन्या क्षणांत ती हरवून गेली.

घरात सर्वांनाच वाईट वाटत होतं पण कोण दाखवुन अस देत नव्हत.

पिऊला देखील खूप वाईट वाटल..

पिऊने विडाच उचलला दि ला तीच प्रेम पुन्हा मिळवून द्यायचं..

दादा येताच सगळी जण जेवायला बसण्याच्या तैयारीला लागली.

आई माझं नेट पॅक संपल.. मी खाली जाऊन रिचार्ज करू का??

दादा : एवढ्या रात्री… वेडी झाली का.?

पिऊ : अरे मैत्रीण नोट्स चे पीक देणार होती व्हाट्सए वर.. मला उद्या ओरडा पडेल.

दादा : मी वाय फाय देतो. उद्या सकाळी रिचार्ज कर..

पिऊ : ऐकणं मी तिला तुझा नंबर देऊ का ती तुला करेल.

दादाने देखील जास्त विचार न करता हो म्हटलं,.

पिऊ : पप्पा फोन द्याना तिला फोन करून सांगते..

पिऊने सांगितल्याप्रमाणे तिची मैत्रीण तिला नोट्स चे प्रिंटशॉर्ट पाठवु लागली..

एक एक पीडीएफ डाउनलोड होऊ लागली.

सगळे जेवायला बसले. जेवुन झाल्यावर दादा नेहमी प्रमाणे मोबाईलमध्ये घुसला.

पिऊ पण सर्व काम आटोपुन बाहेर आली..

पिऊ : ए दादा मोबाईल दे ना.. मला नोट्स लिहायला बसायचय.

आता कुठे दादाची ट्यूब पेटली. म्हणजे मोबाईल हिच्या जवळ राहणार.

दादा : तु तुझ्याच मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायच ना.

पिऊ : अरे वा रे वा.. तुला विचारूनच केलं ना मी.,

दादा : एक काम कर वाय फाय ऑन कर मी पाठवतो.

पिऊ : अरे पण बघू तर दे. मला सगळंच नकोय.. उगाच स्लो होईल तुझं नेट..

दादानेही मागे पुढे न बघता मोबाईल फक्त 5 मिनिट हा.. एवढं बोलुन दिला.

5 मिनिट भी बहोत बडा टाईम हे दादु…

एवढं बोलुन पिऊने दादाचा मोबाईल घेतला..

दादा तिच्या शब्दाचा अर्थ लावत बसला..

पिऊने दादाच्या मोबाईल मधून तिला हवी ती माहिती एकदम बरोबर काढून घेतली.

धर मला हवं त्याचे मी फोटो काढून घेतलेत. बेस्ट ऑफ लक..,
पिऊने अति उत्साही पणे दादाला बोलून टाकलं..

पिऊ : तुला थेंक यु म्हणायच का??

(आपली मान नकारार्थी फिरवत…) हो….

पिऊ जरा जास्तच लाडात आलीय अस समजत दादाने तिला इग्नोर केलं.. आणि नेहमीप्रमाणे तो बाहेर जाऊन फोन वर बोलत उभा राहिला..

(पिऊने दादाचा मोबाईल का घेतला?? नक्की काय चालू आहे तिच्या मनात..?? लावण्या आणि ऋषीकेशच लग्न होईल का थाटामाटात.. त्यासाठी प्रतीक्षा करा येणाऱ्या शेवटच्या भागाची… शेवटचा भाग लवकरात लवकर पोस्ट करण्याचा माझा प्रयत्न असेल)

 

 

क्रमशः

©भावना विनेश भुतल

Article Categories:
प्रेम

Comments are closed.