प्रेम म्हातारं झालय…!!

Written by

त्यादिवशी आजोबांचा ३५वा लग्नाचा वाढदिवस होता.
सकाळपासून आजोबा खूप खुश होते सकाळी लवकर उठून आजोबांनी बागेतली मोगऱ्याची फुलं आणली आणि गजरा माळायला सुरवात केलेली. आजोबांचा वय जरी ७० असल तरी आजोबा त्यांचा काळातलया देवानंद सारखे रोमँटिक होते, आजोबांचे आजीवर जीवापेक्षा जास्त प्रेम होते आणि आजोबांना एक गोष्ट समजली होती, जस वय वाढत जात तस प्रेम सुद्धा वाढत जात. आजोबा प्रत्येक लग्नाच्या वाढदिवसाला समुद्राच्या किनाऱ्यावर आजीला घेऊन जात आजीची आवडती चणा चाट हातात घेऊन समुद्रावरून पायाचे ठसे उमटवत चालायचे आणि त्यांचा नेहमीच जागेवर जाऊन, पाण्यात पाय टाकून गप्पा मारायचे.

आजोबांचा गजरा माळून झाला आणि आजोबा संध्याकाळची वाट बघू लागले. नवीन धोतर घालून आजोबा निघाले, सूर्य मावळतीला आला आणि ते निघाले लाटांच्या आवाजाकडे. सूर्य मावळत होता, मस्त हळुवार वारा सुटला, लाटांचा आवाज कानावर येत होता, नारळाची झाडे सूर्यप्रकाशात अजून सुंदर दिसत होती.! नेहमीप्रमाणे आजीचा आवडता चणा चाट घेतला आणि चालत चालत किनाऱ्यावर येताना पायाचे ठसे जणू मूर्तिकार मूर्ती कोरतोय असे दिसत होते,
पाय पाण्यात ठेवले आणि गप्पा मारायला लागले.

आजोबा ३५ वर्षातील सगळ्या गोड-कडू आठवणी आठवत होते. आजोबा म्हणाले तुला आठवत का? एकदा तुझ्यासाठी गजरा आणला होता,गजरा द्यायला तुझ्याजवळ जवळ आलो, सगळे मोठे मंडळी बसली होती, घरात बरेच पाहुणे होते, सगळ्यांनी मला विचारला हातात काय आहे हो बाबुराव? तेंव्हा माझी किती पंचायत झाली होती ?
, मला काय सांगावे सुचेना !मी हात पुढे केले आणि बोलले आई साठी गजरा आणला होता , तेवढ्यात पांडुरंग काका म्हणाले “आई साठीच आणलास ना नक्की? कि बायको साठी आणला आणि आईसाठी चालवला !!! तेंव्हा किती हसलेले सगळे घरात मला.

असा एक एक क्षण आठवत आजोबा समुद्राच्या पाण्यात पाय ठेऊन गप्पा मारत होते.. ! ज़सा जसा सूर्य मावळत होता तशी किनाऱ्यावर गर्दी वाढत होती..! आजोबा मात्र स्वतःच्या दुनियेत व्यस्त होते सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य , भिंगाच्या चष्म्यातुन पाणावलेले डोळे आणि मनात जुन्या आठवणी …..

आठवणीत रमलेले असतांना अचानक एक दगड आजोबांच्या पाठीला लागला, आजोबांनी पटकन मागे वळून बघितला तर २-३ तरुण मुलं होती, आजोबांनी विचारला ” काय रे बाळा ? का दगड मारलास मला?”

त्या तरुणांपैकी एक जण म्हणाला ” येड दिसतय म्हातारं , पिऊन आलाय वाटतं, कधी पासून बघतोय एकटाच बडबड करतोय”?
शेजारी कोणी नाही कोणाशी गप्पा मारताय काय माहीत कधीपासून ?

आजोबांनी त्याच्याकडे बघितलं आणि पाहून हसले आणि म्हणाले “बाळा, मी काय वेडा वैगेरे नाही रे, ये बस तुला सगळं नीट सांगतो…
आजोंबांनी सांगायला सुरवात केली,

आज आमच्या लग्नाचा ३५वा वाढदिवस, प्रत्येक वाढदिवसाला आम्ही इथे यायचो आणि बराच वेळ गप्पा मारत बसायचो, मी आणि आमच्या ह्या!
जरा शांत आणि लाजाळू च होती ती, पब्लिक मध्ये हाथ जरी पकडला तरी लाजायची, आणि ती लाजते म्हणून मी मुद्दामून च हात पकडायचो..

ती जाऊन १० वर्षे झाली, पण प्रत्येक वाढदिवसाला मी इथे येतो आणि तिला भेटतो, आणि मी काय एकदा नव्हतो बडबड करत.. हा बघ तिचा फोटो..
मी बोलत असतो आणि ती उत्तर सुद्धा देते माहितीये? ह्या लाटा आहेत ना ! लाट जर जोरात आली तर मी समजतो कि ती हसतेय , लाट दूर गेली तर मी समजतो कि रुजतेय आणि लाट आलीच नाही तर मी समजतो कि रुसलीये,
ह्या जगात ती नसेल, पण माझ्या मनात ती शेवट पर्यंत असेल,!
ह्या फोटो ला मी घेऊन प्रत्येक वाढदिवसाला येईन आणि तिच्याशी गप्पा मारेन..! अस म्हणत आजोबांनी तरुणांच्या चेहऱ्याकडे पहिला आणि त्याचा डोळ्यात सुद्धा अश्रू होते, त्यांना त्यांची चूक समजली होती,
पण आजोबा मात्र मोठ्या मनाचे होते, situation सावरायला आजोबांनी विचारला ” काय मग तुला नाही का कोणी girlfriend ?” तू करतो की नाही कोणावर प्रेम?

त्यातला एक तरुण म्हणाला” हो आजोबा, पण आज काल तुमच्या सारखा प्रेम नाही करत कोणी”

आजोबा हसत हसत म्हणाले ” प्रेम सुद्धा म्हातारं झाला वाटत”!!

आज काल सगळं प्रॅक्टिकल झाला ओ आजोबा! प्रेम वैगेरे काही नाही !

आजोबा पुन्हा म्हणाले ” प्यार करने के लिये दिल चाहीये दोस्तो.!

मग आजोबांनी प्रेम म्हणजे नेमका काय सांगायला सुरवात केली .!!!

आजोबांची प्रेमाची व्याख्या काय हे बघूया नेक्स्ट ब्लॉग मधे ,
हा ब्लॉग कसा वाटला कंमेंट मध्ये जरूर कळवा ..!

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा