#प्रेम!!!.. विवाह… !!! भाग. 1

Written by

माधव ने लवकर गाडी काढली आणि ताबडतोब हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला.. मीरा ला खूप त्रास होत होता.. मीरा माधव च्या नावाचा जप करत होती.. labour रूम मध्ये मीरा ला आता घेऊन गेले !! 

मीरा ची कंडिशन क्रिटिकल आहे अस डॉक्टर नी माधव ला सांगितले.. 

माधव खूप हताश झाला होता त्याच्याजवळ कोणीही नव्हतं.. मीरा आत होती..!

मीरा च ऑपेरेशन चालू होत.. माधव ला काहीच सुचत नव्हतं.. तो फक्त देवाचा धावा करत होता.. दोघे सुखरूप राहूदे म्हणून.. !!

माधव आणि मिरच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती.. पण त्यान्च्या खऱ्या अर्थाने संसार चालू होऊन 2 वर्ष झालेली होती.. आणि आज त्यान्च्या प्रेमाच्या वेलीवर फुलं उमलणार होत.. पण क्रिटिकल केस असल्यामुळे माधव खूप चिंतेत होता.. !!

लहानपणी पासूनच माधव एक साधारण, माध्यम वर्गीय घरातील हुशार मुलगा.. दिसायला चार चौघांत उठून दिसेल असा..गव्हाळ रंगाचा. तो फारसा मुलींशी बोलायचा नाही..मित्र पण जास्त नव्हते.. शांत शांत असायचा नेहमी!! क्लास मध्ये नेहमी top 5 मध्ये असणारा.. मेहनती होता. 

एकदिवस त्याला ती दिसली.. ती म्हणजे रिया.. एकदम गोरी, उंच, केस जास्त लांब पण नव्हते आणि एकदम लहानपण नव्हते.. तिला सूट होयचे… काळे.. सरळ.. एकदम सुंदर दिसायची ती!!. 

सोबत तिला तिच्या सौन्दर्याची जाणीव होती.. त्यामुळे ती राहायचीपण एकदम छान..तिला पाहताच त्याला ती आवडली..! आणि त्याला हे जाणवलं होत कि तीपण त्याच्याकडे चोरून पाहते.. त्यामुळे हा अजूनच घायाळ, दिवाना.. !

रिया दिसायला खूप सुंदर.. त्यामुळे माधवच काय अजून बरेच मजनू होते अवतीभोवती तिच्या.. हळू हळू त्या दोघांचा रोजचा झालेलं एकमेकांना बघायचा.. दोघांची घर जवळच होती. कॉलेज वेगळे होते, क्लास पण माधव एक वर्षाने सिनिअर होता रिया ला. 

दोघाच्या नजरभेट एक महिना चाललेली .. तोवर माधव ने तिची सगळी माहिती काढली.. कुठे कोणत्या वर्गात आहे .. सगळं.. !!

माधवला ती मनातून आवडली होती.. त्याच्यासाठी सर्व तिच्या भोंवती फिरायचं.. त्याला फक्त एकच वेड लागलं तिला पाहण्याचं..मुलींशी न बोलणारा माधव ला आता मात्र रियाशिवाय काहीच सुचत नसे… ! आणि तिला हे सर्व छान वाटू लागलं..

घर जवळ जवळ होते.. मित्र कॉमन होते.. त्यामुळे तिला त्यान्च्याकडून समजलं कि माधव ला ती आवडते. त्याने तिच्यासाठी केलेली धडपड.. तिला पाहण्यासाठी केलेला आटापिटा… हे सगळं तिला भारी वाटायचं..ते वय च असत अस.. तस.. !

यांचं एकमेकांना पाहणं असच चालू होत. माधव तिला पाहण्याव्यतिरिक्त बाकीची हिम्मत करत नव्हता.
रिया मात्र बोल्ड होती..

एकदिवस ती स्वतःहून याच्या जवळ आली. आणि स्वतःहून तो तिला आवडतो अस सांगून निघून गेली.. 

माधव तर खल्लास झालेला.. काही दिवसांनी माधव ने ती आवडत असल्याची कबुली दिली आणि त्या दोघान्ची प्रेमकहाणी चालू झाली.. 

12 वी च वर्ष होत माधव च आणि ती 11वी मध्ये.. माधव हुशार होता.. अभ्यासू होता पण त्याच आता जास्त लक्ष तिच्यामध्ये च असायच..याचा परिणाम त्याच्या result वर झाला.. 11वी मध्ये खूप कमी मार्क्स मिळाले.. 

तरी माधव ला तिच्या सामोरं सगळं व्यर्थ वाटे.. !! माधव च्या घरी सगळं समजायला वेळ नाही लागला.. 

रिया अभ्यासात अजिबात हुशार नव्हती.. तिला त्यात आवड पण नव्हती.. तिला life एन्जॉय करायची इतकंच माहित होत.. घरची परिस्तिथी खूप चांगली होती त्यात अति लाडाची. !!

हे म्हणजे अगदीच 11वी च प्रेम..! जेंव्हा कोणी आपल्याकडे बघत हेच खूप भारी वाटतं असत.. माधव एरवी मुलींशी न बोलणारा तिच्यामध्ये खूप गुंतला.. त्याला आता फक्त ती आणि तीच दिसत होती.. ! 

रिया च मात्र एकदम उलट.. रिया मोकळ्या वातावरणात वाढलेली.. लाडातली मुलगी होती.. मुलं मुली.. मित्र मैत्रिणी हे भरपूर होते तिला.. तिला माधव आवडायचा.. पण तीच माधवसारखं नव्हत..म्हणजे फक्त आणि फक्त तु अस रिया च नव्हतं.. तिला च माहित नव्हतं काय होत ते.. 

माधव चे जवळ चे मित्र होते त्यांनी माधव ला समजून सांगितलं.. अभ्यासाकडे लक्ष दे पण माधव तिच्यासोबत तिच्या प्रेमात वाहत होता… !

माधव च्या एका मित्राने तिला दुसऱ्याचं मुलासोबत एकदा पाहिलं.. त्याने माधव ला warn केल कि रिया तुझ्यासाठी योग्य नाही.. तु दूर राहा तिच्यापासून.. माधव ने त्यालाच सुनावलं.. !!

माधव अखंड बुडालेला होता तिच्या प्रेमात त्याला काहीच दिसत नव्हतं.. !!

घरी समजल्यावर घरचत्यांनी समजावलं पण माधव ऐकेल तर.. !! माधव आंधळा बनून प्रेम करू लागलेला तिच्यावर. 

एकदा रिया ची क्लास ची ट्रिप जाणार होती.. रिया अर्थातच जाणार होती.. माधव ला हे अस आवडत नसे.. त्याने तिला जाऊ नको सांगितलं. तिने हट्ट केला आणि माधव ला तीच म्मन नाही मोडता आलं.. त्याने तिला काही अटी घातल्या.. तिने होकार दिला.. ट्रिप ला गेली.. 

माधव ने त्याच्या मित्राला सोबत घेतलं आणि तिची जिथे ट्रिप गेली तिथे जायचं ठरवलं.. 

माधव गेला तर त्याच त्यालाच विश्वास बसत नव्हता.. रिया ने त्याला प्रॉमिस केलेलं कि त्याने जे सांगितलं तसंच करेल..!! पण actual मध्ये रिया ते सगळं करत होती.. जे माधव ला पटत नसे.. 

दुसऱ्या दिवशी रिया माधव ला साफ खोटं बोलत होती.. तिने माधव ला असच सांगितलं कि तु सांगतील तसंच केल मी.. 
आता मात्र माधव भांबावला… त्याचा जो blind ट्रस्ट होता त्याला धक्का लागलेला..

आता तर त्याच एकच काम ठरलेलं.. तिच्यावर पाळत ठेवायची… ति कुठे जाते..? काय काय करते? कोनकोनाशी बोलते..? 

या सगळ्यत त्याची exam जवळ येतेय.. आपल्या आई वडिलांना काहीतरी अपेक्षा असतील आपल्याकडून हे विसरूनच गेला.. 

हळू हळू त्याचे मित्र त्याला जे सांगत होते ते त्याला पटू लागलं.. 
त्याने तिला दुसऱ्या मुलाला भेटताना बघितलं…मैत्रिणीच्या फोनवरून त्याच्याशी बोलताना बघितलं.. !!! 

माधव कोसळला.. !! त्याला वाटत होत कि हे खोटं निघावं… ती माझी रिया नसावी.. पण ती रिया च होती .. !!!

माधव ने तिला भेटून सगळं clear करायचं ठरवलं.. 
तिने सुरवातीला सगळं नाकारलं.. मी अस नाही केल वगैरे… आता मात्र माधव चा राग अनावर झाला.. त्याने रागात तिच्यावर हात उगारला… तेंव्हा पोपटासारखी सगळं बोलू लागली.. 
माधव ने तिच्या तोंडून सगळं ऐकून घेतलं.. त्यावर तो तिला म्हणाला.. तुझ्यावर मी इतकं जीवापाड प्रेम केल… आणि तु अस कस वागलीस… !??? काही बोलण्यात अर्थच नव्हता.. 

तो तिथून निघणार तेवढ्यात तिने त्याचा हात पकडून रडू लागली.. sorry बोलू लागली.. 

ती म्हणाली, “मला तु आवडतो.. तुझं माझ्यावर प्रेम करण आवडत.. तु माझी काळजी करतो ते आवडत.. पण मला सुजित पण खूप आवडतो .. तो दिसायला तुझ्यापेक्षा स्मार्ट आहे.. आणि त्यालापण मी आवडते.. 
तो मेडिकल ला आहे.. मला तो खूप अदोगरपासून आवडायचा.. पण मधेच आपण भेटलोत आणि तु मला बघायचा ते आवडायचा.. पण त्यानंतर काही दिवसांनी सुजित ने स्वतःहून मला भेटून त्याच्या मनातलं सांगितलं.. त्यालापण मी आवडते अस समजल्यावर मी खूप खुश झाले आणि मग आम्ही दोघे बोलू लागलो.. भेटू लागलो.. मला तुला दुखवायचं नव्हतं पण काहीच समजत नव्हतं काय करू ते.. “

माधव म्हणाला, “म्हणून तु वर्षभर मला फिरवलास,..? “

माधव तिथून निघून गेला. माधव साठी हे खूप विचित्र होत.. यातून बाहेर पडणं सुद्धा कठीण होत.. त्याने जिला त्याच विश्व बनवलं होत तिने त्याचा खूप मोठा विश्वास घात केला होता.. तो यातून खूप मोठा धडा शिकला..

त्याला यातून सावरायला time लागला.. त्याच चक्क महत्वाचं वर्ष तिच्यात गेलं होत.. फायनल exams आलेल्या..

पण त्याच्याकडे वेळ कमी होता.. निदान पास होणं तरी गरजेचं होत.. तुटलेला माधव अभ्यास करू लागला.. रात्र रात्र जागून.. दिवसरात्र एक केली.. आणि पास झाला घरच्यानी सगळ्या गोष्टीची एव्हाना कल्पना आलेली.. घरच्यन्नी त्याला पुढच्या शिक्षणसाठी दुसऱ्या शहरात पाठवला.. 

रिया आणि सुजित बद्दल सर्वांना माहित झालेलं .. रिया अधून मधून माधव ला फोन करून बोलायची.. 

रिया ला सुरवातीपासूनच शिक्षणाची गोडी नव्हतीच.. नावाला शिकत होती.. graduation करत होती.. आणि सुजित मेडिकल.. !!

दोघे शिक्षण झाल्यावर लग्न करणार होते.. 

माधव ने यातून बाहेर पडायचं ठरवलं.. आणि माधव बाहेर पडला.. माधव ने भूतकाळ.. त्या कडू आठवणी.. त्याचा प्रेमभंग सगळं तिथेच सोडून पुढे निघून आला हे पक्क मनात ठरवून कि पुन्हा प्रेम नाही करायचं कधीच.. माधव पूर्ण बदलून गेला.. त्याने जीवापाड प्रेम केल तिच्यावर.. तिने मात्र.. !!

पुढे रिया आणि माधव च्या आयुष्यत काय होत.. मीरा कशी भेटते.. हे पुढच्या भागात.. भेटू लवकरच.. !!

ही कथा काल्पनिक असून याचा कोणाशी कसलाही संबंध नाही.. आणि असला तरी तो योगायोग समजावा.. 

सौ. प्रिया महेश पुरी. 
फोटो: google. क्रमशः 

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.