प्रेरणादायी स्थान ..आई!

Written by

प्रेरणादायी स्थान ..आई!

वसुंधरा म्हणजे माईंच्या घरची “वसू..” त्यांच्याकडे घरकामाला असायची. कपडे, भांडे ,घरचा स्वयंपाक सगळं करायची . कधी सोबत तिच्या मुलीला सुद्धा घेऊन यायची. त्यामुळे कधी वसू कामावर गेल्यावर सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी हिच्याकडे. घरातील सर्व कामे सुद्धा तीच करायची. खरं तर लहान वयात जबाबदारी आली असून सुद्धा आपल्या सगळं संभाळायची…!

वसू एकदिवस शाळेला सुट्टी म्हणून जयाला आपल्या सोबत कामावर घेऊन गेली. माईंच्या घरी त्यांची नात जयाच्या बरोबरीची होती. माई त्यांच्या नातीचे लहान झालेले फ्रॉक जयाला देऊ केला. पण दिवाळीचे बक्षीस सोडता ती कधीच काही मागत नव्हती. पण प्रत्येकाला मुलीला वाटत असत की आपल्याकडे नवीन फ्रॉक, खेळणी असावी. छानसा पलंग असावा. अभ्यास करायला खुर्ची टेबल असावा. एखादी छान बाहुली असावी. पण नेमकं माणसाची परिस्थिती , आणि पैशाची तंगि आड येत असे. तिच्या सगळ्यां इच्छा, आकांक्षा ती कधीच व्यक्त करीत नसे. ती माईंना नको म्हणायची… “दुसऱ्या जवळ काय आहे ह्या पेक्षा माझा जवळ जे आहे तेच माझ्यासाठी महत्वाचे …” त्यातच आनंद मानायची. आणि स्व बळावर आपल्या मुलीचे लाड पुरवायची.

आपण शिकू शकलो नाही पण आपली पोर शिकावी आणि खूप मोठी व्हावी हेच स्वप्न ती मनाशी बाळगायची. तिच्यासाठी जीवतोड मेहनत करायची. आईची मरमर जयापासून लपलेली नव्हती. स्वतः वसू उपाशी राहून आपल्या मुलांना पोट भरेल एवढं अन्न नक्कीच बनवत असे. हळूहळू जया मोठी होत गेली. तिला वसुने चांगल्या शाळेत टाकले. अभ्यास आणि शाळा सांभाळून आईला आपल्या परीने जया होईल तशी मदत लहानपणापासून करीत असे.

स्वतः मेहनतीच्या जोरावर जया आपली IAS ओफिसर बनायचे स्वप्ने रंगवू लागली आणि हळूहळू आपल्या सोयीने आणि स्वाभिमानाने पुर्ण करण्याची जिद्द ठेवत राहिली.आपल्याकडे पैशाची कमतरता आहे , अशी खंत तिच्या डोळ्यात कधीच दिसली नाही. “यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी हवी, हे समीकरण तिच्या ठाई वसू मुळेच आले होते.”

घरी विजेचे बिल खूप येणार म्हणून रस्त्यावरच्या प्रकाशात सुद्धा अभ्यास करीत असे. कारण दिवसभर आपल्या साठी लढणाऱ्या आईचे चित्र तिच्या डोळ्यासमोर येत असे. तिचा कामातील सातत्यता आणि अगत्यपूर्णता हेच तिचे मोहून टाकणारे पैलू होते . पाठिशी छोटी जया असतांना नवरा अचानक घरुन निघून जाणं तिला सहन झालं नाही. ती निराश झाली पण हरली नाही. आपल्या मुलीला मोठे जिद्दीने आणि कसोशीने वाढविले.

त्यामुळे जयाची प्रेरणा तिची आईच होती….!

प्रेम, कष्टाळू वृत्ती आणि समाधानी प्रवृत्ती माणसाला खूप मोठं बनविते. मोलकरीन आई असली तरी जयाने आईच्या सावलीत आणि स्वकर्तृत्वावर जीवापाड मेहनत करून स्वतः ची स्वप्न सत्यात उतरवली. एका टीव्हीवर तिची मुलाखत बघून वसूचे डोळे आनंदाने भरुन आले. तुमच्या ह्या यशाचे शिल्पकार , तुमचे प्रेरणा स्थान कोण असे विचारले असता ,” माझी आईच माझे प्रेरणा स्थान ,माझे सर्वस्व आहे ..” हे जयाने अगदी अभिमानाने सांगितले. बालपणीच्या बऱ्याच आठवणींना सगळयांसोबत वाटले.

आपली आई आपल्यासाठी नकळत सगळं काही करुन जाते. कशाचीही अपेक्षा न करता ,तेव्हा आपणही आपल्या आईला आनंद होईल, अभिमानाने ती आपले नाव सगळ्यांना सांगेल असे काही तरी केले पाहिजे….असं ती म्हणाली…

जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माँ…
इक दिन चमकूँगा लेकिन, तेरा सितारा हूँ माँ…!

म्हणतं तिने आपल्या मुलाखतीची सांगता केली…..

धन्यवाद…!
कथा आवडल्यास तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत ….!

तुमचीच
©नेहा खेडकर✍❤

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत