फक्त एकच विनंती….?

Written by

© सौ.योगिता विजय टवलारे ✍

श्रेया माझ्या मावसबहिणीची मुलगी…

नुकताच वाढदिवस झाला…??

खूप सुंदर दिसत होती ती..आता कुठे १० वर्षांची झालीय..पण तिला किती कळायला लागलंय?? हलकं पण किती छान मेकअप केले तिने?? आधीच गोड दिसणारी श्रेया आणखी सुंदर दिसतं होती…
अचानक तिच्या बाबतीत मी insecure झाले..

तिची काळजी वाटायला लागली..
तिचाच विचार चालू असताना ताईचा फोन आला… ती सुद्धा श्रेया बद्दलच बोलत होती… दोघींनाही सारखीच काळजी-“आपल्या मुलीची सुरक्षितता…”
तेव्हाच कळलं की, “श्रेया तिच्या आत्याकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत एकटीच गेलीय.. ?

२ दिवसा आधीच श्रेयाच्या आईचा( माझी मावस बहीण )फोन येऊन गेला..तेव्हा मी म्हणाले तिला की आईकडे ( उन्हाळी सुट्ट्यांमध्ये) येतांना दोन्ही मुलींना सोबत घेऊन ये..त्यांना जर घेऊन येत नसेल तर तू पण येऊ नको म्हणाले..??

आणि आम्ही दोघीही बहिणी श्रेयाच्या आईवर (मावसबहिणीवर)चिडलो की, “एकटीला का पाठवलस??? एकतर खेडेगाव विचित्र लोकं विश्वास ठेवू की नको त्यात ती आता मोठी होतेय आणि सुंदर ही दिसते , त्यामुळे लोकांच्या विचित्र नजर पडणार याचीही भीती..?

तुला कितीदा सांगितलं की तिला कुठेही जायचं असलं तर तुझ्यासोबत घेऊन जातं जा म्हणून?? ☺
एक तर गावं चांगल नाही, नको ते प्रकार तिथे घडतं असतात..वयाची सत्तरी पार केलेला म्हातारा विनयभंग करायला माघे पुढे पाहत नाही..मग का तिला पाठवत राहते त्या गावाला?? ?

ती म्हणाली, अगं बरोबरच आहे तुझं..पण काय करणार?? नाती जपावी लागतात..तिच्या आत्याचाही लळा आहे श्रेयाला..☺ सुट्ट्या लागल्या की श्रेयाच सुरू होऊन जातं, आत्याकडे जायचं ! तिच्या मैत्रिणी आतुरतेने वाट बघतात तिची..मन नाही मोडवत तिचं..

आणि तिच्या आत्यालाही वाटेल नाहीतर की मावशीकडे पाठवता येतं पण आत्याकडे नाही?? मला दोन्ही नाती सारखीच ..नको काळजी करू अगं ! माझ्या नणंद बाई नाही एकटं सोडत तिला..☺

खरंतर प्रत्येक वेळेला नाही जमतं माझं तिच्या सोबत जायला..घरी सासूबाई आजारी असतात..मी गेले की ह्यांची जेवणाची आबाळ..जाऊबाई आहेत पण त्यांच्या एकटीच्या भरवश्यावर सगळी कामे टाकून घरातून पाय नाही निघत अगं ! ?

त्यानंतर आम्ही बरचं काही बोलत राहिलो..पण माझं मन नव्हत मानत..मुलींना एकट नाही सोडवत आणि घरात डांबूनही ठेवता येत नाही..किती ती काळजी?? खरंतर जे व्हायचं ते कुठेही होऊ शकतं..मग ते शहर असो वा खेडेगाव..नकळत मला माझे लहानपणीचे दिवस आठवलेत..?

बाबांच्या ड्यूटीमुळे आईचं सगळं सांभाळायची..बऱ्याचदा लग्न, वाढदिवस,रिलेशन्स मधले फंक्शन ती एकटी अटेंड करायची ..कारण बाबांना वेळ नसायचा..तिला बऱ्याचदा मुक्कामी सुद्धा राहायला लागायचं..?

अश्यावेळी मग मी एकटीच घरी असायचे..मला कधी भीती वाटली नाही..शेजारी असायचे पण ते तरी किती लक्ष देणार?? त्यामुळे मी एकटीने राहायची सवय करून घेतली..शेवटी आपल्याला स्वतः ला खमक राहता आलं पाहिजे, एवढंच मनाशी ठरवलेलं..?

मी स्वतः ला प्रोटेक्ट करू शकते हेच कायम माझ्या मनात रुजत गेलं..त्यामुळे मी एकटी असले तरी स्वतः च असं कधी टेंशन आलं नाही..पण आता?? ह्या जनरेशन आणि माझ्या जनरेशन मधला फरक जेव्हा लक्षात येतो, तेव्हा मुलींबद्दल insecure फिल होतं…?

तेव्हा मी माझ्या बाबतीत confident होते पण तसंच आता श्रेयाला ही वाटतं असणारच ना?? आणि नसेल तर , तशी खात्री करून श्रेयाला ती स्वतःची सुरक्षा कशी करायची यासाठी काळजी कशी घ्यावी? याचं शिक्षण द्यावे लागेल..

आता हेच बघा ना , घरी लग्न होतं तेव्हा श्रेया फक्त ४ वर्षांची होती..लग्नात एवढी गर्दी होती की कोण कुणाचं नातेवाईक तेही कळत नव्हतं..एक व्यक्ती पुढ्यात येऊन श्रेयाचा लाड करू लागला , जसे त्याने तिला कडेवर घ्यायला हात समोर केले ,ती रडायला लागली…

तिला त्याच्याकडे जायचं नव्हतं..तरीही बळजबरी घ्यायचा प्रयत्न करू लागला..मी लागलीच श्रेयाला माझ्याकडे घेतलं..तरीही त्याचं तेचं..म्हणाला , मी हिच्या बाबांना ओळखतो..?

मी त्याला काही बोलले नाही..पण इतक्या रागात त्याच्याकडे बघितलं की तो आपसुकच वरमला..आणि माझ्यासमोरून एका क्षणांत गायब झाला..?

जर तो माझ्या ओळखीतला असता तरीही मी त्याच्याशी अशीच वागले असते..कारण मुलगी व तिचं संरक्षण ह्यापेक्षा मला काहीच महत्वाचं वाटतं नाही..?

पण आता श्रेया मोठी झाली तिला स्वतःच संरक्षण करता यायला हवे प्रत्येक वेळी आपणं मोठं कोणी तिच्यासोबत नाही राहू शकत किंवा राहिलो तर तिला ते आवडणार ही नाही तेव्हा मुलींना स्वतःच संरक्षण करण्यासाठी शिक्षण द्यायला पाहिजे..असं मला वाटतं….

आणखी एक उदाहरण द्यावस वाटतं..

माहेरी आमच्या शेजारी एक कपल राहायचं..त्यांना एक मुलगी होती प्रणिती नावाची..ते दोघेच राहायचे त्यामुळे प्रणीतीला आई आणि बाबा , ह्या दोघांचीच तोंड ओळख होती..ती दोन वर्षाची झाल्या नंतर तिची आई आमच्याकडे खेळायला सोडून जायची…?

प्रणिती सुरुवातीला आई, मी आणि माझ्या ताई कडेच जायची..बाबा नी माझ्या भावाकडे ती फिरकायची सुद्धा नाही.. खरंतर त्यांनी सुद्धा तिला ओळख होईपर्यंत जवळ घेतलं नाही.. पण हळू हळू जशी ओळख होत गेली ती दोघांकडे पण जायला लागली..☺

प्रणिती आणि मी जेव्हाही वाचनालयात किव्वा बाहेर जायचो तेव्हा तिचा कुणीही लाड करायचं..पण मी कधीच, ती स्वतः कुणाकडे जायला “हो” म्हणायची नाही..तोपर्यंत मी तिला कुणाकडे सोपवायचे नाही..मुळात मीच अनओळखी व्यक्तीकडे तिला जाऊ द्यायचे नाही..?

माहिती नाही का?? पण जेव्हापासून कळायला लागलं, तेव्हापासून आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येक लहान मुलींबद्दल फार जागरूक असते मी!?
मला कायम इतर नात्यापेक्षा मुलीचं संरक्षण जास्त महत्वाचं वाटतं..?

मला सर्व वाचकांना फक्त एकच विनंती आहे की, लहान मूल एखद्याकडे जायला नाही म्हणत असेल तर plz त्यांना बळजबरी कुणाकडे सोपवू नका..मग समोरचा व्यक्ती कितीही जवळचा असला तरीही..

शेवटी आपल्या मुलांपेक्षा आणखी महत्वाच तरी काय असत आयुष्यात, नाही का ??

कारणकधीकधीजवळचेचव्यक्तीविश्वासघात_करतात…

लेख कसा वाटला ? नक्की कळवा..

आवडल्यास माझ्या नावासकट शेअर करा , नाही आवडला तरीही सांगा..काही चुकल्यास क्षमस्व!!??

? योगिता विजय?

१३/६/१९

प्रतिक्रिया व्यक्त करा