फक्त चहाप्रेमी नाही चहावेडी मी….

Written by

शितल ठोंबरे….

फक्त चहाप्रेमी नाही चहावेडी मी….
(जागतिक चहादिना निमित्ताने)

जागतिक चहादिना निमीत्ताने मी काही न लिहिणं म्हणजे माझ्या लिखाणाचा घोर अपमान आहे.

मी फक्त चहाप्रेमी नाही चहावेडी आहे…
पहाटे पाचला डोळे चोळत बनवलेला…
पहिला चहा मला तरतरी तर देतोच…
माझ्या दिवसाची सुरुवात चहास्पेशल करतो…
शाळेला निघण्यापुर्वी घेतलेला दुसरा चहा….
चहा पिण्याचं समाधान देऊन तृप्त करतो….
मधल्या सुट्टीत घेतलेला चहा…
काम करायला उत्साह देतो….
दुपारच्या जेवणानंतर दोनचा चहा…
मला पुढच्या कामासाठी रिचार्ज करतो…
थकून भागून संध्याकाळी घेतलेला चहा….
दिवसभराच्या कामाचा सगळा क्षीण घालवतो….
अर्ध्या तासात पुन्हा अर्धा कप चहा घेतला की….
स्वर्गीय आनंदच लाभतो..

असा माझा संपूर्ण दिवसच चहामय असतो
म्हणूनच तर मी प्रसिद्ध आहे…
फक्त चहाप्रेमी म्हणून नाही तर चहावेडी म्हणून…..

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.