फसवणूक तर माझी झाली… 😢😢भाग 3

Written by

फसवणूक तर माझी झाली…. 😢😢भाग 3
✍️✍️✍️✍️✍️©जयश्री कन्हेरे -सातपुते

भाग 3 पुढील प्रमाणे…
स्वाती आणि संजोगच लग्न होतं… फेसबुक वर आलेल्या एका मॅसेज मुळे त्यांचे बोलणे सुरु होते.. नंतर ओळखीत रूपांतर होते.. “सेम पिंच” म्हणतं स्वाती स्वतःला संजोगच्या मनात उतरवून घेते.. मनाच्या तारा जुळल्यामुळे ओळखीच रूपांतर प्रेमात होते.
सामान्य दिसणारी स्वाती.. संजोगसारख्या श्रीमंत, सुसंस्कृत, हँडसम संजोगची बायको देखील बनते…
अल्पावधीत ती घरच्यांनचा विश्वास संपादन करते. समाजकार्यात रुची दाखवून.. संजोगला फक्त नोकरीवर लक्ष केंद्रित करायला लावते. स्वतः मात्र संजोगच्या जागी प्रत्येक ठिकाणी हजर असते. तिने या सहा महिन्यात घरातच नाही तर समाजकार्यात सहभागी कार्यकर्त्यांमध्ये देखील स्वतःची चांगली छबी निर्माण केली होती.
आणि संजोग मात्र त्याच्या नोकरीत व्यस्त होता.. जमेल तसा वेळ तो लग्नानंतर देखील त्याच्या आवडीनिवडीला, समाजकार्याला, घरच्यांना व स्वातीला देखील द्यायचा..
मात्र स्वातीचं त्याला काही कळत नव्हतं आजकाल..
स्ट्रॉबेरी आईस्क्रीम याला आवडायची व तिचं तर “सेम पिंच” असायच प्रत्येक गोष्टीत. त्यामुळे त्याने घरच्यांचा आवडीनुसार वेगळे आणि या दोघांसाठी स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आईस्क्रीम आणले..
स्वातीने लगेच नाक मुरडले.. “मला नाही आवडत स्ट्रॉबेरी ” मी आई -बाबांसाठी आणलेली बादाम -पिस्ता खाते ”
संजोग :- अग पण तूच तर म्हणालीस न मला जे आवडत तेच तुला आवडते.. म्हणून मी आपल्या दोघांसाठी वेगळी आणली. It’s ok तुला जे आवडेल ते खा..
संजोगने ते लाइटली घेतलं.. पण स्वाती मात्र मनात धुसफुसत होती.. रुममधे गेल्यावर तिने तो तिचा राग व्यक्त केलाच. “मी काय खायचं व काय नाही हे देखील तुम्हीच ठरवायचं का? माझी चॉईस बदलू शकत नाही का? आईस्क्रीम आणण्याआधी मला कॉल का नाही केला, तुला कोणत आईस्क्रीम आणू म्हणून? ”
संजोग :- अग पण त्यात इतकं रागवायला काय झालं.. मी तुला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खा म्हणून जबरदस्ती तर नाही न केली..?? तूच म्हणायचीस न तुम्हाला जे आवडते तेच मला आवडते. म्हणून मी सहज म्हणालो…
स्वाती :-जाऊ द्या… आता तुम्ही मीच कसा खरा हेच पटवून द्याल..
संजोग तिचा राग घालवण्यासाठी जरा रोमँटिक होऊन तिला जवळ घ्यावं म्हणून तिच्या जवळ जातो तर ति त्याला झिडकारून.. “मला झोप येतेय good Night ”
त्याला वाटलं… हिचा मूड खराब झाला.. असू दे.. सकाळी बोलेल तिच्याशी.. हा देखील झोपी गेला.
त्यानंतर कितीतरी वेळा असे प्रसंग आले जिथे संजोगला.. स्वातीचं “सेम पिंच” आठवायचं आणि तो तिला गृहीत धरून कधी एखादी वस्तू, कधी एखादा पदार्थ, कधी तिच्यासाठी सरप्राईज म्हणून एखादा ड्रेस आणायचा.. पण हिच आपलं ठरलेलं नाक मुरडन.. ते तसचं सुरू होतं, प्रत्येक गोष्टीत “मला नाही आवडलं” असं म्हणून संजोगंच मन ती मोडू लागली…
एव्हाना संजोगला विचारात पडला… “95%आवडीनिवडी जुळत होत्या चॅटिंग करताना.. आणि आता प्रत्येक गोष्ट हिला वेगळी का लागते माझ्यापेक्षा..? 🤔🤔🤔🤔 त्याला पडलेलं हे कोडं न सुटणार होतं.
यातून म्हणजेच स्वातीच्या बोलण्यातून “मला आवडत नाही.. तुम्ही नेहमी तुमच्या मानाचं करता, माझ्यावर निर्णय थोपवता, तुम्हांला वाटत ही आपल्यापेक्षा कमी शिकलेली आहे म्हणून तुम्ही मला काहीच महत्व देत नाही. मला वाटलं तुम्ही खुप समजदार आहात. सामान वागणूक द्याल पत्नी म्हणून. पण तुम्ही देखील इतरांसारखेच आहात. ”
संजोग :- अग तुला तुझ्या आवडीने काहीही घ्यायला मी मनाई नाही न केली.. पण तूच म्हणायचीस न आपल्या आवडी एकसारख्या आहेत त्यामुळे मी मला आवडलेली वस्तू, ड्रेस आणतो तुझ्यासाठी.. पण गेला महिना झाला तुला माझी एकही गोष्ट आवडत नाही. सारखी चिडचिड करतेस.. मी बोलायला, समजवायला गेलो तर माझं न ऐकता मला झिडकारतेस.
तुला प्रेमाने मिठीत घ्यायला गेलो तर. आणखी लांब जाते.. गेली आठ दिवस झाले मी जवळ आलो की तुला झोप येते.. मग काय करायच काय मी?
अशा छोट्या छोट्या नोकझोकीच प्रमाण वाढलं दोघात.. संजोग प्रत्येक वेळी नमत घेत होता.. त्याचा स्वभावच तसा सामंजस होता.
त्याच्या सहनशक्तीचा अंत होत होता.. हे सगळं का असं होतं आहे..? हेच न उलगडणार कोडं होतं त्याच्यासाठी. त्याचे तिला समाजवण्याचे सर्व प्रयत्न विफळ होतं होते.
आता तर घरच्यांना पण याची कुणकुण लागली होती. आणि घरच्यांप्रती देखील तिचं वागणं बदललेलं होतं.
वागण्यात, बोलण्यात उर्मठपणा आला होता… तिच्या मैत्रिणींसमोर ती घरच्यांचा पाणउतारा करू लागली. घरात जी शांती व सुख होतं ते आता नाहीतच जमा होतं.
वातावरण बरंच बिघडलं होतं. आणि हे संजोगला सहन नाही झालं.. त्याच्या शांत स्वभावाला तडा गेलाच आणि भांडणाला सुरुवात झाली. स्वाती हे जाणीवपूर्वक करत आहे हे त्याच्या मनात देखील नव्हते.
स्वाती त्याला इतकं खिजवत होती की त्याने तिच्यावर हात उचलला पाहिजे.
आणि तो क्षण आलाच.. त्या दिवशी स्वातीने संजोगच्या कॅरेकटर वर बोट उचललं. “मी सावळी आहे..तुम्हाला शोभत नाही.. म्हूणन तुम्ही बाहेर माती खात आहे.मला तुम्ही फसवलं, सगळ्या आवडी.. निवडी माझ्यावर लादता तुम्ही.. मनासारखं जगू देत नाही. मला आता जगायचच नाही.. मी मेलेली बरी.. मी मरुनच जाते.. “असं म्हणून ती चाकू घेऊन हाताची नस कापायला बसली..
संजोगला तर काय बोलाव हे कळलंच नाही.. मात्र त्यांच्या चारित्र्यावर उडवलेला चिखल त्याला आवडला नाही.. प्रत्येक गोष्टीत त्याला चुकीचं ठरवून ती खरी होतं होती आणि आज चक्क आत्महत्या करतेय.. अनावधानाने त्याचा हात उचलल्या गेला.. तिच्यावर आणि ती चाकू सोडायला ऐकत नव्हती तर तिच्या कानाखाली आणखी दोनतीन लावल्या त्याने.. इतक्या जोरात की तिच्या गालावर त्याची बोट उमटली.
तिला नेमक तेच हवं होतं.. ती तशीच पोलीस स्टेशनं ला गेली.. घरच्यांविरोधात व संजोग विरोधात घरेलू हिंसा व फसवणुकीचा गुन्हा दखल केला… मेडिकल चेकअप मधे गालावरील हाताचे व्रण व चाकू तिच्या हातातून घेतांना झालेल्या झटापटीत लागलेले चाकूचे तीन चार वार.. जे संजोगला पण लागले होते. मात्र त्याचे ग्राह्य धरले नाही.
घरी पोलीस आले.. संजोगला घेऊन गेले.. घरच्यांना तर हे काय होतं आहे व का हेच कळत नव्हतं.
पोलीस स्टेशनंमधे तो पोटतिडिकीने सांगत होता की “हिला हाताची नस कापण्यापासून वाचवत होतो मी.. आणि ही ऐकत नव्हती म्हणून तिला दोन चापट मारल्या. तिला आता पर्यंत कधीच मी मारलेलं नाही. आजही तिला प्रेमाने सांगितलं पण तिने ऐकलं नाही त्यामुळे मला इच्छा नसूनही तिच्यावर हात उचलला मी. माझा काही दोष नाही. मला असं अरेस्ट कस करू शकता तुम्ही. ”
पोलीस म्हणाले मेडिकल चेकअप मधे तिच्या शरीरावर घाव दिसलें.. आणि हाताला जाळण्याचे डाग देखील त्यामुळे घरेलू हिंसा.. झालेली आहे हे सिद्ध होते.
त्याला आठवलं… पोळ्या करताना हिला तव्याचा चटका लागला होता चार दिवसाआधी.. आणि दोन दिवसाआधी गरम भाजीच भांड तिच्या हातून निसटलं व पायावर पडलं त्याने देखील तिचा पाय पोळल्या गेला होता..
आणि हे सगळं दाखवून तिने घरेलू हिंसा… झाली हे सिद्ध केलं…
क्रमशः… ©जयश्री कन्हेरे -सातपुते
यानंतरच पुढील भागात..
स्वातीने असं का केलं…?
फसवणुकीच्या गुन्ह्यात ती कोणती फसवणून केली म्हणून सांगते?
तव्याचे लागलेले चटके व भाजीच पातेलं पायावर पडणं हा योगायोग होता की स्वातीने विचारपूर्वक, प्रिप्लॅन…. हे आठ दिवसाआधीपासून करणं सुरु केलं.?? 🤔🤔🤔तसही महिना.. दोन महिन्यापासून तिचं वागणं बदललेलं होतं. 🤔🤔🤔ते यासाठी का? संजोगला फसवण्याचा विचार या दोन महिन्यात तिच्या डोक्यात शिरला की फेसबुक वरच्या ओळखीच्या वेळीच हे ठरवलेलं होतं 🤔🤔
हे सगळं पुढील भागात तो प्रयत्न विचार करा.. तुम्हाला काय वाटत ते कमेंट मधे नक्की सांगा.. आवडल्यास like करा शेअर करायचा असेल तर नावासहित शेअर करा.. ✍️©जयश्री कन्हेरे -सातपुते माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा… फोटो साभार गुगल 🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा