फसवणूक तर माझी झाली.. 😢😢भाग
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
©जयश्री कन्हेरे -सातपुते
भाग 1इथे वाचा.. https://m.facebook.com/story.php?
story_fbid=736203230197532&id=581606972323826&sfnsn=scwspwa&funlid=g9K45SrOfGyviVwR
भाग 4पुढील प्रमाणे..
संजोग ने मित्राला फोन करण्याची परवानगी मागीतली पोलिसांना.. त्यानंतर मित्राला तिथे बोलावून सगळं सांगितलं तो मित्रच वकील होता, त्यामुळे यांना त्याने जमानतीवर सोडवले.
घरी परतल्यावर … संजोगला एक एक गोष्ट आठवू लागली… अगदी फेसबुक वरच्या पहिल्या msg पासून ते आज पर्यंत..
किती सोज्वळ आणि सौम्य भाषेत बोलायची स्वाती. सगळ्या गोष्टी अशी करायची जस काही आमच्या सात जन्माच्या गाठी आहेत. तो सगळा दिखावा होता का?
की, मला फसवण्याचा कट होता? 🤔🤔🤔🤔
काही कळत नव्हतं त्याला..
त्याच्या आईला मात्र… सगळा प्रकार लक्षात आला… आपल्या साध्या सरळ मुलाला या स्वातीने गळाला लावल होतं. त्याच्या बाबांची शंका खरी ठरली, या जमान्यात साधेपणाला काडीचीही किंमत नाही. आपल्या मुलाचा फायदा उचलतील, त्याचा साधेपणा त्याला अडचणीत आणेल अशी शंका जी त्याच्या वडिलाला होती ती शंभर टक्के खरी झाली.
मुळातच शांत स्वभावाचा संजोग या प्रकरणाने भांबावून गेला होता. त्याच्यावर, फसवणूक व बायकोला मारहाण करण्याच्या आरोपामुळे त्याच्यावर सगळ्या बाजूने चिखलफेक सुरु होती. “इतक समाजकार्य करणारा, स्त्री -पुरुष समानतेच्या बाता करणारा स्वतः असा फ्रॉड निघाला, बायकोला व तिच्या परिवाराला धोका दिला याने. ” अशा बऱ्याच गोष्टी त्याच्या ऑफिसात, समाज कार्यात असणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये होतं होत्या.
“विश्वास नाही बसत.. संजोग असं काही करू शकेल, इतके वर्ष झाले.. आपण याला ओळखतो पण कधी त्याचा असा स्वभाव जाणवू दिला नाही त्याने. छुपा रुस्तम म्हणतात अशा व्यक्तीला, कुणावर विश्वास ठेवावा असे दोगले व्यक्ती असले तर.. अंदर काही आणि बाहेर काही ”
असं बोलून त्याच्या खरे पणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
त्याला बाहेर तोंड दाखवायला जागा नव्हती. इतका अपमान होतं होता त्याचा, घरच्यांनाही नातेवाईक, शेजारी नको नको ते बोलत होतं. त्यामुळे त्यांना देखील बाहेर निघायला एव्हाना लाज वाटत होती.
“आपण काहीच केलं नाही तरी देखील आपल्याला इतकं सोसावं लागत आहे” हा फार मोठा धक्का होता.. त्यांच्यासाठी. त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर देखील झाला.
इकडे कोर्टात केस उभी राहिली… संजोग विरोधात “फसवणूक आणि शारीरिक प्रतारना, घरेलू हिंसा ” अशी.
नोटीस आल्यावर. त्याने आणि त्याच्या घरच्यांनी मिळून स्वातीला समजवण्यासाठी कॉल केले, घरी जाण्याचा प्रयत्न केला.. पण ती आणि तिच्या घरचे काही एक ऐकायला तयार नव्हते.
उलट “आम्हाला फोनवरून धमक्या देत आहेत आणि घरी येउन पुन्हा मारहाण करत आहे” अशी पुन्हा तक्रार पोलीस स्टेशनला केली त्यांनी.
फसवणूक म्हणजे आम्हाला पेमेंट विषयी खोटं सांगितले, आणि आमच्या कडून भरमसाठ हुंडा घेतला. लग्नानंतर सहा महिने चांगले राहिले आणि नंतर पुन्हा या ना त्या कारणाने पैसे मागत होते. आमच्या मुलीला त्रास नको म्हणून आम्ही सगळं मुकाट्याने सहन करत यांच्या मागण्या पूर्ण करत होतो. पण आता मुलीच्या जीवावर उठले हे लोकं यांना धडा शिकवावा म्हणून आम्ही केस टाकली.” असं स्वाती वर तिच्या घरच्यांचं म्हणणं होतं….
संजोग मात्र पोटतिडिकीने सांगत होता की मी माझी पेमेन्ट स्लिप दाखवली होती.. या लोकांनी बघितली नाही. आणि हुंडा मधे कुठून आला… मी स्वतः याच्या विरोधात आहे.लग्न देखील आम्ही साध्या पद्धतीने केलं. उगाच पैशाचा अपव्यय नको म्हणून… आणि हे का असा आरोप करत आहेत माझ्यावर 🤔🤔🤔??
स्वातीची साक्ष घेतली तेंव्हा… तिने असं काही प्रूफ दिल की तिला झालेली मारहाण आणि चाकूचे वार सिद्ध झाले. तिने कस केलं माहिती नाही पण त्या दिवशी झालेली झटापट तिने शूट केली होती आणि नंतर भावाच्या मदतीने त्यातील तिला हवा असलेला भाग ठेऊन बाकीचा व्हिडिओ एडिट केला. त्यामुळे संजोग वरील मारहाण केल्याचा गुन्हा सिद्ध झाला. जळालेल्या पायावरून आणि हातावरच्या त्या डागावरून सासू विरोधात देखील गुन्हा सिद्ध झाला.. असं म्हणा सिद्ध करण्यात आला.
फसवणूक, मारहाण, आणि हुंडा घेणं या सर्व आरोपामुळे संजोगला त्याच्या फेसबुक ओळखीची आणि लग्न करण्याची खुप मोठी किंमत मोजावी लागली. करियर बरबाद, झालं ते वेगळंच…
फसवणूक ही की “पगार खोटा सांगितला” म्हणजे यांची
संजोगचा वकील यात काहीच करू शकला नाही कारण स्वातीने गेल्या दोन महिन्यापासून या सर्व गोष्टींची जुळवा… जुळव करणे सुरु केले होते त्यामुळे सगळे पुरावे संजोग विरोधात होते.
तरीही शेवटचा उपाय म्हणून संजोगच्या वकिलाने स्वातीच्या घरच्यांशी बोलून एकदा विचार करायला लावूया म्हणून प्रयत्न केला…. तर
ती वर तिच्या घरचे सरळ म्हणाले “आम्हाला…….
इतकी रक्कम हवी आहे, लग्नात माझ्या अंगावर असलेलं सर्व स्त्रीधन, माझं सर्व सामान आणि घटस्फोट देखील. ती रक्कम देत असाल तर ही केस आम्ही मागे घेऊ… आपसी समेट करून घटस्फोट घडवून आणू. आणि जर आमच्या अटी मान्य नसतील मात्र कोर्ट जे म्हणेल ते करा वर शिक्षा भोगा, आणि वरून बदनामी सुद्धा सहन करा. ”
हे सगळं ऐकून संजोगचा वकील समजला की स्वातीने संजोगला फेसबुक वर फसवलच त्यासाठी होतं की याच्याकडून मोठी रक्कम वसुल करता येईल.
आता काय व कस करावं.. या विचारात होते सगळे 🤔🤔🤔
संजोगचा वकील जो त्याचा मित्र होता त्याने सांगितले की तिच्या कडे इतकं प्रूफ आहे की तुझ आयुष्य आणि करियर दोन्हीही बरबाद होईल. घरच्यांना सुद्धा शिक्षा भोगावी लागेल. कोर्टाबाहेर ही भानगड पैशाने निपटु शकते.. मात्र तिने मागितलेली रक्कम देखील अवाजवी आहे..
स्वाती आणि तिच्या घरच्यांनी जाणीवपूर्वक, माहिती काढून तुला यात फसवलं मोठी रक्कम वसुल करण्यासाठी. आता तू बघ काय करायच ते..
संजोग :- त्यांनी मदत म्हणून पैसे मागितले असते तरी मी दिले असते न त्यासाठी हे सगळं करायची काय गरज होती. आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही राहिली आता.. आणि इतके पैसे द्यायचे.
वकील मित्र :- अरे हो तुझ बरोबर आहे पण बाहेर समेट घडली तर काका.. काकूंना व तुला जेल ची वारी नाही होणार…
संजोग :-अरे पण इतकी रक्कम देणे म्हणजे.. हातात फक्त धुपारनं राहिलं आमच्या.
वकील मित्र :- हो बरोबर आहे तुझ पण, पैसा कमावता येईल पुन्हा.. तुझ्या त्या सर्व पैशांचा, इस्टेटीचा, दागिन्यांचा हिशोब लावूनच त्यांनी इतकी रक्कम व स्त्रीधन मागितल आहे. तुझी श्रीमंती आधीच हेरली होती त्यांनी त्यात तू साधा.. तिच्या बोलण्याला फसत गेलास. आता बघ काय करायचं ते.. तुरुंगात जायचं की… हातात धुपारनं घ्यायचं..
तिने म्हंटल आहे.. माझ्या मागण्या पूर्ण झाल्या तर मी केस मागे घेऊन घटस्फोट देईल..
संजोग :- ती नक्की करेल का असं.. की पुन्हा दगा देईल.. 🤔🤔फार भीती वाटते रे आता..
वकील मित्र :- मी आहे न यावेळी असं कस करू देईल मी. सगळं लिगली करू आपण. काका-काकू तुम्हाला काय वाटत ते सांगा..
संजोगचे बाबा :-आम्ही काय बोलणार… आमची बोलतीच बंद झाली. मुलाच्या साधेपणाची किंमत अशी सगळ्यांना चुकवावी लागेल असं वाटलं देखील नव्हतं 😞😞😞. काय वाईट वागलो रे आम्ही स्वातीशी..? का तिने असा दगा केला आमच्याशी?? पैसा हवा होता तर, तिच मालकीन होती न या सगळ्यांची. मागून घ्यायचे होते. इतकी बदनामी करून काय मिळवल तिने. 😞😞😞
संजोगची आई :- कायदा आहे न स्त्रियांच्या बाजूने म्हणून काही मुली असं फसवतात आपल्या सारख्या लोकांना. आणि आपण काहीच करू शकत नाही. संजोग बेटा देऊन टाक तिला काय पाहिजे ते व घटस्फोट घेऊन मोकळा हो. आपण पुन्हा शून्यातून जगायला सुरुवात करू.. ती काही जीवनभर खुश नाही राहणार.. तडपून तडपून मरेल एक एक तिच्या घरच्या.. हिला तर किडे पडले पाहिजे मरताना.. एका आईचा श्राप लागेल न तर कधी.. कधी बर नाही होणार तिचं.. 😡😡😡😞😞😞😢😢😢😢संजोग :- आई सॉरी ग माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावे लागत आहे. 😢😢😢माफ कर मला.. कदाचित मी या काळातील लोकांना समजायला असमर्थ आहे… 😢😢मीच मरून जातो.. म्हणजे सगळी ब्याद संपेल 😢😢😢😢😭😭😭
आई :- वेडा आहेस का बेटा तू.. ती स्वाती नाही जगण्याच्या लायकीची काय माहिती आणखी कुणाला फसवते की काय… तू कशाला मरणाच्या गोष्टी करतोस. मी तुझ्या जागी असते तर स्वतः मेल्यापेक्षा तिला मारलं असत आणि आनंदाने तुरुंगात गेली असती. 😢😢😢
सगळ्यांनी ठरवून तिच्या मागण्या पूर्ण केल्या व घटस्फोट घडवून आणला..
घटस्फोट च्या पेपरवर सह्यासाठी कोर्टात आलेली असताना स्वाती आणि तिच्या घरचे आसुरी पद्धतीने हसत होते. खुप काहीतरी जिंकल्याचा भाव त्यांच्या मनात होता. तर संजोग आणि त्याच्या घरचे दुःखात होते पण मनातून शिव्यांची लाखोळी वाहत होते आणि श्राप देत होते.
अशीही फसवणूक होऊ शकते हेच मुळात कुणीही मानायला तयार नव्हतं. म्हणून संजोग व त्याच्या घरचे या फसवणुकीला बळी पडले.
अशा प्रकारे झाली संजोग ची फसवणून.. आणि त्याच भुगतान देखील त्याला बरंच करावे लागले. बदनामी झाली ती वेगळीच. त्याच्या सारख्या हळव्या मनाच्या मुलाला हे सगळं सहन करणं म्हणजे अग्निदिव्य होतं…
सह्या करण्यासाठी आलेल्या स्वातीच्या भावला तेथील तिच्या वाहिनीच्या वकिलाने ओळखले आणि संजोगच्या वकिलाला सांगितले की ही फॅमिली आहेच तशी..फ्रॉड.
मुलाच्या वेळी यांच्या सुनेचा वकील होतो मी.. यांनी तिला असं काही फसवलं की तिला घटस्फोट तर द्यावाच लागला वरून तिचं माहेरून आलेलं स्त्रीधन आणि बराचसा पैसा देखील यांनी गडप केला. आणि बोली केली होती की “आम्ही तुझी बदनामी करणार नाही” पण.. घटस्फोट घेऊनही यांनी सुनेची अशी काही बदनामी केली की त्या बिचारीच जगणं मुश्किल झालं. असा परिवार मी आजपर्यंत नाही पहिला.
ही कथा.. सत्य घटनेवर आधारित आहे. मी स्त्रियांच्या बाजूने लेख लिहिते. “मीच तडजोड का करावी ” लेख वाचून एका पुरुष वाचकाने मॅसेंजर वर ही घटना सांगितली व नाण्याची दुसरी बाजू अशी असते हे.. सिद्ध केलं. आणि मला म्हणाले की प्लीज पुरुषांच्या बाजूने देखील विचार करा.. अशी फसवणूक पुरुषांची देखील होते.. जमल्यास यावर लेख नक्की लिहा.
म्हणून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला. नाव व घटना काल्पनिक आहे पण हा लेख सत्य घटनेवर आधारित आहे.
समाप्त…. ©जयश्री कन्हेरे- सातपुते
धन्यवाद 🙏🙏🙏
स्वातीच्या वाहिनी विषयी वाचण्याची उत्सुकता असेल तर कमेंट मधे नक्की सांगा.. “कशा प्रकारे स्वातीच्या घरच्यांनी तिच्या वाहिनीची फसवणूक केली व घटस्फोट झाल्यावर तिचं जगणं मुश्किल केलं. ” तुमच्या कमेंट वरून नक्की लिहिण्याचा प्रयत्न करेल.
आवडल्यास like, कमेंट नक्की करा, शेअर करायचा असेल तर नावासहित करा.. धन्यवाद 🙏माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा. फोटो साभार गुगल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
SUNDAR!!! NAKKI AAVDEL SWATICHYA VAHINIBADAL KAY ZA TE VACHAYLA…