फसवणूक तर माझी झाली… 😢😢भाग 2

Written by

फसवणूक तर माझी झाली.. भाग

✍️✍️✍️✍️✍️✍️जयश्री कन्हेरे -सातपुते

भाग2 पुढील प्रमाणे…

स्वातीचं व संजोग च मॅसेंजर वर बोलणं सुरु… होतं.. अगदी कोणतीही गोष्ट असे.. स्वातीचं आपलं ठरलेलं वाक्य होतं “सेम पिंच ”
इतकं सगळं कस आपलं मिळत जुळत आहे याचाच विचार संजोग करत होता..
फक्त तीन दिवस झाले आपल्याला.. फक्त फेसबुक वरील ओळख…आणि विचार तर अगदी तंतोतंत जुळत आहे.
हळू.. हळू मैत्री वाढली..मग स्वाती त्याला आवडी निवडी विषयी विचारू लागली.. तो ही सहज म्हणून बोलता.. बोलता सगळं सांगत गेला.. आणि ही त्याच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टीत.. “मलाही असच आवडत “असं म्हणायची.. ते “सेम पिंच ” सारख..
त्यामध्ये फेव्हरेट कलर असो वा आईस्क्रीम फ्लेवर असो, स्वीट डिश असो वा जेवणातील एखादी डिश असो. स्वाती आपली “सेम पिंच ” करत जायची.
तिचं निरागस बोलणं एव्हाना संजोगला आवडू लागल होतं.
स्वाती म्हणायची “आपल्या चॉईस किती सेम आहेत हो…. एकदम परफेक्ट एकमेकांसाठी ”
संजोग आश्चर्याने म्हणाला.. “काय म्हणालात तुम्ही?? ”
स्वाती जरा… हिचकिचत… “चुकून निघालं हो तोंडातून, कोणत्याही मुलीला वाटत की आपल्या आवडी निवडी जपणारा साथीदार मिळावा.. पण नेमक लग्नानंतर कळत की दोघांच्याही चॉईस वेगवेगळ्या आहेत. मग मतभिन्नता होते आणि त्याच परिवर्तन घटस्फोटात होतं. जाऊ द्या.. मी काय सांगत बसले तुम्हाला.. माझं सोडा.”
संजोग :-सांगा हो.. काही हरकत नाही..
स्वाती :- तुम्हाला वाटेल ही जोडीदाराविषयी इतकं कस काय सांगत आहे.. तर त्यामागे कारणही तसंच आहे. माझ्या दादाचा घटस्फोट झाला.. लग्नाच्या अवघ्या दोन वर्षात. माझी वहिनी जरा जास्तच आगाऊ होती, तिला सर्व तिच्या मनासारखं हवं असायच..घरातील काम करायचा तिला खुप कंटाळा यायचा.
दादाला सारखं टोचून बोलायची. “तुम्ही रोमँटिक नाही, तुम्ही माझ्या आवडी.. निवडी जपत नाही, स्पष्टच सांगायचे तर तुम्ही माझ्या लायकीचे नाही.आधीच जर आवडी निवडी जुळतात की नाही हे बघितलं असत तर कदाचित आज असा पश्चाताप करण्याची वेळ नसती आली माझ्यावर ” माझा दादा साधा.. सरळ आहे हो. तिचेच बाहेर अफेअर होते.. घरच्यांनी जबरदस्ती लग्न करून दिल माझ्या दादाशी व आम्ही फसल्या गेलो.
संजोग,:- मुली अश्याही असतात यावर विश्वास नाही बसत माझा. फार वाईट झाले तुमच्या भावाबद्दल.
स्वातीने हळू.. हळू सगळ्या कुटुंबाविषयी सांगितलं
सुरवातीला तर संजोगला खूप आश्चर्य वाटले कि ही असे कसे माझ्या सारख्या अनोळखी मुलाला ही एवढे सगळे सांगत आहे.स्वतःच्या फॅमिली विषयी फेसबुक वर सांगणे म्हणजे जरा… विचित्र वाटलं त्याला.. त्याच्या डोक्यात हे विचार सुरु होते.. तेच पुन्हा msg आला.
स्वाती :- तुम्हाला वाटत असेल “काय पण न ही मुलगी सगळं काही सांगतेय घरचं आपल्या.. तेही फेसबुक फ्रेंडला.. ” पण खरं सांगायचे तर मला खूप अस्वस्थ वाटत होतं. कुणाजवळ तरी मन मोकळ करावे म्हणून मी तुमच्या जवळ सगळं सांगितलं. तुम्ही खुप छान वाटले मला.
मैत्रिणी आहेत हो मला पण त्यांना असं वाटत मी माझंच रडगाणं लावते व दुःखी असते. 😢😢😢
जाऊ द्या माझं.. तुमचं लग्न झाल का?
संजोग:- नाही… पण आता जुळण्यासारखं आहे..
स्वाती :- अरे वा ! अभिनंदन 💐
संजोग :- आणि तुमचं लग्न झालं नाही.. हे तुमच्या आतापर्यंत बोलण्यावरून लक्षात आल?
स्वाती :- हो.. बरोबर बोललात… अजूनपर्यंत…. मिळाला नाही तो, ज्याच्या शोधात आहे मी… आणि आता मिळाल्यासारखा वाटलं होतं पण….
संजोग :- पण……????
स्वाती :- काही नाही.. जाऊ द्या..
संजोग :- जाऊ द्या काय.. सांगा न पण…
स्वाती :- मला तुमच्या सारखा मुलगा जीवनसाथी म्हणून आवडला असता.. but i think मी फार उशीर केला. 😔😔😔
त्यानंतर तिने त्याला त्याच्या लग्नासाठी मुलीविषयीच्या अपेक्षा विचारल्या. संजोगने ने त्याच्या अपेक्षा सांगितल्या.. तिच्या अपेक्षा तर त्याला माहीतच होत्या.
संजोगला वाटलं आपलं लग्न तर जुळण्यातच जमा आहे.. पण स्वाती देखील आपल्या अपेक्षा पूर्ण करणारी परफेक्ट जीवनसाथी आहे. त्याने देखील सांगितले मला आयुष्य भरासाठी तुझ्या सारखी मैत्रीण हवी आहे.
स्वाती :- अगदी माझ्या मनातलं बोललात “सेम पिंच ” मला देखील तुमच्या सारखा मित्र आयुष्यभरासाठी हवा आहे. 💕
संजोग :-नक्कीच आपण फ्रेंड्स म्हणून राहूया..
असेच
इकडे त्या आलेल्या स्थळाचा अजूनही काहीच निरोप आला नव्हता.. संजोगला
आणि स्वातीने संजोगच्या मनात घर करण्यास सुरुवात केली होती.
संजोग म्हणाला आपले विचार, स्वभाव 95%मिळते जुळते आहे. आणि मला सांगून आलेल्या स्थळाचा अजूनही काहीच निरोप आलेला नाही. आपल्यामध्ये जातीचा देखील अडसर नाही. आपण विचार करायला हवा… आपली मैत्री नात्यात परिवर्तित करण्यासाठी.
स्वाती :- काय बोलताय तुम्ही… माझा तर विश्वास बसत नाही.. तुम्ही इंजिनियर आहात माझ साधं MA झालं आहे. तुम्ही किती हँडसम आहात आणि मी सावळी साधारण मुलगी आहे.. तुम्हाला शोभणार देखील नाही.
संजोग :- मला तुझा स्वभाव खुप आवडला… तुझा रंग त्यासमोर काहीच नाही. आपले विचार किती सेम आहेत. आणि तुझ्या दादाच सांगितलं न तू.. भिन्न मताचे असल्यामुळे त्यांच्यात घटस्फोट झाला. मग आपल्याला विचार करायला काय हरकत आहे..?
स्वाती :- संजोग खरं सांगायचे तर मला तुम्ही खुप आवडता. मला तुम्हाला गमवायचे नाही, आणि एक गोष्ट लपवून ठेवली मी तुमच्या पासून, मी तुम्हाला मिळवण्यासाठी कोणतंही व्रत करायला तयार आहे… आणि मी सोळा सोमवारचा संकल्प देखील केला आहे.
आणि आज तुम्ही मला स्वतःहून त्या विषयी विचारताय.. म्हणजे माझं व्रत न करताच फळाला आलेलं दिसतंय. 💕💕मला हे सगळं स्वप्नवत वाटत आहे..मी खरंच स्वप्न तर बघत नाही न
संजोग :- नाही हे स्वप्न नाही खरं बोलतोय मी. माझ्या विषयी सगळी माहिती आहे.. तुझ्या घरच्यांना सांगून बघ आणि या बोलणी करायला मी देखील घरी तुझ्याविषयी सांगतो.
“मी तुझ्यासाठी व्रत करतेय” असं म्हंटल्यावर संजोग एकदम.. भारावून गेला. या जमान्यात आपल्यासाठी कुणीतरी व्रत करतय ही गोष्टच त्याच्यासाठी खुप आनंददायी होती.
स्वातीने ने संजोगला त्याच पॅकेज विचारले.. आणि ते खरेच आहे का हे देखील कन्फर्म केले.
स्वातीने तिच्या घरच्यांचा कानावर ही गोष्ट टाकली आणि तिच्या घरचे संजोगला पाहायला जाणार होते… दिलेल्या तारखेवर पण…….
त्या आधी त्याला स्वातीचा कॉल आला. ती म्हणाली कि घरच्यांनी संजोगविषयी नातेवाईकांचे बोलणे ऐकले आहे कि “मुलाला खरच तेवढे पॅकेज असेल का..?? 🤔तो फसवतोय तुम्हाला, फेसबुक झालेली ओळख व तुम्ही निघाले लग्न करायला. मुलीचं आयुष्य बरबाद नका करू. त्या मुलाकडून पॅकेजची सर्व माहिती घ्या..नंतर नातं जोडा ”
संजोग :-अग त्यात काय एव्हडं.. मी payment slip दाखवतो त्यांना. आणि थांब तुला w’p करतो सगळ्या डिटेल..
स्वाती :- मला नाही पाठवले तरी चालेल डिटेल पण तुम्ही payment slip माझ्या घरच्यांना दाखवून, त्या नातेवाईकांना उघडे पाडा. सगळ्यांची तोंडे बंद करा.
तिचं हे बोलणं आणि आपल्यावर असलेला विश्वास बघून संजोग तर तिच्या आणखीच प्रेमात पडला होता.

स्वाती च्या घरचे जेव्हा संजोगला पहायला आले तेव्हा. त्याने त्यांना payment slip दाखवू लागला..
पण प्रियाच्या घरच्यांनी “तुमच्यावर विश्वास आहे हो आमचा आणि त्याहीपेक्षा जास्त आमच्या मुलीवर आहे. नातेवाईक काय बोलतातच. त्याना कुणाच बर झालेलं बघवत नाही. स्वाती सारख्या MA झालेल्या मुलीला इंजिनियर मुलगा मिळतोय हेच पचत नव्हतं त्यांना. त्यामुळे त्यांनी आमच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पण आमचा तुमच्यावर विश्वास आहे त्यामुळे Payment slip पाहणार नाही असे म्हणून संजोग ने दाखवलेल्या Payment slip ला पहायला नकार दिला.
चहा.. पोहे झाले. जुजबी बोलणं झालं आणि लग्न पक्क करण्यात आल.
संध्याकाळी स्वातीचा कॉल आला….. स्वातीने सांगितले कि “माझ्या भावाला तुमचा प्रामाणिक पणा आवडला.तो म्हणतं होता की स्वाती तू नशीबवान आहेस जे संजोग सारखा मुलगा तुला सांगून आला”
अगदी साध्या पद्धतीने लग्न पार पडले… स्वाती जीवनसंगिनी बनून संजोगच्या आयुष्यात व घरात देखील आली.
तिने हळू.. हळू घरच्यांची मने देखील जिंकली तिच्या लाघवी स्वभावामुळे… अल्पावधीत ती सगळ्यांची लाडकी झाली होती..
सगळं सुरळीत चाललं होतं.. ती समाजकार्यात संजोगला मदत करायची..
असं सगळं आनंदी आनंद चालू होतं.. सहा महिने उलटून गेली आणि अचानक स्वातीच वागणं…… जरा बदलल्या सारखं वाटू लागल..
क्रमशः..
यापुढील लेख….भाग तीन मधे…
का बदललं स्वातीचं वागणं?
फसवणूक नेमकी कुणाची झाली.. स्वाती की संजोगची?
आणि स्वातीच्या मनात नेमक काय आहे…?
संजोगंच 95%मत सारखी आहेत त्याच काय होतं पुढे??
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
हे पुढील भागात.. तो पर्यंत विचार करा 🤔🤔व कमेंट मधे नक्की सांगा तुम्हाला काय वाटत…? मी वाट बघतेय कमेंटची.
लेख आवडल्यास like करा.. जास्त आवडल्यास शेअर करा पण नावासहित.. जयश्री कन्हेरे -सातपुते.. कमेंट नक्की करा. पुढील भागाचे अपडेट मिळण्यासाठी मला फॉलो नक्की करा…फोटो साभार गुगल 🙏🙏
✍️©जयश्री कन्हेरे -सातपुते

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा