फिनिक्स भरारी….!!

Written by

फिनिक्स भरारी..!!

सध्याच महापुरान मानवी जीवन विस्कळीत केल मानवी कृत्यांची परतफेड नैसर्गिक संकट आणून मानवाला जागे केल याचा भयंकर परिणाम पीकावर झाला.पूर आल्यानंतर मी भात पीकांकडे बघण्यासाठी गेलो….शेतात गेल्यावर पीकाची ती अवस्था बघून हृदय हेलावले …जोमदार , रसरशीत आलेले भाताचे पीकं …अर्धमेल झाल होत…एरवी आकाशातील बघणारी पाने जमिनीवर लोळण घेत होती..पानावर केपटाच्या रेतीचा जाड थर श्वास रोखून धरत होता…मरगळलेल्या पीकांचा जीव नकोसा झाला होता…अशा पीकाची ही विदीर्ण अवस्था न बगावल्यामुळे मी महिनाभर तिकडे फिरकलोच नाही…
बरेच दिवसानंतर एकदा चक्कर टाकावेसे वाटले म्हणून सहज शेताकडे गेलो… बांधावर उभारलो…मी पीकाचे लोभस रुप पाहून अचंबित झालो…भात पीकांने नवी पालवी फुटून उसळी घेतली होती …तजेलदार पाने विस्फारली होती …छोटे छोटे दाणे लोंबावर लोभस दिसत होते …लोंबांचा बाकदारपणा परिपक्वतेकडे चालला होता….पिकाचे हे चित्र पाहून समाधान वाटल…. जे पीक महापुराच्या तडाख्याने संपल होते … ते आत्ता नव्या ताकतीने उभारले होते..जस राखेतुन फिनिक्स पक्षी उभारी घेतो तस…मनात क्षणभर विचार केला…आपणही जीवनात कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही…धिराने संयमाने त्याला तोंड दिले तर जीवन अधिक सुखकर होईल अगदी नवि पालवी फुटलेल्या पीकांसारख…!!

©नामदेव पाटील ✍

Article Categories:
रोमांचक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत