फुलराणी

Written by
  • 6 दिवस ago

फुलराणी

सकाळी चारहात नाक्यावरचा main सिग्नल लाल झाला तसा गोड आवाज तिथे थांबल्या गाडीजवळ फिरू लागला. ” गजरे घ्या ताई 10 चा एक 20 ला तीन.” “ताजी टपोरी गुलाब पण आहेत. केशरी, गुलाबी, लाल, पिवळा. तुमच्या दिवसाची सुरुवात कशी सुगंधी होईल.” कोणी तिच्या गोड बोलीमुळे, तर कोणी तिची परिस्थिती पाहून फुले आणि गजरे घेत होतं. या चारहात नाक्यावर 12-13 वर्षांची रूपा गेल्या दोन वर्षांपासून फुले आणि गजरे विकत होती.

वडील दारूच्या व्यसनामुळे 2 वर्षांपूर्वी गेले, आई धुणीभांडी करत. तिला हातभार म्हणून रूपा फुले आणि गजरे विकत. सकाळी गजरे विकून ती 11 वाजता मराठी शाळेत जातं. ती दुसरीत असताना तिला तिच्या आवडत्या बाईने सांगितलं होतं “या जगात मानाने आणि स्वाभिमानाने जीवन तोच जगू शकतो ज्यांच्याकडे शिक्षण आहे. शिक्षण असेल तो व्यक्ती या जगात कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढू शकतो.” बाईंचं ते वाक्य रूपाच्या मनावर कोरलं होतं. शिक्षणामुळे आपण या परिस्थितीतून नक्की बाहेर पडू असं तिला वाटत.

आज ती फुले विकत होती. तेव्हा एका बाईने खूप किंमत बोलतेस कमी कर म्हणत रखडवलं. यामध्ये सिग्नल हिरवा झाला. हिरवा झालेला सिग्नल आणि वेगाने निघालेल्या गाड्या पाहून रूपा भांबावली आणि पळत रस्ता क्रॉस करताना पडली. नशीब चांगलं म्हणून समोरून येणाऱ्या गाडीने ब्रेक मारला आणि रूपा मारता मारता वाचली. टोपलीतली फुले सांडली ती फुले पाहून रूपाच्या डोळ्यात पाणी तरळलं. पण दुसऱ्याच क्षणी तिला बाईंनी शिकवलेली हिंदीची कविता आठवली ” कोशिश करनेवालोकी कभी हार नही होती.” त्यातही तिच्या चेहऱ्यावर स्मितरेषा उमटली. “उद्या पुन्हा मी येणार आणि फूल विकणार. मी प्रयन्त सोडणार नाही. ” खरंच शिक्षण आपल्याला किती ठाम बनवतो नाही…??? असा विचार करत रूपा रिकामी टोपली घेऊन घरी निघाली. तिला शाळेत पण जायचं होतं ना.

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं आणि संकटांच्या काट्यात संघर्षाची कळी दिमाखात उभी भासली. जी पुढे भविष्यात फुलराणी होणार होती.

समाप्त…..

Article Categories:
शिक्षण

प्रतिक्रिया व्यक्त करा