फॅशन

Written by

फॅशन,…?
©स्वप्ना मुळे(मायी)
लेखिका—स्वप्ना मुळे, औरंगाबाद…

गाडीचा आरसा त्याने बरोबर ती दिसेल असा सेट केला होता,..नाकावर राग घेऊन ती घरातून ऑफिसला निघाली की नेहमी मागच्या सीटवर जाऊन बसायची,..तिला त्याच्या जवळ बसावंच वाटायचं नाही,…लग्न होऊन 2च महिने झाले होते,.. त्याला हे सगळं आता माहीत झालं होतं,…पण तिचा रागही संध्याकाळ पर्यंत शांत होतो हे पण तो जाणून होता,.. त्याने टेप on केला आणि नेमकं गाणं लागलं होतं,…”नजर के सामने जिगर के पास”वा त्याला आनंदच झालं आरश्यातून तो मध्येच तिच्याकडे बघायचा,..ती अजुन तोंड फुगवायची,… त्याने मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न केला,…गाणं बघ काय योग्य लागलंय,… अगदी तू ह्या चौकटीत दिसतीयेस आणि मी बघतोय,…नजर के सामने? त्याने चौकट शब्द म्हणताच ती चिडलीच,..हो चौकटीतलीच हवी होती तुला,… सकाळच्या वादाला परत वाचा फुटली, ….ते फाटक बाही टॉप सासुबाईंना मुळीच आवडत नव्हतं,…त्या खुप मागास विचारांच्या होत्या असं नाही,…खरंतर स्वतःचा ती नोकरी करत होत्या त्यांना साडीच बंधन होतच पण त्यांनी ह्या सुनेला नोकरी करते म्हणून पंजाबी ड्रेस,..जीन्स सगळ्या फॅशनची परमिशन दिली होती,…पण तिने परवाच आणलेला तो दंडावर कापलेल्या भागातून अंग विचित्र दिसतं ते घालू नकोस,..असं म्हंटल आणि वादाला तोंड फुटलं,… हिला लगेच त्यांनी मागे शॉट स्कर्टला पण विरोध केला होता ते उकरून काढलं,….त्या म्हणाल्या होत्या,..”फॅशन अशी करावी,.जी तुम्हाला शोभेल,…तुमच पद,वय,या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन कर मग मी नाही विरोध करणार,”… पण जसा हा टॉप तिने घातला तसा त्यांनी विरोध केला,…ही पण मग जिद्दीला पेटली,…हिचा अहंकार उफाळला हिने हट्टाने तोच टॉप घातला आणि ती निघाली तेंव्हा सासुबाई हताश होऊन म्हणाल्या,..”तू चौकट मोडतीयेस,”. झालं तो चौकट शब्द आला आणि परत बाईसाहेबाचा ताल गेला,…त्याला पण तिने हा टॉप घातलेला आवडलं नव्हतं,…तो म्हणाला ,”तू चौकट शब्दाचा चुकीचा अर्थ घेतीयेस,…खरंतर व्यक्ती स्वातंत्र्य सांभाळणार आपलं कुटुंब आहे,…म्हणून तर आई तुला नोकरी करू देते,…ड्रेस घालू देते,…पण काही बाबतीत नको ग हट्ट करू,…खरतर ते आईने किंवा मी सांगण्यापेक्षा तुला कळायला हवं,….तेवढ्यात ऑफिस आलं आणि ती परत हूं करत उतरून गेली,… ऑफिसच्या खालचा चहा वाला आपल्या अंगाकडे बघतोय हे तिला जाणवलं,..तिने उगाच शोल्डर वर नसलेली बाही ओढल्यासारखं केलं,…ऑफिसमध्ये मैत्रिणी तर म्हणल्या काय hot दिसतीयेस,.. पण साहेब पण आपल्या उघड्या दंडाकडे बघतायेत असा भास तिला होत होता,…दुपारी त्याचा फोन आज तू तुझी जा मला ऑफिसमध्ये काम आहे,… तिला खरंतर बसने जायचा कंटाळा आला होता,….कारण बसला गर्दी प्रचंड होती,…कशीबशी ती चढली,… गर्दीत चुकून लागतो असं दाखवून स्पर्श करणारे भरपूर होतेच,…आणि नजरेने तिच्या दंडावर स्पर्श करणारे जास्तच,…ती आता खुप वैतागली,….घरी पोहचताच तिने हातपाय धुऊन गाऊन घातला,… तिला जरा हायस वाटलं,…तो पर्यंत सकाळचं घडलेलं सगळं विसरून हसतमुखाने सासुबाई टेबलावर चहा घेऊन बसल्याच होत्या,….तिला जरा अवघडल्यासारखं झालं,…पण सासूबाईंनी रोजच्या सारखं कसा गेला आजचा दिवस?? हा प्रश्न विचारला,…तसं तिला रडूच कोसळलं,…”आई खरं मी तुमच ऐकायला पाहिजे होतं,…. तो टॉप नको होता घालायला,…. लोकांच्या नजरा,…?पुढे तिला बोलवेना,… सासूबाईंनी तिला जवळ घेतलं,…अग फॅशन कपडे म्हणजे तुमच टॅलेंट नसतंच मुळी,… आणि अगदी आवश्यक असेल तुमच प्रोफेशन असेल तर घालावंच लागेल पण,….आजूबाजूच्या नजरा त्यांना तुम्ही बदलू शकत नाही,…सगळेच तसे नसले तरी,…आपण राहतो तो समाज ,.लोकांची वैचारिक पातळी,…ह्याचा विचार तर केलाच पाहिजे ना,…अगदीच तू तुझी फॅमिली कुठे जात असेल तर घाला ना फॅशनचे कपडे,…पण गर्दीत,….प्रवासात असे कपडे घालून आणि लोकांचे असे प्रतिसाद पाहून आपल्यालाच मन खच्ची करणं होतं,… बघ हे माझं मत आहे,…बाकी तू ठरव,…….. तेवढ्यात नवरोबा आले,…आणि मुद्दाम तसाच एक टॉप गिफ्ट घेऊन,…ते हातात घेऊन ती म्हणते आपण महाबळेश्वरला जाऊ तेंव्हा घालेल मी ,…सासुसुना हसल्या एकमेकांकडे बघून आणि नवरोबापण आईकडे बघून डोळे मिचकावत होता?…….
©स्वप्ना मुळे ,…औरंगाबाद…

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा