फेसबुकवर लिहिताना

Written by

फेसबुकवर लिहिताना

फेसबुकवर लिहिताना फारच सावधगिरी बाळगावी लागते.विशेषत: फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारताना.ढिगांनी फ्रेंड रिक्वेस्टा पडलेल्या आहेत.माझे लेख वाचण्यासाठी पुर्वी मला वाचक हवे होते म्हणून मी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत होते.आत्ता बरेच वाचक आहेत.अर्थात त्यातले मोजकेच वाचक आहेत .कधी वाटतं ही फ्रेंडांची लीस्ट कमी करावी पण कोणाला अनफ्रेंड करणं जीवावर येतं.

काही मेसेंजरवर देवाधिकांची चित्र रोज टाकत असतात.तर काही हाय हाय करत असतात.काय दुखता त्यांचा जाणा कोण.मी दुर्लक्ष करते.काही जेवलात का केटेगरीतले.ते ब्लाक होत्यात.काही बोला ना,बोलत का नाही.गीता ताई तेंचीव बोलती बंद करुन टाकते.

एक कोण होता लईच वंगाळ फोटू पोस्टलेले त्याने.त्याला नुसता ब्लाक नाय केला तर त्याचा रिपोर्टही केला.

पुरुष हा लेख लिहिला होता. तो फेसबुक स्टोरीला पोस्टलेला.तर कोणतरी वाघमारे म्हणून,नाव आठवत नाही. मेसेंजरवर म्हणू लागला,लेख छान आहे.तुम्ही लेखिका आहात का?मी लिहिलं.थँक्यू. लेखिका वगैरे नाही.लिहिण्याची आवड.म्हणून फावल्या वेळात लिहित असते.

खरंतर मी मेसेंजरच पंधरवड्याने उघडते पण हल्ली मला काही अडत असलेलं विचारण्यासाठी काही मैत्रिणींना मेसेज करावा लागतो.दार उघडं असलं की डास घरात शिरतात.अगदी तसं आहे हे.

काल सुंदरी हा लेख फेसबुक स्टोरीवर पोस्टलेला.तिथे बरेच वाचक वाचतात म्हणून पोस्टते.आपण लिहिलेलं वाचलं जावं एवढीच अपेक्षा असते.तर हे वाघमारे नावाचं बेणं टपकलं.काय लिवलं माहितीय? ही चित्रातली स्त्री तुम्ही अहात का व असलात तर सुंदर हा शब्दही कौतुक करायला अपुरा.यापुर्वीचं संभाषण मी इंग्लिशमध्ये केलेलं कारण ते बेणं इंग्रजीत लिवत होतं.आत्ता मात्र मराठीत लिवलं की नायबा,येक मॉडेल आहे.
लगेच दुसरा प्रश्न..इंग्लीशमध्ये..हे जे काय नाकात घातलंय ते कसं घालतात व ते फार दुखत असेल नं..माझं एक आहे.फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारताना मी त्या व्यक्तीचं प्रोफाईल पाहून घेते.याच्या प्रोफाईलवर जी.एस.मेडीकल कॉलेज,मुंबई, एमबीबीएस लिवलेलं.डॉक्टरांबद्दल आदर म्हणून मी त्याच्या प्रश्नांना उत्तर दिलेली.

मी त्याला मराठीतच विचारलं.नक्की मराठीच अहात ना?
तर लिवलान इंग्रजीत की आपण इंग्लीशमध्येच बोलू.मला ही भाषा येत नाही कारण मी परदेशात लहानाचा मोठा झालो.
आत्ता माझा टाळक्या फिरला.परत एकदा त्याच्या प्रोफाईलवर गेले.प्रोफाईलवर तर जी.एस.मेडीकल कॉलेज,मुंबई म्हणत होता.अर्थात हा फ्रॉड होता.बेणं मला गंडवत होतं.मी ब्लाकला त्याला तिथेच तेचा ### बसिवला.

सांगण्याचा मुद्दा असा की आत्ता माझं बेचाळीस रनिंग आहे.मी वय सांगायला लाजत नाही.इतर कोण लाजत असतील तर का तेंच तेंना ठाव.केस विंचरताना हळूहळू चांदी दिसते.अनुभवसंपन्न चांदी आहे ती .तिचं स्वागत केलं पाहिजे जया बच्चनसारखं.कलप लावण्यात तथ्य नाही.

पण ज्या मुली,नवथर तरुणी आहेत,त्यांनी मात्र सावधगिरी बाळगावी.अगदीच ओळखीची/चा असेल तरच मित्रयादीत घ्यावा.कोणाशीही आपले व्यक्तिगत प्रॉब्लेम शेअर करु नका.या जगात कोणी कोणाचा नसतोच मुळी.लोक सहानुभुती देतील.आपल्या समस्या आपल्यालाच सोडवायच्या असतात.कुणी तुमच्या सौंदर्याची तारीफ केली तर हुरळून जाऊ नका.

यातून मुलगेही सुटले नाहीएत बरं.मी अगरबत्ती आणायला जाते तिचा मुलगा फेसबुकवर होता.तर मुली जाम त्रास देऊ लागल्या म्हणे.शेवटी त्याने फेसबुक बंद केलन व आईलाही वापरु देत नाही.🐥

एक्चुअली परपुरुषाने आपल्या सुंदरतेची तारीफ करावी असं वाटणं यासाठी तसे फोटो टाकणं हेही गैरच पण बाय तुमका टाकूचे आसत तर टाका बावडे.माझी आपली जुनीजाणती विचारसरणी.

तरी मुलींनो सावध रहा हा सल्ला देते.काही मुलं मुलींच्या वेशात फेसबुकावर आहेत.तर काही मुली मुलांच्या रुपात.तेंव्हा फेसबुकवासियांनो सावध रहा.वाट चिखलाची आहे.रुतण्याची भिती जास्त.रुतलात तर कोण हात देवचो नाय वर येवूक.मिया आपला सांगुचा काम केलंय .बाकी तुमची मर्जी.💐

____गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा