फ्लॅट WITHOUT किचन…

Written by

*फ्लॅट WITHOUT किचन*

मी ही दमते रे… जरा याची ही तु दखल घे…

दोन बेडरूम एक हाॅल, पण without किचनचा एखादी तरी फ्लॅट घे…

चार दिवस राहुन थोडा आराम मला ही करु दे..मला ही सुट्टि अनुभवु दे, वर्षानुवर्षांची कसरत आता… थोडी तरी काढु दे…

तु सात फेरे घेतले माझ्याशी, मी लगीन केल तुझ्याशी, पण मर्यादित मात्र किचन पुरतेच ठेवले…

काळ पलटत गेला, शतके बदलत गेली, पण माझी व्यथा तशीच राहाली…

संसार प्रपंच-चुल अन् मुलच्या चक्कीत मी मात्र कायमच पिसुन राहाले..

सासरच्या लोकांना समजण्यात पहिले पाच वर्ष सरून गेले, त्यांच्या प्रमाणे वागता वागता तारुण्याचे दिवस ही निघुन गेले…

सणवार, लग्न समारंभ यात कंबरड मोडल…

मग भरली झोळी दोघाचे झालो तिन, मुलांचे पोषण करता करता वाजली माझी बिन…

उठुन सकाळी रोज़ माझी तारांबळ उडत गेली, भांडे कुंडे कपडे लत्ते यातच पुर्ण आयुष्य पलटले…

ते महिन्याचे कठीण चार दिवस, तो फ़न फ़नलेला ताप, ती शिंकावर शिंका आणणारी सर्दी.. सगळ काही मी सोसत गेले…

On Duty २४/७ हे सूत्र मी नेहमीच पाळत गेले, प्रपंचाचा गाडा अलगद तठस्तपणे मी मात्र पेलत गेले..

त्या सासु सासऱ्यांच्या अपेक्षा, त्यात नंदा भावजांचा मानपान, त्या ईन ईवायांचा पावुनचार, त्यात जावायाचा आदर सत्कार यातच अर्धे आयुष्य बहाल केले..

ते रोजचेच तुमचे डबे, तोच तोच सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक, त्याच रटाळवाण्या जिवनाला आता.. खरच मी कंटाळुन गेले..

तुमच्या फ़रमाईश पुर्ण करता करता मी स्वतःतच पार हरवुन गेले… होत्या नव्हत्या त्या साऱ्या हौशी पुर्ण करायच्या विसरुनच गेले…

सगळयांच्या आवड़ी निवडी पुरवता पुरवता मी अक्खी जिरुन गेले, धुळ खात पडलेल्या डिग्री एकदा तरी चाळायच्या सोडुन दिले…

होती आवड कामाची केले सगळे थेट… पण आता या शरीराला हवी थोड़ी रेस्ट…

वय झाल रे माझ आता, थोडा विसावा मला ही घेवु दे….

आयुष्यभर बिनपगारी कामावर होती, थोडया रजा मला ही देवुन दे…

कधी रिटायर्मेंट न होणाऱ्या आईच आज मात्र होवु दे…

बस आता मला काहीच नको मात्र…

दोन बेडरूम एक हाॅल, पण without किचनचा एखादी तरी फ्लॅट घे…

धन्यवाद!

©️ अश्विनी दुरगकर,

नागपुर

टिप:- वरील लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखिव आहे. याची नोंद घ्यावी.

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा