बंदिनी मी… बंधनातली

Written by

सहा वर्षे झाली शर्वरीच्या आणि अजितच्या लग्नाला त्यांचीच ही कहाणी “मी बंदिनी ”
अल्लड वयात म्हणजेच, वयाच्या एकवीस.. बावीसव्या वर्षी लग्न झालं. तेव्हा वाटलं सगळे नवरे असेच असतात कदाचित, कारण मैत्रिणींन पैकी माझंच लग्न आधी झालं होतं.

मात्र दुसऱ्या मैत्रिणीचे लग्न झाले तीन… चार…वर्षांनी, तेव्हा कळलं की “नाही माझाच नवरा असा आहे.” त्यांचे नवरे त्यांच्याशी नीट वागत होते. अरेंज मॅरिज असूनही प्रेम करत होते, बायकोला जपत होते.

अजित आधीपासून शंका घ्यायचे माझ्यावर. .

घराबाहेर पडताना नको नको ते 100 सल्ले द्यायचे अजित मला. “असं वागायचं तसं वागायचं, पुरुषांशी बोलायच नाही, मित्र वगैरे मला चालणार नाहीत. मैत्रिणी देखील घरापर्यत यायला नको आपल्या. जे काही बोलायचं ते मैत्रिणी सोबत बाहेरच बोलायचं” असं आणि बरेच काही सांगत होते. बंदिस्त जिवन जगतेय मी. स्त्रीला बंदिनी म्हणतात ते यासाठीच असेल कदाचित. 😞😞

सासूबाई देखील काही कमी नाहीत..आगीत तूप ओतायला. मी काही वस्तू घ्यायची म्हटलं तर म्हणतात “तुझ्या माहेरी भेटत होतं का हे सगळं.जे आहे तेच वापर नको तो खर्च करू नकोस माझा लेक एकुलता एक आहे कमावता” काय बोलणार यावर. आणि कस सजवणार घर स्वतःच्या मताने नवीन वस्तू घेऊन.???? 🤔🤔😞😞नवीन घरात म्हणजेच स्वतःच्या घरात आलेय नं मी. सासर हेच मुलीच खरं घर असते नं.. मग तिथे सुद्धा मनमर्जी जगता येत नसेल तर काय करावं एका स्त्रीने???? 🤔🤔

नवीन शिकण्याची आवड आहे, वेगवेगळे क्लासेस करण्याची इच्छा आहे पण तेही करू देत नाही ते करायचं असेल तर “माहेरी जाऊन कर” असं बोलतात. आता काम यांच्या घरी करायच आणि काही शिकायचं असेल तर माहेरी का जायचं??? 🤔🤔🤔

घरी अजित आणि सासूबाई नेहमी चिडचिड करत असतात माझ्यावर. हातातून साध काही पडलं जरी तरी खुप रागवतात. खूप भीती वाटते घरात वावरतांना..आणि या भीतीमुळेच की काय हातातून वारंवार चुका होतं असतात.😞😞😞

काहीही करताना शंभरदा विचार करावा लागतो “मी जर असं बोलले तर नवरा ओरडेल का? राग येईल का त्यांना? काही चुकले तर माझ्या आई -बाबांचा उद्धार होईल का “तुझ्या बापाकडून आणलस का” अस म्हणेल का?” किती दिवस असं धास्तावलेले जीवन जगायचं हेच कळत नाही???? 🤔.
नोकरी करण्याची आवड होती मला अजूनही आहे. प्रायव्हेट नोकरीं मिळेल असं शिक्षण देखील आहे. मात्र तिथे सुद्धा यांची मांजर आडवी गेली. कितीही प्रयत्न केले तरी नोकरीं करू देत नाही. सरळ सांगितलं आहे, “घरचं सगळं करून जाणं होत असेल तर नोकरी कर. नाहीतर गपगुमान घरीच राहायचं. घराकडे दुर्लक्ष झालेल मला चालणार नाही.” असं म्हंटल्यावर आधीच धास्तावलेले माझे मन आणखीच घाबरून जाते. अशा द्विधा मनस्थितीत कशी करावी नोकरीं??? 🤔🤔 शिक्षण आहे पण हिम्मत नाही सासरच्या विरोधात जाऊन घराबाहेर पाऊल टाकण्याची. 😞😞😞

इतकंच नाही तर माझ्या माहेरचे नेहमी नेहमी घरी आलेले चालत नाही.मी एकुलती एक लेक म्हंटल्यावर आई -बाबा माझ्या कडे येणार नाहीतर कुणाकडे येतील? 🤔🤔

काय वाईट केल काय माहिती माझ्या माहेरच्यांनी?? एकूलतीएक आणि लाडाची मुलगी म्हणून त्याच्यांनी होईल तसं सगळ काही दिल त्यांनी. आपली मुलगी सुखात राहावी म्हणून नेहमी प्रयत्न करतात, माझे बाबा.

आई -बाबांना माझं दुःख सांगितलं तर त्यांना किती वाईट वाटेल म्हणून मी सांगत नाही त्यांना काही. आई -बाबांकडे बघून वाटत काय आपलं दुःख त्यांना सांगावं आणि त्यांना दुःखी करावं. 🤔🤔त्यांना यातच समाधान आहे की आपली मुलगी सुखी आहे.. त्यांना याचं भ्रमात ठेवून निदान आनंदी तरी बघू शकते मी.😞😞😢

मी माझंही लपवत नाही.. मी थोडी फटकळ स्वभावाची आहे. जे वाटलं ते पटकन तोंडावर बोलणारी. माहेरी एकुलती एक आहे, त्यामुळे खूप लाड झाले माझे माहेरी आणि स्वातंत्र्य देखील खूप होते तिकडे.😍😍😊

इकडे, सासरी मात्र सगळं त्याच्या विपरीत आहे, मला भाजी सुद्धा सासूबाईला विचारूनच करावी लागते. मला मोबाईल वापरण्यावर बंदी आहे. यांनी तर कधी घेऊन दिलाच नाही. माहेरून बाबांनी दिलेल्या पैशातून घेतला मी.

या जमान्यात इतकं बंदिस्त जीवन असेल का कुणाच?? की फक्त माझ्याच नशिबी आहे हे सगळ???? 🤔🤔

मैत्रिणींसोबत सुद्धा बोलू देत नाही. त्यांच्याशी बोलून तरी मन हलक होतं. पण यांना कुणीच नकोय… का हे मात्र कळत नाही???

या पाच वर्षात मी तीनदा बाळाला पोटातच गमावलं.. कदाचित मानसिक ताण त्याला कारणीभूत असेल. मग स्वतःला सावरल मी आणि आता दहा महिन्याच्या मुलाची आई आहे.

त्या बाळाला किती जपत असेल मी याचा विचार तुम्हीच करा.. तरी देखील बाळाचं काही दुखलं तर “तूच नीट लक्ष देत नाही ” असं म्हणतात घरचे सगळे. मी माझ्याच बाळाला नीट नाही सांभाळणार का? ज्या आईने या आधी आपले बाळ गमावले तिला असलेल्या बाळाची काळजी नसेल का…??? मात्र हे देखील माझ्या घरच्यांना कळत नाही…. याहून मोठ दुर्दैव कोणत असेल माझं..

 

कधी कधी वाटत.. सोडून द्यावं सगळं आणि निघून जाव कुठेतरी. कधी वाटत आई-बाबांना सांगावं “हे असं आहे सगळं.. मी खुश नाही इथे..” दुसऱ्या क्षणी आई -बाबांचे शब्द आठवतात….जे ते इतरांशी बोलतांना अभिमानाने सांगतात “माझ्या मुलीने नशीब काढलं”

त्यांना वाटत “आपली पोरगी, आनंदी आहे, चांगल्या खात्यापित्या घरी दिलय. जावई देखील निर्व्यसनी आहे. चांगली नोकरीं आहे, आणखी काय हवं संसाराला ” त्यांना कुठे माझ्यावरील या बंधनाची माहिती आहे,..मला त्यांना माझं दुःख सांगून दुखवावंसं वाटत नाही.

आता मुलगा आहे तरी देखील वाटतं कुणाचाही विचार नं करता मुलाला सोबत घेऊन आत्महत्या करावी.. 😭😭😭😭….. पण पुन्हा लवकरच विचार येतो मनात वाटतं “त्या लहान जिवाची काय चूक. त्याला जगात आणणारी तर मीच ना. मग त्याच असं आयुष्य संपवण्याचा अधिकार नाही मला.”

माहेरी निघून गेले तर आई -बाबांना लोकं बोलतील, घटस्फोट जरी घेतला, तरी त्यात त्या चिमुरड्याचा काय दोष? त्याने का बापाच्या प्रेमाला मुकावं? या सर्व गोष्टींचा विचार येतो मला.. आणि डोकं भांबावून जात. काय करू नी काय नाही असं होतं.

बर या सगळ्यावर मी तोडगा काढला नसेल का…. तर मी यांच्याशी अबोला धरला, रागावून बसले. तरी यांना काही फरक पडत नाही. म्हणजे माझ्या असल्याने आणि नसल्याने यांना कोणताही फरक पडत नाही.

व्यसन कुठलंच नाही यांना , मारहाण देखील करत नाही. मात्र त्यांचा स्वभाव इतका कडक, रागीट आहे की त्यामुळे मन धास्तावल आहे माझं. फक्त भीती आहे माझ्या मनात त्यांच्याविषयी. बंधन तर इतकी घातलीय माझ्या वागण्यावर, बोलण्यावर, हसण्यावर, राहण्यावर.. की मला मी बंदिनी वाटते. 😢😞😞

प्रेम असं काही नाहीच नात्यात आमच्या. फक्त लग्न झालं म्हणून एकत्र राहतोय आणि संसाराच्या चालीप्रमाणे गृहस्थाश्रम जगतोय. त्याच ताणतणावात माझे मिसकॅरेज झाले. आता एक गोड बाळ आहे पदरात. त्याच्याकडे बघून वाटत आयुष्य असच जगायचं मुलाच्या खुशीसाठी, त्याला आई -बाबा दोघांचंही प्रेम मिळू द्यायचं.

अजितचा मुलावर खुप जीव आहे. माझ्यावर प्रेम म्हणून नाही करत पण मुलांवरच प्रेम दिसतं मला. त्या प्रेमाला, मला माझ्या बाळाला मुकवायचं नाही आहे.

मी निर्णय योग्य घेतला की नाही माहिती नाही….?

मुलासाठी ते योग्य आहे असं वाटत.

एका स्त्रीच.. जेंव्हा आईमध्ये रूपांतर होतं तेंव्हा तीच जग मुलांन भोवती घुटमळत.. आणि तिच्या दुःखाला देखील किंमत राहत नाही मुलाच्या त्या हसऱ्या चेहऱ्यासमोर.

काय वाटत तुम्हाला.. शर्वरीने घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही…?

मुलांसाठी तडजोड करतेय या लेखावर एका वाचकांनी मसेंजर वर आपली शॉर्ट स्टोरी सांगितली.. व विचारलं मी योग्य केल का??

आता मला तुम्ही सांगा… तिने योग्य केल का??

बंधिस्त जिवंन जगणं तिला आवडत नाही… तरीही मुलांसाठी, आई-बाबांसाठी ती मन मारून जगतेय…

नाव आणि प्रसंग काल्पनिक लिहिलेले आहे…. बऱ्याच स्त्रियांच्या जीवनाशी संबंधित हा लेख असू शकतो. अशाही बंदिनी आहेत आजही यांची खंत वाटते मला..

समाप्त…. ©जयश्री कन्हेरे-सातपुते

आवडल्यास like, कमेंट करा, शेअर करायचा असेल तर नावासहित करा.. माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा.धन्यवाद 🙏©जयश्री कन्हेरे -सातपुते फोटो साभार गुगल

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा