बंधन भाग 11

Written by

भाग 11
( दहाव्या भागात आपण पाहिलं शनिवार, रविवार जोडून सुटी असल्याने विकेंण्ड एन्जॉय करण्यासाठी बाहेर जाऊया का विचारायला विक्रमला राजेशचा फोन येतो. विक्रम त्याला सगळे फार्महाऊसवर जाऊया असं सुचवतो. इकडे जितेंद्र आणि नीतासुद्धा विक्रमसोबत बाहेर जाण्याचं ठरवतात पण तुम्ही दोघे जा असं तो त्यांना सांगतो आणि नीतुला समजावतो. शनिवारी सकाळी विक्रमच्या गाडीने सगळेजण फार्महाऊसवरती पोहचतात निसर्गाच्या सान्निध्यात सगळ्यांना बरं वाटतं पाहुया आजच्या भागात काय होतंय)

विक्रम चेंन्ज करुन रुममधुन खाली आला तोपर्यंत सगळे मित्र हॉलमध्ये जमा झाले होते.
” हे काय असे बसलात काय ?” विक्रमने हसत खाली येत त्यांना विचारलं.
” हे बघा अरे तुझा पत्ता कुठे आहे तुझीच वाट बघतोय.” पंकज म्हणाला
” Ok, Give me five minuts ” असं म्हणत तो किचनमध्ये गेला आणि आतून ट्रे घेऊन आला. ट्रेमधले ग्लासेस आणि शँप्मेनच्या बॉटल्स बघून सगळे खूश झाले.
” Woow ! That’s why we were waiting for you” राजेश विक्रमला म्हणाला. विक्रमने ट्रे समोरच्या टिपॉयवरती ठेवला आणि बॉटल्स ओपन केल्या.
” Ok विक्रम तूच सहर्व कर अॅज युज्युअल ” सुमीतने हसत त्याला म्हटलं. विक्रमने सगळ्यांचे ग्लासेस भरले आणि एकेक करुन सगळ्या मित्रांच्या हातात दिले.
” चिअर्स ओके ” त्याने ग्लास उंचावत म्हटलं आणि सगळ्यांनी ग्लासेस समोर धरत मोठ्याने चिअर्स म्हटलं.
” Thanks विक्रम किती महिने याची वाट बघत होतो आम्ही” जयेशने ग्लासचा पहिला घोट घेताच म्हटलं.
सुमीत – ” हा रे हा ‘गुरुकुल ‘ चा डायरेक्टर झाल्यापासुन आपलं भेटणंच होत नाही.”
राजेश – ” म्हणूनच काल कॉल केला ह्याला तर साहेब बिझी अरे विकेंण्ड पण याच्या लक्षात नसतो हल्ली.” त्याने विक्रमकडे पाहत म्हटलं.
विक्रम – ” हो पण येतो म्हटलं की ते कन्फर्म असतं. सकाळी कितीला रे पिकअप केलं तुला. आज जीमला न जाता लवकर आवरुन तुला पिकअप करायला आलो.” विक्रम राजेशला जरा ओरडल्यासारखं दाखवत म्हणाला.
” अरे बापरे ! मोठंच साक्रिफाईज केलं तू ” राजेश शेजारी बसलेल्या सुमीतला टाळी देत म्हणाला.
राजेश -” पण काय रे विक्रम Your personality is too cool यार मग हे जीमबिम कश्याला तुला दमायला नाही काय रे होतं, नाही म्हणजे एकीकडे तो कॉलेजचा व्याप सांभाळायचा दुसरीकडे तुझं डेलि रुटीन म्हणजे हेच जीम, टापटीप राहणं वगैरे.”
पंकज – ” हा रे केव्हाही बघा हा नेहमी एनर्र्जिटिक च असतो कधी ह्याला कंटाळाच येत नाही.”
विक्रम – ” अरे नेहमी फ्रेश राहयचा नी स्वतःकडे लक्ष द्यायचा कसला कंटाळा.” त्याने ग्लासचे घोट घेत म्हटलं.
जयेश – ” ए बाकी काही म्हणा,Your wife will be very lucky हा ! ” मस्करीत जयेश म्हणाला. त्याचीच रि बाकीच्यांनी ओढली.
पंकज – ” हा रे बायकांची एकच इच्छा असते आपल्या नवर्‍याने जरा नीट रहावं आणि बरं दिसावं. दाढी वाढलेले, ढेरपोटे अजागळ नवरे कुठल्याही बायकांना आवडत नाहीत.”
सुमीत -” सौ परसेंन्ट खरं बोल्लास लेका ” त्यांच्या या बोलण्यावर विक्रमने स्माईल केलं.
जयेश – ” ए पण काय रे विक्रम आतापर्यंत तुला कुणीच भेटली नाही नाही जरा बिलिव्ह करायला कठिणच जातंय हे!” जयेशच्या या वाक्यासोबत लगेच मग पंकजने सुरुवात केली.
पंकज – ” यु.एस.ला. होती असेल की कुणीतरी ”
विक्रम – ” नाय रे बाबा ! एकतर मान मोडेस्तोवर स्टडी करुन तिकडे गेलो आणि हे उद्योग कुठे करु ! ”
राजेश – ” ह्याला स्टडी नी करियर शिवाय दुसरं काय दिसतचं नाही ” राजेशने म्हटलं.
विक्रम – ” तेवढंच केलं ना म्हणून आज इथपर्यंत पोचलोय आणि आताही माझं ड्रिम आहे ‘गुरुकुल ‘ ला मोठं करायचं आहे देशभरातून मुलं इथं यायला हवीत.” विक्रम अँमबिशियस नजरेनं बोलत होता.
पंकज – ” ते करशीलच रे तू ”
सुमित – ” ए तुमच्या कॉलेजला एवढ्या लेडीज प्रोफेसर्रस आहेत आयमीन म्हातार्‍या सोडून आपल्या वयाच्या पण आहेतच की त्यातली नाही कुणी आवडली.”
विक्रम – ” No Noway हा I don’t like that Hindi deailysoap type girls आयमीन सास बहु टाईप मुली आणी कॉलेजला तश्याच आहेत आता त्यांचं ते प्रोफेशन आहे त्याप्रमाणे त्या राहतात म्हणा पण त्यातली एखादी बायको म्हणून noway ” तो तोंड वेंगाडत म्हणाला.
सुमीत – ” ये भी सच है ”
विक्रम – ” and I don’t want to make my home tv serial set मी लहान होतो ना तेव्हा आमच्या मम्माने पण तसला प्रयोग केला होता.”
सुमीत – ” म्हणजे रे ? ”
मग सगळे कान देऊन विक्रमला ऐकु लागले.
विक्रम – ” अरे मी लहान होतो ना तेव्हा भाऊसाहेब नवीनच राजकारणात उतरले होते मग त्यांचे दौरे, सभा काय काय सुरु असायचं. घरी मम्मा, मी, गंगाआत्या, एक दोन नोकरमंडळी एवढीच माणसं असायची. मम्मा टाईमपास म्हणून सास बहू च्या त्या हिंदी सिरियल्स बघायची आणि ती ‘ कसौटी जिंदगी की ‘ बघून तिलाही त्यातल्या सुनांसारखं सोज्वळ, घरंदाज रहावसं वाटायला लागलं. मग काय ती पण तश्या डिसाईनवाल्या जाड पोताच्या साड्या वापरायला लागली. भांगेत सिंधुर भरायला लागली. केस तसेच व्यवस्थित बांधून दिवसभर असायची, हेवी ज्वेलरी पण वापरायची आणि एवढं सगळं करुन किचनमधलं काम करायची, घरी आलेल्या पाहुण्याचं करायची.”
पंकज – ” मग रे पुढे काय झालं ?”
विक्रम – ” मग काय या सगळ्याची सवय नको अरे भाऊसाहेब धोतर सदरा सहज वापरतात म्हणून मम्मा थोडी ना नऊवारी नेसते शेवटी किचनमध्ये पाय घसरुन पडली.” तो हसत सांगू लागला.
सुमीत – ” मग रे ?”
विक्रम – “भाऊसाहेब आल्यावर ओरडले तिला तेव्हा कुठे ती नेहमीच्या झोन मध्ये आली.”
सुमीत – “बाकी तुझी मम्मा सॉल्लीड आहे.”
विक्रम – “हो पण भाऊसाहेब आणि मम्मा म्हणजे दोन टोकं आहेत. ते भावनेनं विचार करतात आणि मम्मा ब्रेन ने.” तो डोक्यावर टिचकी मारत म्हणाला.
राजेश – “आणि तू ?”
विक्रम – ” दिल और दिमाग दोन्हीने आणि बायकोच्या बाबतीत म्हणालास तर मम्मा शोधेल ना एखादी. She knows my choice ” त्याच्या या स्मार्ट उत्तरावर सगळे हसायला लागले.
……………..

 

अरुंधतीने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. तिने गाडीच्या खिडकीची काच खाली करित पाहिलं, ‘ चंद्रकांत ज्वेलरी’ दुकानाचं नाव मोठ्या दिमाखात झळकत होतं. ड्रायव्हरला थांबायला सांगून तिने गाडीचा दरवाजा उघडला आणि रुबाबात आत प्रवेश केला. ‘ चंद्रकांत ज्वेलरी ‘ शहरातल्या मोठ्या ज्वेलरी शॉप पैकी ते एक होतं. गेली वर्षानुवर्ष राजेशिर्केंच्या घरात समारंभापासुन ते लग्नापर्यंत सोन्याच्या सगळ्या दागिन्यांची खरेदी इथूनच केली जायची. अरुंधती आत आली. दुकानाच्या गल्ल्यावर स्वतः दुकानाच्या मालकीण बाई बसल्या होत्या.
” हॅलो, राजेश्वरी ” अरुंधतीने हसत म्हटलं.
” अरुंधती तू ये ना ” राजेश्वरी उठून उभी राहत म्हणाली. दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. किटी पार्टी, फॅमिली फंक्शनच्या निमित्ताने दोघींची बर्‍याच वर्षांपुर्वी ओळख झाली होती. तसंही अरुंधतीला आपल्या तोलामोलाच्या मंडळींमध्येच वावरायला जास्त आवडायचं त्यामूळे शहरातल्या एका नावाजलेल्या ज्वेलर्सची बायको अरुंधतीची मैत्रिण नसली तरच नवल! राजेश्वरीने अरुंधतीचं हसुन स्वागत केलं. अरुंधतीच्या एका मैत्रिणीच्या मुलीचं लग्न होतं आणि गिफ्ट म्हणून द्यायला एखादा सोन्याचा नेकलेस तिला हवा होता त्यासाठी ती आज दुकानात आली होती. जास्तीत जास्त चांगल्या आणि लेटेस्ट डिझाईनचे नेकलेस अरुंधतीला दाखवा असं दुकानातील नोकरांना राजेश्वरीने सांगितलं आणी ती पुन्हा गल्ल्यावर जाऊन बसली. नोकरांनी त्याप्रमाणे वेगवेगळ्या नेकलेसचे बॉक्सेस तिच्यासमोर उघडून ठेवले. ती खूश होत त्या डिझाईंन्स पाहु लागली इतक्यात तिच्या कानावर एक आवाज आला.
” You fool माझ्या पायावर कॉफी सांडण्याची हिंम्मतच कशी झाली तुझी ! एक कॉफीमग नीट पकडता येतं नाही तुला ! ”
या आवाजाने अरुंधतीने मागे वळून पाहिलं तर ती समिहा होती. समिहा चंद्रकांत बिराजदार ! त्या मोठ्या ज्वेलरीशॉपची एकमेव वारस आणि राजेश्वरी – चंद्रकांत यांची एकुलती एक मुलगी.
क्रमशः

आधीचे भाग

बंधन भाग 10

 

Article Tags:
· ·
Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.