बंध प्रेमाचे 10

Written by

 

निखील आज अक्षरशः हवेत तरंगतच रूमवर आला.
आज मै उपर,असमा नीचे,अस काहीस झालं होतं त्याचं😊.
“बरं झालं रोहन नाहीये,नाहीतर आता काही खरं नव्हतं माझं तो यायच्या आधी इराला कॉल करू”म्हणत त्याने इराला फोन केला.
unknown number पाहून काहीश्या त्रासिकतेने तिनं कॉल घेतला.
“hallo कोण?”…………इरा
“इतक्यात विसरलीस,बघ रे देवा😌”…………..निखील
“निखील तु☺️”…………….इरा
“हो मीच☺️”…………….निखील
“पोहचलास का रूमवर?आणि सांग ना तुला नंबर कसा भेटला माझा?”………….इरा
“हो मी पोहचलो ग आणि नंबर च म्हणशील तर हमारे जासुस  आपके चारो ओर फैले है इरा मॅडम☺️”…………निखील
“ये किती नखरे करतो रे😏 नको सांगु, मला माहीतिये ना ती अवनी एक नंबर चमची आहे तुझी तिनेच दिला असेल”………..इरा
“ये तिला नको काय बोलू हा आणि खूप प्रेम आहे तीच तुझ्यावर”……………निखील
“ते माहितीये रे मला☺️”……………इरा
“बरं आता अवणीवर नंतर बोलूया का😓?जरा आपल्याबद्दल बोललं तर चालेल का तुम्हाला🙏”………….निखील
“निखील😊”………………..इरा
“इरा खरंच आजचा दिवस खूप spl आहे माझ्यासाठी, तुझंही माझ्यावर प्रेम असेल असं वाटलंच नव्हतं मला”……..निखील
“मला पण☺️”………..इरा
“जे आता प्रेम आहे,
तेच पुढेही असेल,
तुझ्यातच सुरवात झाली,
आणि तुझ्यातच शेवट असेल”………..☺️☺️☺️निखील
“ooo शायर,तु अस कविता वगैरे करत असशील अस वाटत नाही तुझ्याकडं पाहून”…………इरा
“आधी नव्हतो करत,पण आता कोणीतरी मिळालंय मला तिच्याकडे पाहिलं की सुचत आपोआप☺️”……….निखील
“हो का😊?बरं चल by ठेव आता फोन बोलू उद्या”………….इरा
“काय हे ,तु पण ना😞 बरं by उद्या बोलू “म्हणत निखिलने फोन ठेवला.
निखील फ्रेश होऊन आला तोवर रोहन आला,
“काय मग प्रेमवीर,काय म्हणतात आमच्या वाहिनी😁😜”………….रोहन
रोहनच्या या वाक्यावर निखील अक्षरशः लाजला😊😊.
“oooo my god, किसिके मन मे लाड्डू फूट रहे है☺️”………..रोहन
“रोहन बास हा आता😊”………निखील
“मी अजून सुरवात पण नाही केली☺️”अस म्हणत रोहनने त्याचा खूप समाचार घेतला.बोलत बोलतच जेऊन दोघे झोपी गेले.
सकाळी इरा लवकरच उठली,खूप फ्रेश वाटत होतं तिला.इतक्या दिवसाचा ताण, मरगळ नाहीशी झाली होती.उठल्या उठल्या तिनं निखिलला good morning चा msg टाकला.
इकडे निखील ही इराला msg करावा का नको हा विचार करत मोबाईल हातात घेऊन बसला होता.इराचा msg पाहुन त्यानं आनंदानं उडीच मारली☺️.
“very good morning dear,आज शार्प 10 वाजता clg पार्कींग मध्ये भेट दोघ सोबतच जाऊ”………निखील
“अरे नको,आधीच आधीच ग्रुप समोर कस जायचं याच टेन्शन आलय मला त्यात आपल्याला सोबत बघून ते तर चिडवायची संधी नाहीत सोडणार”………..इरा
“चिडवु देत ना मग,मला चालेल तुझ्या नावानं मला चिडवलेलं☺️”………….निखील
“निखील☺️,खूप हट्टी आहेस, तु ऐकणार नाहीस माझं”………..इरा
“नाही☺️”……………निखील
“ok चल भेटु पार्कींग मध्ये by”………..इरा
“Thats Like A Good Girl☺️by”……….निखील
आज इराने तयार व्हायला बराच वेळ लावला तिची आई म्हणाली सुद्धा,”आज काही spl आहे का?इतकी छान तयार होऊन जातीयेस”
“तुझं काहीही असतं हा आई ,तुच बोलतेस जरा छान राहत जा आता झालीये तयार तरी तुला प्रॉब्लेम आणि बाय मला लेट होतोय निघते मी”म्हणत ती बाहेर पडली.
इरा कॉलेज पार्कींग मध्ये पोहचली तर निखील आधीच तिथे उभा होता.त्याने इराला येताना पाहिलं.आजचा तिच्यातला बदल त्याने अचुक हेरला पण बोलला काहीच नाही.
“चल निघुया☺️”………….निखील
“किती रुड आहे हा ,काल किती छान बोलत होता आणि आता साधी कॉम्प्लिमेंट ही नाही,कुजका😏”इरा मनातच म्हणाली.
“ok चल”………इरा
दोघेही एकत्रच कॅन्टीन मध्ये गेले, दोघांना असं एकत्र पाहुन ग्रुप मधल्या सगळ्यांनाच धक्का बसला🙄फ़क्त अवनी आणि रोहन सोडून.
“अरे आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?चक्क राहू केतू एकत्र आलेत😁”…………पल्लू
“अगं पल्लू याची सवय करून घे ,आता रोजच तुला हे बघायला मिळणार आहे☺️”…………रोहन
रोहनने अस म्हणताच इराने पटकन निखीलकडे पाहिलं.
“त्याला माहितीये सगळं “निखील कुजबुजला.
“रोहन तु गप बसतो का जरा😡”………निखील
“का?का?त्यानं का गप्प बसायचं?एकमेकांच्या सावलाही न उभी राहणारी लोक एकत्र आली तर कोणीही बोलणारच ना?”……………पल्लू
“अरे असं काही नाही आम्ही आता एकत्र ही येऊ नये काय?तसं असेल तर सांगा हा?”निखील रागावल्याचा आव आणत म्हणाला.
“अरे नाही बाबा😌आम्ही तर फक्त असंच मजा घेत होतो तुमची चिडू नको लगेच सॉरी😞”…………पल्लू घाबरतच म्हणाली.
“ये पल्लू तु काय घाबरते याला”…………..रोहन
“अरे त्यांचं माहितीये ना,मी राहायची बाजूला आणि यावरून हे दोघ एकमेकांसोबत भांडत बसतील”………….पल्लू
“ते काय भांडत नाहीत आता,त्यांचं तर आता हम आपके है कोण वरून हम साथ साथ झालाय😂😂”………रोहन
“म्हणजे?नेमकं काय?काहीच कळत नाहीये तु बोलतो ते,सांग ना नीट”…………..पल्लू
“रोहन तुझ्या पोटात काहीच राहत नाही ना😡,कधी पचकतो असं झालं असेल तुला”……….निखील वैतागून म्हणाला.
“आता काय बाबा,लोकांना आमची गरज नाही .काम होत तर सारखे फोन करायचे ,काम झालं तर frnd ना विसरले😏,”इतकावेळ गप्प बसलेली अवनी बोलली.
इराला तर काय बोलाव हे सुचतच नव्हतं. ती आपली गप्प खाली मान घालून बसली होती.
“इराही काहिच बोलत नाहीये, आम्हाला ही समजु दे काय चाललंय नेमकं”…………पल्लू
“तु मंद आहेस का ग?इतक्या हिंट्ट दिल्या तरी तुला काही समजत नाही?”……….रोहन
“रोहन,समझनेवाले समझ गये ना समझे वो अनाडी हैं😜”…………अवनी
“एक मिनिट,हिंट्ट, अनाडी plz नीट सांगा ना मला काय ते “पल्लू वैतागुन बोलली.
“थांब मीच सांगतो नाहीतर हे काय मला इथं गप्प बसु देणार नाहीत”……….निखील
“अब आया उंट पहाड के निचे😂,तेच मघाशी सांगितलं असतंस तर आम्हाला आमची एनर्जी वाया घालवावी लागली नसती”………..अवनी
“तुमच्या सारखे frnd असल्यावर काय होणार ,तर gys काल मी इराला प्रपोज केलं आणि आता आम्ही कमिटेड आहोत☺️”……………निखील
“काय?”……………..सगळे एकदम ओरडले.
“अरे हळू इतकं काय ओरडताय”…………निखील
“हे कधी झालं?कस……म्हणजे……तुम्ही…..,😌😌………पल्लू ओरडली.
“अगं हो श्वास घे आधी नंतर सांगतो☺️”………..निखील
सगळेजण अजूनही धक्क्यातच होते.
निखिलने ग्रुप ला सगळं सांगितलं,सगळेच आश्चर्यानं इराकडं पाहत होते आणि या मॅडम खाली मान घालून फक्त लाजत होत्या😊😊😊.
“oooo कुणीतरी किती blush करतंय बघा”………..अवनी
“हो तर,गुलाब फुललेत गालावर अगदी😂”……….पल्लू
“ये गप्प बसा ग तुम्ही ती निखीलकडे पाहत बोलली,निखील तिच्याकडे पाहून फक्त हसत होता.
“इरा मगं निखिलने गिफ्ट काय दिल तुला?सांग ना?म्हणजे तुला सांगायचं असलं तरच सांग हा😂😂😜”……..पल्लू तिची खेचत बोलली.
“”पेन☺️”………..इरा
“काय?”अवनी,रोहन,इशा,पल्लू सगळे एकदमच ओरडले.
“ये तुम्ही प्रत्येक वेळी असे ओरडता काय रे”………निखील
“seriously इरा,निखिलने तुला फर्स्ट गिफ्ट पेन दिलंय?”…………अवनी हसतच बोलली.
“काय यार निखील,कुणाला सांगू नको हा तु माझा frnd आहेस म्हणून,उगाच गैरसमज करून घेतील सगळे माझ्याबद्दल😀😁😀”………..रोहन
“ये एवढं काय?पेन देत नाहीत  का कोण गिफ्ट म्हणून”……….निखील
“देतात ना पण ते  लहान मुलांना birthday ला वगैरे ला देतात,प्रपोज करताना नाही😂😂 आणि तु कधी कुणाचं पाहिलं किंवा ऐकलं नाहीस का gf ला काय गिफ्ट देतात😀”………. अवनी
त्या सगळ्यांच बोलणं ऐकून निखिलच तोंड तर अगदी एवढस झालं😞.
त्याचा चेहरा पाहून इरा बोलली”गप बसा रे तुम्ही सगळे,त्या बिचार्याला का बोलताय?त्याला नाही माहीत तर राहूदे ना आणि मला आवडलं त्याच गिफ्ट☺️”….
“बरं, आता तो बिचारा काय, जाऊदे ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खर😏,घोर कलियुग आलय देवा….दोस्त,दोस्त ना रहा😞”…………अवनी
“अवनी बस कर नौटंकी आणि गिफ्ट काय दिलंय यापेक्षा त्यामागच्या भावना महत्वाच्या असतात.त्या निस्वार्थ असल्या ना तर झालं,मग ते गिफ्ट कसलंही असलं तरी आपल्यासाठी अमूल्य असतं”इरा निखिलच्या डोळ्यात बघत बोलली.
निखील तर इराकडे पाहतच राहिला,किती छान विचार आहेत हिचे,याचमुळे तर मी हिच्याकडे ओढला जातो नेहमी☺️.
“बरं चला आता lecture ला जाऊया तुमचं सगळं विचारून झालं असलं तर आणि अभ्यास ही करूया का थोडा?”इरा उठत बोलली तसे सगळेच उठले.निखील जाता जात हळुच इराच्या कानात कुजबुजला,
“खुप गोड दिसतीयेस आज☺️ पण spl माझ्यासाठी असं तयार होऊन नको येऊ ,तु जशी आहेस तशीच मला खूप आवडतेस माझ्यासाठी तु बदललेलं मला कधीच नाही आवडणार☺️”.
इराने हळुच निखीलकडे पाहिलं,तिला आईबरोबरच तिचं बोलणं आठवलं,
“ज्याला मी जशी आहे तशी आवडेन त्याच्याशीच करेन मी लग्न”तिला अगदी गहिवरून आलं.
“I love you so much Nikhil😊” म्हणत ती पटकन
कलासमध्ये गेली,निखील ही हसतच तिच्या मागे क्लास मध्ये गेला.
(निखील आणि इराची बहरत चाललेली केमिस्ट्री पाहुया पुढच्या भागात)
*****************
(मागच्या तुमच्या कंमेंट्स मुळे पुढे लिहायला उत्साह आला असच इरा आणि निखीलवर प्रेम करत रहा आणि काही चुकलं असेल तरीही सांगा म्हणजे मला माझ्या लिखाणात सुधार करता येईल तुमच्या कंमेंट्स आणि रेंटिंग खूप  महत्वाच्या आहेत )

Article Categories:
प्रेम

Comments are closed.