बंध प्रेमाचे 11

Written by

 

निखील आणि इरा मधलं प्रेम दिवसेंदिवस बहरत होत.दोघांनी ठरवलं होतं आधी करियर त्यामुळे इतर कपलसारखं फिरायला जाणं, मुव्ही वगैरे त्यांनी कधीच केलं नाही.कॉलेजमध्येही जेवढ्यास तेवढं बोलत ते .त्यांच्या रिलेशनबद्दल फक्त त्यांच्या ग्रुप ला माहीत होतं.बघता बघता second semister ही झाली,नाही म्हणायला पेपर्स संपल्यानंतर त्यांच्या ग्रुपने मस्त एक दिवस ट्रिप काढली होती .ट्रिपवरून आल्यानंतर सगळे आपापल्या घरी निघून गेले.निखिलने गावी गेल्यापासून एकदाचं इराला कॉल केला होता त्यामुळे ती खूप चिडली होती.
“कॉलेज होते तेंव्हाची गोष्ट वेगळी पण आता सुट्टीत रोज कॉल करायला काय होत याला ?जाऊदे मीच करते”म्हणत तिने निखिलला कॉल केला,
इकडे निखिलच्या घरी त्याला भेटायला त्याच्या मामांची मूल आली होती रश्मी आणि साहिल,तिघेही सेम एजची असल्यामुळे लहानपणापासून त्यांच छान पटायचं ,सुट्टीत तिघेही खूप धमाल करायचे .आताही तिघे बोलत बसले होते इतक्यात इराने कॉल केला.इराचा कॉल पाहून नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्याने कॉल रिसिव्ह केला तोच इरा तिकडून सुरू झाली,
“निखील आहेस कुठे?साधा एक कॉल करता येत नाही का तुला दिवसभरात?का तिकडं जाऊन विसरला लगेच?”
“अगं हो,मी करणारच होतो आता,तितक्यात तुच कॉल केलास😊”…………..निखील
“बोलायला कसा ऐकशील तु,आपल्या कॉल ची कुणीतरी वाट पाहत असेल हे ही लक्षात नसेल तुझ्या😏”………..इरा
“बरं मॅडम चुकलं माझं पुन्हा अस नाही होणार☺️”……….निखील
“तु नाही केला ना आता कॉल तर बघ मी बोलणारच नाही पुन्हा तुझ्याशी😏”…………..इरा
“अगं आता चुकलं बोललो ना आता काय कान पकडून उठाबशा काढू का?”…………निखील
रश्मी आणि साहिल आश्चर्याने निखीलकडे पाहत होते निखिलची कुणीच मैत्रीण वेगैरे नव्हती त्यामुळे त्यांच्यासाठी हे नविनच होत निखिलला तर ते दोघे ही त्याच्यासमोर आहेत याच ही भान नव्हतं.
“एवढं काही नको करू?चल बक्ष दिया तुझे,ये एहसान आपपे उधार रहा😜”………..इरा नौटंकी करत बोलली.
“धन्य आहेस तू☺️”अस म्हणत त्याने समोर पाहिलं तर रश्मी आणि साहिल त्याच्याकडेच पाहत होते तेंव्हा त्याच्या लक्षात आलं आपण माती खाल्ली ते.
“बरं इरा ऐक ना आपण नंतर बोलूया का?आता जरा कामात आहे मी”………निखील
“ठीक आहे 😞,वेळ मिळाला तर कर कॉल”म्हणत इराने कॉल ठेवला.
निखिलने फोन ठेवला तस साहिल ने प्रश्नांचा भडिमार सुरू केला,
“काय रे कोण होती ती?frnd की girlfrnd?आणि आम्हाला कधी बोलला नाहीस हिच्याबद्दल?”
“अरे बोलू तर दे मला किती प्रश्न विचारतोयएस”………..निखील
“बरं बोल”…………साहिल
“इरा माझी frnd आहे,आम्ही एकाच क्लास मध्ये आहोत ,बसं इतकंच☺️”……….निखील
“नक्की इतकंच?तुझ्या बोलण्यावरुन तरी वाटत नव्हतं की इतकंच असेल ,खरं सांग”……….साहिल
“अरे बाबा खरचं frnd आहे माझी आणि सांगण्यासारखं असेल तेंव्हा नक्की सांगेन तुम्हाला”निखील आपली नजर चोरत म्हणाला.
“बरं चला बास झाल्या गप्पा आता जेऊन घेऊया” म्हणत तो उठला.
निखिलचा फोन ठेवल्यानंतर इराने फेसबुक ओपन केल बरेच दिवस ओपन न केल्याने खुप सारे मेसेजेस,फ्रेंड रिक्वेस्ट पडल्या होत्या.फ्रेंड रिक्वेस्ट चेक करता करता तीला त्यात निखीलची रिक्वेस्ट दिसली.आधी भांडणामुळे त्यांनी एकमेकांना रिक्वेस्ट पाठवली नव्हती नंतर इच्छा असूनही तिची हिम्मत नाही झाली आता निखीलनेच रिक्वेस्ट पाठवलेली पाहून तिने पटकन expect केली आणि त्याच प्रोफाइल ओपन केलं.प्रोफाइल पाहता पाहता तिचे डोळे त्याच्या birhdate वर येऊन थांबले,”परवा निखिलचा बर्थडे आहे😊”म्हणत तिनं आनंदानं उडीच मारली पण क्षणभरच”तो तर  साताऱ्यात आहे कसा करणार सेलिब्रेट😓”….डोक्याला ताण देऊनही काही सुचेना शेवटी कंटाळून तिनं अवनीला कॉल केला,
“हॅलो”…………इरा
“हॅलो मॅडम बोला☺️,लवकर आठवण झाली मैत्रिणीची”……….अवनी
“तुझं काय आता मधेच ,परवाच तर बोललो ना आपण”इरा वैतागतच बोलली.
“मॅडम चा मूड खराब दिसतोय,काय भांडण वेगैरे केलंत की काय?”…………..अवनी
“भांडण करायला त्याच्याकडे वेळ तरी पाहिजे ना,स्वतः कॉल करत नाही आणि मी केला तर कामात आहे नंतर बोलू म्हणत सरळ फोन ठेऊन दिला त्याने😡”…………इरा
“अच्छा म्हणून मूड खराब आहे?अगं खरचं busy असेल,करेल ना नंतर कॉल एवढं काय त्यात?”……….अवनी
“तु चमची आहेस त्याची तु त्याचीच बाजु घेणार माहितीये मला पण माझा मूड त्यामुळे नाहीये खराब ,परवा निखीलचा बर्थडे आहे😞”…………….इरा
“अरे वा!मस्तच,तु तर खुश व्हायला पाहिजे तोंड पाडून काय बोलतेस”……….अवनी
“अगं मंद मुली, मस्त काय?तो आहे का इथे सेलिब्रेट करायला?”………….इरा
“अगं हो आता काय करायचं🤔”…………अवनी
“मला काही सुचेना म्हणून तर तुला कॉल केलाय ना”……….इरा
“थांब विचार करू दे🤔🤔🤔🤔,आयडिया!surpeise देऊया त्याला ते पण तिथं जाऊन ,कशी वाटली आयडिया☺️?”…………….अवनी
“तु लहानपणी डोक्यावर पडली होतीस का गं?म्हणे तिथं जाऊन सरप्राईज देऊया,असं न सांगता अचानक कसं जाणार?त्याच्या घरचे काय म्हणतील?”………..इरा
“सरप्राईज न सांगताच द्यायचं असत म्हणून तर त्याला सरप्राईज म्हणतात ना😀😜 आणि त्याच्या घरच्यांच म्हणशील तर त्यादिवशी आपण आंटी ना भेटलो होतो मला तरी त्या कूल टाईप वाटल्या त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही☺️”………अवनी
“अगं पण”………..इरा
“याच्यापेक्षा बेटर आयडिया असेल तर सांग नाहीतर गपचुप माझं ऐकायचं”………….अवनी
“पण आपण दोघीच कसं जाणार तिकडे?”………इरा
“दोघी का?सगळ्या ग्रुप ला घेऊनच जायचं☺️तु एक काम कर कॉन्फरन्स वर घे सगळ्यांना”……..अवनी
इराने पटकन सगळ्यांना कॉन्फरन्स वर घेतलं,
अवणीने सगळ्यांना प्लॅन समजावून सांगितला सगळेच एक्साईट होते निखिलच्या birthday सेलिब्रेशन साठी त्यामुळे सगळ्यांनी जायला होकार दिला.
“मगं ठरलं तर उद्या सगळ्यांनी पुण्यात यायचं परवा सकाळी लवकर निघुया आपण”…………अवनी
“ok boss”सगळे एकदम ओरडले.
“आणि हो इरा,निखिलच फोन आला तर पचकू नकोस सगळं”…………अवनी
“नाही बोलत काही”………इरा
“बरं उद्या त्याला फक्त मी विश करिन बाकी कुणीच नाही करायचं,इरा तु ही नाही त्याला असं वाटलं पाहिजे की त्याचा बर्थडे कुणालाच माहीत नाही☺️”……….रोहन

“ये मी करते ना विश”……….इरा छोटसं तोंड करत बोलली.

“अजिबात नाही,सब्र कर बेटा सब्र का फल मिठा होता है”😀😀😀😀”………….अवनी
“तुमच्या सरप्राईज च्या नादात जीव घ्याल तुम्ही माझा”……..इरा
“असं काही नाही होत,चला फोन ठेवा आणि लागा तयारीला मिशन निखीलचा बर्थडे😀”……….रोहन
“ok by gn”म्हणत सगळ्यांनी फोन ठेवला.
इरा तर खूप exite होती निखिलच्या घरी जाण्यासाठी. तिच्या पोटात तर अगदी फुलपाखरं उडत होती😊.त्याच धुंदीत ती झोपली.सकाळी तिने पहिला आईला सांगितलं निखिलच्या birthday सेलिब्रेशन चं आणि सगळेच जाणार म्हंटल्यावर आईनेही होकार दिला.
थोड्यावेळाने ती मार्केट मध्ये गेली निखीलला गिफ्ट घेण्यासाठी.निखीलचा 23 वा बर्थडे होता म्हणून तिनं 23 गिफ्ट्स घेतली त्याच्यासाठी आणि घरी आली.घरी घरी येऊन तिनं फोन चेक केला तर निखीलचे 4 मिस्ड कॉल्स होते.पटकन तिनं कॉल केला,
“हॅलो निखील बोल ना”…………इरा
“काय गं किती कॉल केले तुला?”………..निखील
“अरे सॉरी मी जरा बाहेर गेले होते त्यामुळे लक्षात नाही आलं”………..इरा
“बरं ठीक आहे ☺️”……….निखील
“बरं ऐक ना निखील,उद्या मी जरा गावी जाणार आहे तर तिथे रेंज नसते सो मला कॉल नाही लागणार,उगाच तु कॉल करत बसशील म्हणून सांगतीये”………….इरा
“अगं पण उद्या”…………….निखील
“हो रे अचानक ठरलं आईच,मगं काय जावंच लागणार परवा येईन परत आल्यावर कॉल करते तुला”………….इरा
“उद्याचं जायचं होतं का तुला”……निखील जरा रागातच बोलला.
“अरे हो,पण तू का विचारतोय सारखं उद्या काही आहे का”?……….इरा
“नाही काही नाही😡,बरं मम्मा बोलावतीये वाटत मी करतो तुला कॉल”म्हणत निखिलने कॉल ठेवला.
इरा इकडे मिश्कीलपणे हसत होती तर निखीलचा राग अगदी सातवे आसमान पे गेला होता,
“काय मुलगी आहे bf चा birthday पण माहीत नाही हिला साधा😏,ठरवलं होतं उद्याचा दिवस छान सेलिब्रेट करू पुण्याला जाऊन पण आता हीच नाहीये तिथं तर काय करणार जाऊन निखील राजे बसा आता तुम्ही घरातच नेहमीप्रमाणे”….
ठरल्याप्रमाणे रात्री 12 वाजता रोहनने निखील ला कॉल करून विश केलं,
“काय मगं मज्जा आहे बाबा एका मुलाची इरा वाहिनीचा तर पहिला कॉल असेल”………..रोहन
“कुठलं काय😞,तिला माहीत पण नाही माझा birthday आहे ते”………..निखील
“काय?????अरे रे ,ये तो बहोत बुरा हुआ”………रोहन नौटंकी करत बोलला.
“गप रे तु माझ्या जखमेवर मीठ नको चोळू😡😡”………..निखील
“खूपच चिडलेत वाटत राजे, अरे तिला नसेल माहीत,तु सांगायचं ना तिला”…………रोहन
“मीच सांगू का तिला माझा birthday आहे म्हणून😡”……….निखील
“बरं तु नको सांगु, मी सांगु का?”………रोहन
“अजिबात नाही,तु सांगितलंस ना तर बघ😡”………निखील
“ok नाही सांगत पण तू चिडू नको आजचा दिवस एन्जॉय कर चल by”…..……रोहन
“ok by”म्हणत निखिलने call ठेवला.
इकडे खुप इच्छा असूनही इरा निखिलला कॉल करु शकत नव्हती,इतक्यात रोहनने तिला कॉल केला,
“हॅलो इरा”……….रोहन
“हा बोल ना,केलास का निखिलला विश?”………इरा
“हो केलं आताच पण तो जाम चिडलाय तुझ्यावर”म्हणत त्यानं दोघांच बोलणं तिला सांगितलं.
“तुमच्या सरप्राईज च्या नादात वाट लागणारे माझी आणि तुला कुणी सांगितलं होत आगीत तेल ओतायला😡”……….इरा
“ते मी असंच जरा मज्जा घेतली त्याची😂आणि काही नाही होत उद्या बघ राग कसा पटकन जातो त्याचा☺️”………..रोहन
“असंच होऊदे”………..इरा
“dont worry असंच होईल,बरं आता झोप उद्या लवकर निघायचंय”………..रोहन
“हो चल बाय☺️”…………..इरा
सकाळी लवकर रेडी होऊन ती स्टँडवर पोहचली.थोड्याफार फरकाने सगळेच आले.तिच्या हातातली बॅग बघून आवणीने चिडवायला सुरू केलं,
“इरा आपण फक्त birthday celebration साठीं निघालोय तिथे,तुझा काय कायमचा राहायचा प्लॅन आहे की काय😜😜😜”………..अवनी
“तसं असेल तर आताच सांग हा आम्ही आमच्या मनाची तयारी करतो😜😜😂”………पल्लू
“ये गप बसा, गिफ्ट आहे त्यात निखिलसाठी😊”………इरा
“काय!!!!!!!!!एवढ्या मोठ्या बॅगमध्ये??काय आहे काय असं?सांग ना आम्हाला ही☺️?”…………..अवनी
“ते सरप्राईज आहे😊😊 तिथे गेल्यावर समजेल तुम्हाला☺️”………..इरा
“अच्छा हमारी बिलली हमिसे म्याव😏”……….अवनी
“आधी निखिलला मग सांगेन तुम्हाला आणि चला आता नाहीतर दिवस संपला तरी तुमच्या गप्पा नाहीत संपणार”…………इरा
“oooooooo बघा,बघा,कोनालातरी किती घाई झाली आहे “…………पल्लू
“तुम्ही काही सुधरणार नाही,आधी गाडीत बसा मग चिडवा काय चिडवायचं ते”……….इरा
सगळे बसमध्ये बसले,गाडी सुटली तसा इराचा निखीलकडे जाणारा प्रवास सुरु झाला.
(birthday चं निखिलला surprise तर भेटणार आहेच पण त्याबरोबर इरालाही एक surprise मिळणार आहे ते काय असेल पाहुया पुढच्या भागात)
*****************************
(हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कंमेंट्स द्वारे सांगा तुमच्या रेटिंग, कंमेंट्स बहुमूल्य आहेत आणि सॉरी हा पार्ट थोडा लेट पोस्ट केला पण पुढचा पार्ट नक्की लवकर पोस्ट करेन)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.