बंध प्रेमाचे 12

Written by

(इरा आणि तिचा ग्रुप साताऱ्याला निघाला निखिलला सरप्राईज द्यायला तिथून पुढे)
**************
बस स्टँडवर थांबली तशी पटापट सगळे खाली उतरले.इकडे तिकडे पाहत अवनी बोलली,
“रोहन पटकन निखीलचा adrs सांग रिक्षा बोलवुयात”….
“निखीलचा adrs ?मला नाही माहीत”…………रोहन
“काय😨😨😨😨?”…………सगळे एवढ्या जोरात ओरडले की आजूबाजूचे लोक ही त्यांच्याकडे पाहायला लागले.
“मूर्खां त्याच्यासोबत राहतोस आणि तुला त्याचा घरचा साधा adress नाही माहीत?”………..संदीप
“अरे खरंच नाही माहीत,मला वाटलं इराला माहीत आहे”………..रोहन
“मला कसा माहीत असेल?आता काय करायचं😞😞”..…….इराला थोडं टेंशनच आलं.
“हो ना,इथपर्यंत तर आलो त्याला सरप्राईज द्यायचं म्हणून पण आता त्याच्या घरचा adress त्यालाच विचारावा लागेल मग काय सरप्राईज बोंबलल”…………पल्लू
“सध्या त्याच्या घरी जाण महत्वाचं आहे तुमचं सरप्राईज नाही आणि तुमच्या या सरप्राईज च्या नादात मी अजून विश पण नाही केलं त्याला😡”………….इरा
“ये थांबा रे जरा किती बडबडताय,मला जरा विचार करू दे🤔🤔,आयडिया!रोहन तु कॉल कर निखिलला त्याला सांग मी साताऱ्यात आलोय कामानिमित्त आणि आलोच आहे तर तुझ्या घरी येऊन भेटून जातो कुठं राहतो सांग”……….अवनी
“nice idea☺️ थांब”म्हणत रोहनने निखील ला कॉल केला,
“हॅलो निखील, हॅप्पी बर्थडे वन्स आगेन☺️”………रोहन
“थँक्स रोहन”……….निखील
“अरे मी साताऱ्यात आलोय कामानिमित्त म्हंटल तुला भेटून जावं पण तू कुठं राहतो नक्की माहीत नाही जरा adress सांग रे”……….रोहन
“अरे मस्तच☺️तु कुठं आहेस आता मला सांग?मी येतो न्यायला”……….निखील
“अरे नको…..नको…….तु येणार इथे मग पुन्हा तुझ्या घरी जाणार वेळ जाईल त्यापेक्षा येतो मी तु adress दे फक्त”………..रोहन
“ok मी text करतो तुला☺️”……….निखील
“ok चल by भेटु☺️”म्हणत रोहनने फोन ठेवला.
“चला महत्वाचं काम झालं जाऊया आता” निखीलचा text बघत तो बोलला.
जस जस घर जवळ येत होतं इराची धडधड वाढली”आपल्याला इथं बघुन निखिल कसा रियाक्ट करेल?आनंद होईल का त्याला ?”ती स्वतःशीच बोलत होती.
तर इकडे निखील आज बर्थडे असूनही खुश नव्हता.कसा असणार,इराने त्याला विश जे केलं नव्हतं.तो सकाळपासून त्याच्या रूममध्येच बसला होता.रश्मी आणि साहिलने यावरून टोकल ही त्याला पण जरा डोकं दुखतंय थोडा आराम केला की बर वाटेल म्हणत त्याने त्यांना कटवल.
निखिलच्या घरासमोर रिक्षा थांबली तसे सगळे खाली उतरले रिक्षाचे पैसे देऊन ते घराकडं वळले.खूप छान बंगलो होता निखीलचा ,समोर लॉन, मधोमध कारंजा सगळ्यांच्या तोंडुन फक्त wow एवढंच निघालं.
अवणीने सगळ्यांना भानावर आणत घराची बेल वाजवली.रश्मीने दरवाजा उघडला,
“कोण हवंय?”………….रश्मी
“आम्ही निखिलचे frnds, निखील आहे का?”………रोहन
“हो या ना आता या “म्हणत रश्मी मागे वळली.
इतक्यात निखीलची मम्मा बाहेर आली,
“अरे तुम्ही?या ना निखील काही बोलला नाही तुम्ही येणार म्हणून?”……………निखीलची मम्मा
“actuly सॉरी आंटी,त्याला माहित नाही आम्ही येणार ते ,आम्हाला त्याला सरप्राईज द्यायचं होत म्हणून न सांगता आलो”……………इरा
“अगं सॉरी काय त्यात उलट मला खुप आनंद झाला तुम्ही आलात ,थांबा एक मिनिट मी निखिलला बोलावते सकाळपासून डोकं दुखतंय म्हणून रुम मधेच आहे तो”………निखीलची मम्मा
“आंटी आपण सगळेच जाऊया का त्याच्या रूममध्ये म्हणजे तुम्हाला चालत असेल तर”रोहन अडखळतचं बोलला.
“न चालायला काय झालं,रश्मी तु यांना निखीलची रूम दाखव तोवर मी यांच्यासाठी सरबत वेगैरे घेऊन येते☺️”म्हनत निखीलची मम्मा किचनकडे वळली.
रश्मीच्या मागे सगळेच निखिलच्या रूमकडे वळले,रश्मीने बाहेरूनच निखिलला आवाज दिला तस निखील बोलला,
“रश्मी plz yaar डिस्टर्ब नको करू,मी बोललो होतो ना मला आराम करू दे”..
“अरे पणं,”ती पुढे काही बोलणार इतक्यात रोहनने तिला थांबवलं आणि स्वतः हाक मारली.
रोहनचा आवाज ऐकून तो पटकन उठला आणि दरवाजा ओपन केला समोर सगळ्या गॅंग ला पाहून तो 2 मिनिट blanck च झाला☺️☺️☺️
“wish you very happy birthday Nikhil”सगळे एकदमच ओरडले तसं तो भानावर आला.
“अरे तुम्ही इथे?तुमच्या लक्षात होता माझा बर्थडे?”……….निखील
“अरे बस का,तुझा बर्थडे आम्ही कसा विसरु आणि आता आत येऊ देणार आहेस की इथूनच जाऊ आम्ही?”………..अवनी
“ooo सॉरी सॉरी या ना आत”म्हणत निखील बाजूला झाला तसे सगळे आत गेले.
“कसली भारी रूम आहे रे तुझी”………….अवनी
“thank you☺️, तुम्ही इकडे याल मला स्वप्नातही वाटलं नव्हतं यार”………….निखील
“हा सगळा प्लॅन इराचा होता आम्ही फक्त तिला follow केल☺️”………..अवनी
“खरंच”तो इराकडे पाहत बोलला
“मगं काय बर्थडे तुझा आणि आम्हाला झोपु नाही दिलंय हीन रात्रभर”………….पल्लू
निखिलने आश्चर्याने इराकडं पाहिलं पण ती मात्र मान खाली घालून गप्प उभी होती.
तिथं उभ्या रश्मीने निखील आणि इराकडे पाहिलं”या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सूरु आहे”ती मनातच म्हणाली.
“बरं आता गप्पा नंतर आधी ज्यासाठी अलोय ते करूया?”………..रोहन
“आधी काहीतरी खाऊन घ्या मग करा काय करायचं ते”……निखीलची मम्मा आत येत बोलली.
“thank you aunty, खरंच खूप भूक लागलेली”म्हणत अवनीने पटकन डिश उचलली.
“मम्मा ही एक नंबर भुक्कड आहे हिला एक डिश बास नाही होणार अजून 2-3आणून दे😂😂”………….निखील तिला चिडवत बोलला.
“मी भुक्कड काय?😡😡 जा तुला गिफ्ट च नाही देत”……….अवनी
“काय लहान मुलांसारखं भांडताय,गप्प बसा ना”………….इरा
“कोण बोलतंय बघा,The great Era madam आपण तर भांडणात PHD केलीये”………….अवनी पुढं काही बोलणार इतक्यात इराने तिला डोळ्यांनी गप्प बस म्हणून खुणावल उगाच निखिलच्या मम्मा च्या पुढ्यात अजून काही नको पचकायला……..अवनी शांत झाली.
निखीलची मम्मा कौतुकाने हे सगळं पाहत होती.आज पहिल्यांदाच त्यांनी निखिलला अस पाहिलं होतं.
“चला बर्थडे ची तयारी करू,केक येता येता ऑर्डर केला होता तो कुठवर आलाय हे ही पाहायला हवं”रोहन हातातली डिश खाली ठेवत ठेवत बोलला.
“चला मी तुम्हाला मदत करते आणि रश्मीला ही सांगा तुम्हाला काही हवं असेल तर”…………….निखीलची मम्मा
“अरे हिची ओळख करून द्यायची राहिलीच,ही रश्मी माझ्या मामांची मुलगी आणि रश्मी हे माझे फ्रेंड्स☺️”………..निखील
“बरं चला आता पटकन खाली,निखील तु ही रेडी होऊन खाली ये”म्हणत अवनी उठली तसे सगळेच खाली गेले.
इराला निखिलला विश करायचं होतं पण एकटीने तिथं थांबणं बरं दिसणार नाही म्हणून ती ही सगळ्यांबरोबर बाहेर पडली,अवणीने ते बरोबर ओळखलं,
“इरा निखिलच्या रूममध्ये माझी बॅग राहिली ती घेऊन येतेस का जरा☺️”………..अवनी
“हो आणते ना”म्हणत इरा पटकन निखिलच्या रूमकडे गेली आणि दरवाजा knock केला.
“कोण”………..निखील
“मी इरा”……………इरा
“अगं ये ना “……………निखील
इरा आत आली तशी त्याच्याकडे पाहतच राहिली.नेव्ही ब्लु कलर चा शर्ट ,ब्लॅक जीन्स खूपच handsom दिसत होता तो.
“काय ग अशी काय बघतेस☺️?”…………त्यानं मिश्कीलपणे विचारलं.
“काही…..नाही…..मी……ते…..अवणीची बॅग न्यायला आले होते”…….इरा अडखळत बोलली आणि बॅग घेऊन पटकन जायला वळली इतक्यात निखिलने तिचा हात पकडला☺️,इराच हार्ट तर 180 च्या स्पीड ने पळत होत😊.
“निखील काय करतोयस?हात सोड माझा कुणीतरी बघेल”…………इरा
“Thank you so much Era माझा बर्थडे इतका spl बनवल्याबद्दल☺️”निखील तिला मिठीत घेत बोलला.
“तुझ्या प्रेमाने जीवन दिले,
तुझा वाढदिवस जरा ज्यास्त खास आहे,
तुझ्यासोबत नवे आयुष्य जगण्याची,
मनात एक सुरेख आस आहे…………….
i Love You Nikhil, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा”म्हणत इराने त्याच्या गालावर किस केलं आणि ती पळतच बाहेर गेली😊.आता जे घडल ते निखिलला समजेपर्यंत ती रूमबाहेर गेली होती.
“इरा थांब”म्हणत निखील ही तिच्यामागे बाहेर आला.
सगळ्यांनी खूप उत्साहात निखीलचा बर्थडे सेलिब्रेट केला.सगळ्यांनी मिळुन निखिलला गिफ्ट दिल,इरा एका साईड ला उभी राहून बघत होती.
“इरा अगं निखिलच गिफ्ट दे ना”………..अवनी
“हं, हो देते ना”म्हणत इराने बॅग च निखिलच्या हातात दिली.
“हे काय बॅग😂😂?बॅग गिफ्ट करतीयेस तु निखिलला😂😂?”……………रश्मी
“बॅग कशी देईल ती,बॅगमध्ये असेल गिफ्ट, निखील बघ ना खोलून काय आहे आम्हाला ही दाखवलं नाही हिने”………….अवनी
“अगं तो पाहिलं ना नंतर”इरा कसंनुस म्हणाली.
“ते काही नाही आम्हाला ही बघू दे ना एवढं काय आहे त्यात”…………..निखीलची मम्मा
निखिलने बॅग खोलली तर बॅग भरून गिफ्ट्स होते☺️.
“एवढे गिफ्ट्स?”…………..रोहन
“मज्जा आहे बाबा निखीलची”………….अवनी
निखिलच्या मम्माच्याही लक्षात आलं होतं एव्हाना की नक्कीच काहीतरी सुरुये दोघांत पण त्या सोईस्कर रित्या दुर्लक्ष करत होत्या.
“काय कसला गोंधळ चाललाय?आवाज अगदी बाहेरपर्येंत येतोय”………म्हणत निखीलचे डॅड घरात आले त्यांच्यापाठोपाठ साहिल आणि निखीलचे मामा ही आले.
“अरे डॅड, हे माझे frnds आहेत बर्थडे साठी आलेत sply☺️”…………..निखील
“अरे वा छान☺️,मला माहित नव्हतं तु इतके frnds बनवले तिकडं☺️’………..निखीलचे डॅड
“मामा तुम्ही अचानक?”……….निखील मामांकडे पाहत बोलला.
“अरे जरा काम होत म्हणून आलो होतो म्हंटल तुझा वाढदिवस ही करून जावं☺️”…………निखीलचे मामा
“अरे संध्याकाळी छोटं सेलिब्रेशन करणार होतो तुझ्या बर्थडे च,तुला सरप्राईज☺️ पण आमच्या आधी तुझ्या frnds नि सरप्राईज दिल☺️”………..साहिल
“आता लहान आहे का मी?सरप्राईज काय?बर्थडे सेलिब्रेशन काय?”………….निखील हसतच बोलला
“आता लहान नाहीयेस म्हणूनच तर,सेलिब्रेशन तर एक कारण होत एक महत्वाची annousment करणार होतो आम्ही☺️”……………निखिलचे मामा
“कसली annousment?”…………..निखील
“दादा आता नको त्याचे frnds आलेत enjoy करुदे त्याला ,आपण नंतर बोलू याविषयी”………..निखीलची मम्मा
“अरे हिच वेळ चांगली आहे त्याचे frnds पण आहेत इथे तर आपण सांगायला काही हरकत नाही ,रात्री सांगायचं ते आताच सांगू”……………निखीलचे मामा
“काय चाललंय तुमचं मला समजेल असं बोलाल का “?…………..निखील
“निखील तु लहान असताना तुझ्या आईने मला शब्द दिला होता की रश्मीला ती तिची सून बनवून घेईल ,आता तु पुण्याला आहेस उगाच तिकडे कुठल्या मुलीत गुंतण्याआधी ही गोष्ट तुझ्या कानावर घालायची होती तेच सांगणार होतो तुला रात्री☺️”…………….निखीलचे मामा
निखिलच्या मामाचं बोलणं ऐकून सगळेच स्तब्ध झाले,इराला तर आपण काय ऐकतोय हेच कळत नव्हतं.
“पण मामा”………….निखील
“आमचं बोलून झालाय यावर कुणाचा काही पण नसावा” निखीलचे मामा त्याला मधेच थांबवत बोलले.
इराच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं कोणत्याही क्षणी ते बाहेर आला असत रोहनने ते पाहिलं,
“आम्ही आता निघतो ऑलरेडी लेट झालाय आम्हाला”………रोहन
“अरे असं कसं जेऊनच जायचं एवढी चांगली बातमी संगीतलीये ” ………..निखीलचे मामा
“नको मामा खरंच आम्ही निघतो आता नाहीतर रात्र होईल पोहचायला”…………अवनी
“असं म्हणताय ठीक आहे, मग साहिल सोडेल तुम्हाला स्टँडला”…………निखीलचे मामा
“नको मामा उगाच त्याला त्रास तसही आम्ही सगळे सोबत आहोत तर आम्ही जातो “…………रोहन
सगळे निखील आणि आंटीना सांगून बाहेर पडले.इराने निखीलकडे पाहिलं ही नाही ती काहीच न बोलता रिक्षात बसली,
रस्त्याने जाताना कुणीच कुणाशी बोलत नव्हतं थोड्यावेळापूर्वी काय घडलं याचाच सर्वजण विचार करत होते.इरा पूर्ण प्रवासात शांत बसून होती ,तिला काय आणि कसं समजवायच हेच सुचत नसल्याने बाकीचे ही गप्प बसले,सगळे न बोलताच पुण्यात पोहचले,अवणीने इराला घरी सोडलं आईशी थोडस बोलून ती बेडरूम मध्ये गेली आणि स्वतःला बेडवर झोकुन दिलं………..
(पुढं काय होणार?इरा आणि निखीलची सोबत एवढीच होती का ?पाहुया पुढच्या भागात)
****************
(हा भाग कसा वाटला नक्की सांगा,तुमच्या एका कमेंट मुळे लिहायला अजून उत्साह येतो तर फक्त वाचू नका तो भाग कसा वाटला हे ही सांगत जा plz आवडला तर आवडला म्हणून सांगा नाही आवडला तर नाही आवडला म्हणून सांगा तुमच्या कमेंट्स बहुमूल्य आहेत)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.