बंध प्रेमाचे 13

Written by

निखिलच्या घरून सगळे निघून गेल्यानंतर निखीलही काहीही न बोलता त्याच्या रूममध्ये निघून गेला.
“हा असा का निघून गेला”……………निखीलचे मामा
“अरे आपण अस अचानक सांगितलं ना त्याला त्यामुळे थोडा गोंधळला असेल मी बोलते नंतर त्याच्याशी”………..निखीलची मम्मा
“हो नीट बोलुन घे त्याच्याशी,रश्मी माझ्या शब्दाबाहेर नाही पण जर निखीलचा गोंधळ झाला असेल तर आताच समजावून सांगा त्याला”………..निखीलचे मामा
“अरे आपण रश्मीला ही काहीच नाही विचारलं,रश्मी तुला काही प्रॉब्लेम नाही ना”?……………निखीलची मम्मा
“आत्तु एगदा निखीलशी बोलून घे,आजपर्यंत आम्ही दोघांनीही कधीच असा विचार नव्हता केला त्यामुळे जरी तो नाही बोलला तरी मला फारसा फरक नाही पडत”………..रश्मी
“तुला पडत नसेल पण मला पडतो”…………निखीलचे मामा
“मला वाटत ती बरोबर बोलतिये एगदा या दोघांना बोलून घेऊ दे”…………….निखीलचे डॅड
“आता अजून काय बोलायचं,आता तुम्ही माघार घेऊ शकत नाही निखिलला कसा तयार करायचा हे तुम्ही बघा,निघतो आम्ही चला रश्मी साहिल”………………निखीलचे मामा
“अरे ते दोघे राहुदेत ना अजून”……….निखीलची मम्मा
“नको बास झालं खूप दिवस राहिले ,बॅग घेऊन या तुमच्या”…….निखीलचे मामा त्या दोघांकडे पाहत बोलले.
साहिल आणि रश्मी निखिलला न सांगताच बाहेर पडले ते गेले तसं निखीलची मम्मा निखिलच्या रूममध्ये गेली.तिच्यापाठोपाठ त्याचे डॅडही गेले.निखील डोळे मिटून शांत बसला होता.
“निखील मला बोलायचंय जरा तुझ्याशी”………निखीलची मम्मा
“बोल,अजून काही आहे का शिल्लक😡”……निखील आपला राग कंट्रोल करत बोलला.
“हे बघ, मला कळतंय हे मी तुला अधिच सांगायला हवं होतं असं तुझ्या मित्रांच्या समोर अचानक सांगणं जरा चुकलंच आमचं”…………निखीलची मम्मा
“प्रश्न हा नाहींचये की तुम्ही माझ्या फ्रेंड्स समोर हे सांगितलंत, मुळात तु असा शब्द देऊच कसा शकतेस?आणि आपण काय राजमहाराजांच्या काळात जगतोय का की दिलेला शब्द पळलाच पाहिजे?”…………..निखील
“मी तुझ्या चांगल्यासाठीच केलं हे मुळात रश्मीला तु चांगलच ओळ्खतोस सुंदर आहे,हुशार आहे आणि मेन म्हणजे तुमचं दोघांच खूप छान पटत, छान फ्रेंड आहात तुम्ही एकमेकांचे”…………निखीलची मम्मा
“ती माझी फक्त फ्रेंड आहे ,तिचा लाईफ पार्टनर म्हणून कधी विचारच नाही केला मी”………..निखील
“मग आता कर ना विचार,मी काय उद्या लग्न करायला नाही सांगत तूला “…………निखीलची मम्मा
“मला नाही करायचा विचार,मुळात मला तिच्याशी लग्नच नाही करायचं तु तसं सांग मामांना”…………निखील
“मला वाटत जर निखिलला रश्मी पसंत नाही तर आपण फोर्स नको करायला त्याला, मघाशी मी तुम्हा बहीण-भावाच्या मध्ये काही बोललो नाही पण तुम्ही दोघेही चुकताय फक्त तुमच्या शब्दासाठी तुम्ही त्यांचं आयुष्य पणाला लावणं बरोबर नाही ,मी निखीलचा डॅड म्हणून तुला सांगतोय निखील जो काही डिसीजन घेईल त्यात मी त्याच्यासोबत आहे नेहमी”……निखीलचे डॅड त्याच्या मम्मा कडे पाहत बोलले.
“अहो पण ,आता असं अचानक ऐनवेळी शब्द फिरवन म्हणजे…दादा काय म्हणेल?”…………..निखीलची मम्मा
“मम्मा तु जसा शब्द दिलायस तसा मी ही कुणालातरी शब्द दिलाय आयुष्यभर साथ देण्याचा,जसं तु तुझा शब्द मोडू शकत नाहीस तसं मी ही माझा शब्द नाही मोडु शकत”………..निखील
“निखील जरा कळेल अस बोल,तु कसला शब्द आणि कुणाला दिलाय”……….निखीलची मम्मा
“मम्मा स्पष्टच सांगतो,इरा,भेटलीयेस ना तु तिला?तर तिचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे तिला वचन दिलय मी आयुष्यभर साथ देण्याचं आणि तिच्याशिवाय लाईफ पार्टनर म्हणून मी कुणाचाच विचार करू शकत नाही”………….….निखील
“काय? तुझ इरावर प्रेम आहे?तु त्या मुलीसाठी माझ्याशी भांडतोयस?अशी किती ओळख आहे तुमची जे तिला दिलेल्या वचनापुढे तुला माझा शब्दही मोठा नाही”…………निखीलची मम्मा
“मी तुझ्याशी भांडत नाहींचये,मी फक्त तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी तिच्याशिवाय कुठल्याच मुलीचा विचार नाही करू शकत”………….निखील
“तुला कळतंय तरी का तु काय बोलतोएस ते? तु अजून लहान आहेस, प्रेम आणि आकर्षण यातला फरक तरी कळतो का तुला”………….निखीलची मम्मा
“अगं आता थोड्यावेळापूर्वी माझं लग्न ठरवायला निघालेला तुम्ही आणि आता म्हणतेस मी लहान आहे,बरं मला नसेल कळत प्रेम आणि आकर्षण यातला फरक पण रश्मीबद्दल मला या दोन्हींमधील काहीच वाटत नाही त्याच काय?”…………….निखील
“मला जे बोलायचं होत ते मी बोललीये, तुला रश्मीशीच लग्न करावं लागेल हे नक्की”……………निखीलची मम्मा
“हा तुझा फायनल डिसीजन आहे?”…………निखील
“हो हाच माझा फायनल डिसीजन आहे”…………..निखीलची मम्मा
“तुम्ही दोघेही जरा शांत व्हा आपण निवांत बोलू याविषयावर”……….निखीलचे डॅड
“नाही डॅड,जर माझ्या आयुष्यात इरा माझी लाईफ पार्टनर म्हणून येणार नसेल तर कुणीच येणार नाही हे नक्की  हा माझा फायनल डिसीजन आहे आणि आपण आणखी दोन वर्षांनी जरी याविषयावर बोललो तरी माझा डिसीजन बदलणार नाही”……म्हणत निखील बाहेर पडला.
“हे बघ तु उगाच त्याला फोर्स नको करू आता तो लहान नाहीये त्याचे डिसीजन त्याला घेऊ दे”…………निखीलचे डॅड
“अजिबात नाही,मी त्याला रश्मीशी लग्न करायला तयार करेन, तुम्ही यात लक्ष नका घालु मी माझ्या पद्धतीने हँडल करते”………………निखीलची मम्मा
बराच उशिरा निखील घरी आला,इराने त्याला काहीच कॉल केला नव्हता किंवा त्याच्या फ्रँड्स नि ही केला नाही,आधी ते दोघे बोलू देत म्हणून ते शांत बसले.
इकडे इराने रडून रडून स्वतःचे हाल करून घेतले होते.निखीलही इराला काय सांगायचं हा विचार करून अस्वस्थ झाला होता शेवटी काहीश्या निर्धाराने त्याने इराला कॉल केला,पहिल्या रिंगमध्येच इराने कॉल उचलला,
“काय मॅडम झालं की नाही रडून☺️”…………निखील
“तुला कुणी सांगितलं मी रडतीये”………….इरा
“अगं इकडे साताऱ्यात पूर आलाय त्यामुळे कळलं मला☺️”……..निखील वातावरण हलकं करण्यासाठी बोलला.
“इकडे माझा जीव जायची वेळ आलीये आणि तुला मस्करी सुचतीये😡”………..इरा चिडतच बोलली
“एवढं जीव जाण्यासारखं काय झालंय?मला ही कळूदे”………….निखील
“एवढं सगळं झालं तरी तु मलाच विचारतोय काय झालं म्हणून?”………….इरा
“इरा तु नको टेन्शन घेऊ,सगळं ठीक आहे☺️”………….निखील
“खरंच निखील?पण तुझं आणि रश्मीच”…………….इरा
“तुझा माझ्यावर विश्वास आहे ना”…………निखिलने तिला मधेच थांबवत विचारले.
“स्वतःपेक्षा ज्यास्त☺️”………….इरा
“मग झालं तर ,मी सगळं ठीक करेन, तु फक्त एकच लक्षात ठेव निखील फक्त तुझा आहे☺️”…………..निखील
“ते माहितेय मला तो फक्त माझाच आहे,पण तुझ्या घरच्यांना दुखावून आपण काहीच नाही करायचंय”………..इरा
“हो ग तु नको इतकं टेन्शन घेऊ, टेन्शन घेण्याएवढं काही नाही झालं ओके☺️”…………निखील
“निखील नक्की ना रे😢”…………..इरा
“हो ग माझी वेडु, आणि मला भांडणारी इरा आवडते बरं का ही रडकी इरा नको बाबा मला😊”…………..निखील
“I Love You निखील, तुला कोणत्याही परिस्थितीत नाही गमवायचं मला,मी विचार पण नाही करू शकत असं काही झालं तर मी काय करेन😢”………..इरा
“तु विचार पण नको करू कारण मी या जन्मी तरी तुला सोडणार नाही☺️”………….निखील
“अच्छा बच्चू”……………..इरा
“इरा,
तु सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटत,
उनाड मोकळं,
एक रान वाटत,
सदैव मनात जपलेल,
पिंपळपान वाटत,
कधी बेधुंद,
कधी बेभान वाटत,
खरंच,
तु सोबत असताना,
आयुष्य खूप छान वाटत☺️☺️………निखील
“कुठून सुचत रे तुला इतकं छान “………….इरा
“तुझ्याशी बोलायला लागलो ना की सुचत ,इरा तुझ्याशिवाय कसा राहीन ग मी,म्हणजे अगदी दोन-तीन महिन्यांपूर्वी प्रेम म्हणजे निव्वळ रिकामटेकडे उदयोग वाटायचे मला आणि आज बघ मीच प्रेमात पडलोय,पडलोय कसला जवळ जवळ अपटलोयच☺️”……………..निखील
“हो का?बरं प्रेमवीर झोपा आता वाजलेत किती बघा त्यात दिवसभर इतकं काही घडलंय जरा मेंदूला रेस्ट दे त्या☺️”………….इरा
“तुझ्याशी बोललो ना की सगळा ताण नाहीसा होतो माझा त्यासाठी रेस्टची काही गरज नाही☺️”…………निखील
“बरं एवढं नका उतू घालवू करपेल ते☺️,झोप आता गपचुप मी ही झोपते बाय “………..इरा
“तु ना ,भावनांची किंमतच नाही माझ्या, ठीक आहे बाय😏”………….निखील
“नौटंकी😊”…………….म्हणत तिन फोन ठेवला.
“सॉरी इरा आता सगळं सांगून  टेन्शन नव्हतं द्यायचं तुला ,मी प्रयत्न करेन सगळं नीट करण्याचा “निखील फोनकडे पाहत बोलला.
इराने ही लगेच अवनीला कॉल करून सगळं ओके असल्याचं सांगितलं सगळेच टेन्शन मध्ये होते सगळ ठीक आहे म्हंटल्यावर त्यांना ही आनंद झाला.
निखील सकाळी फ्रेश होऊन खाली आला घरात तणावपूर्वक शांतता होती .त्याची मम्मा जेवढ्यास तेवढं बोलत होती निखील ही ज्यास्त बोलला नाही तिचा राग शांत झाला की बोलू अस म्हणत तो ही गप्प राहिला, अश्यातच 10-12 दिवस गेले,या दिवसात निखिलने मम्माशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या.
एक दिवस इराने निखिलला कॉल केला तो फोन हॉल मधेच विसरला होता ,निखीलची मम्मा हॉलमध्येच होती इराचा कॉल बघून त्यांनी रिसिव्ह केला,
“हॅलो निखील,कधीची कॉल करतीये तुला”……….इरा
“अगं मी त्याची मम्मा बोलतीये,तो फोन घरीच विसरून बाहेर गेलाय कुठतरी मी सांगते त्याला तुझा कॉल आल्याच”……….निखीलची मम्मा
“सॉरी आंटी मला वाटलं निखील आहे,कश्या आहात तुम्ही☺️”………इरा
“मी छान आहे,खरं तर मला बोलायचं होत तुझ्याशी पण तुझा नंबर नव्हता माझ्याकडे”……….निखीलची मम्मा
“बोला ना आंटी”………..इरा भीतभितच बोलली
“अस फोनवर नाही आणखी दोन दिवसांनी मी पुण्यात येणार आहे तेंव्हा भेटून बोलु, चालेल ना तुला?”………….निखीलची मम्मा
“हो चालेल ना”…………इरा
“बरं मी तुला कॉल करते आणि सांगते कुठं भेटायचं ते पण निखिलला यातलं काही सांगू नको हे आपल्या दोघीतच राहिल”…………निखीलची मम्मा
“हो नाही सांगणार त्याला काही”………इरा
“ओके चल ठेवते फोन”……………निखीलची मम्मा
“हो हो चालेल “………..इरा
“आंटीना काय बोलायच असेल माझ्याशी?निखिलला ही सांगू नको बोलल्या?काही सिरीयस असेल का?अवनीला सांगते याबद्दल”……….म्हणत तिने अवनीला कॉल केला,
“हॅलो अवनी,एक प्रॉब्लेम झालाय यार”……….इरा
“काय ग,कायम तुझ्याच लाईफ मध्ये काही न काही सुरू असत त्या प्रॉब्लेम्स ना पण आवडतेस वाटत तु😂😂”………अवनी
“अवनी भंकस नको करू,एकतर टेन्शन आलय मला इथं”………..इरा
“बरं बोल काय झालंय एवढं सिरीयस व्हायला”………….अवनी
“मी निखिलला कॉल केला होता त्याच्या मम्माने उचलला”म्हणत त्यांचं काय बोलणं झालं ते सगळं तिला सांगितलं.
“एवढं काय महत्वाचं असेल जे फोनवर नाही सांगता आलं🤔”……………अवनी
“काय माहीत नाही ग,नीट काय सांगितलं नाही त्यांनी म्हणून तर टेन्शन आलंय”………….इरा
“तु नको टेंशन घेऊ जाऊन बघ काय म्हणतात ते”………अवनी
“तु येतेस का माझ्यासोबत”…………..इरा
“मी गावी आहे माहितेय ना तुला नाहीतर आले असते”………..अवनी
“प्लिज ये ना ग प्लिज प्लिज अवनी”……………इरा
“ओके आता एवढी सेंटी नको मारू ,मी येते उद्या पुण्यात बघू तरी काय म्हणतात”…………..अवनी
“thank you 😊”…………इरा
“हम्म ,जाऊदे आता तू नको विचार करू परवाच परवा बघू ओके , चल ठेव आता फोन”………..अवनी
“ओके बाय”…….इरा
नाही म्हंटल तरी इराचे ते दोन दिवस थोडे टेन्शन मधेच गेले,निखिलला तिनं याबद्दल काहीच सांगितलं नाही.
“उद्या शार्प 11 वाजता मागे आपण भेटलो होतो त्या कॅफेमध्ये मला भेट”निखिलच्या मम्माचा हा मेसेज वाचून उगाच तिला भीती वाटली,तिनं अवनीला ही मेसेज करून सकाळी लवकर येण्याबद्दल सांगितलं आणि ती झोपली.
सकाळी पटापट आवरून अवणीबरोबर बाहेर जाऊन येते असं सांगून ती घराबाहेर पडली.
(निखिलच्या मम्माला काय बोलायचं असेल इराशी,पाहुया    पुढच्या भागात)
****************
(हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा,मागच्या भागातील तुमच्या कंमेंट्स, रेटिंग पाहुन खूप आनंद झाला पण जे फक्त वाचून स्टोरी सोडतात त्यांनी plz स्टोरी कशी वाटली ते नक्की सांगा,काहींनी मेसेज सुद्धा केले पण काय प्रॉब्लेम आलाय माहीत नाही मेसेज ओपन च होत नाहीयेत त्यामुळे त्यांना रिप्लाय देऊ शकले नाही त्याबद्दल सॉरी ,जो काही प्रॉब्लेम आलाय तो solve झाल्यानंतर मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन तोपर्यंत समजुन घ्या आणि हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा कारण तुमचा अभिप्राय बहुमुल्य आहे)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.