बंध प्रेमाचे 8

Written by

 

  सकाळी इरा नेहमीप्रमाणे कॉलेजला पोहचली.चेहऱ्यावर दाखवत नसली तरी तिला खूप टेन्शन आल होत.”निखील समोर आला तर तो काय म्हणेल? त्यानं ग्रुप ला सांगितल असेल का काल मी काय बोलले ते?” असा विचार करतच तिची नजर निखिलला शोधत होती.पण सकाळपासून तिला तो कुठेच नाही दिसला.ती एकटिच कॅन्टीन मध्ये बसली होती तितक्यात सगळा ग्रुप तिथे आला .
“इरा एकटीच का बसलीयेस?”………पल्लू
“काही नाही ग सहजच”………..इरा
“काल निखील मागे आला होता तुझ्या,काय झालं नक्की तुम्हा दोघांत?काय बोलला निखील?”………..पल्लू
“आता यांना काय सांगायचं,ही अस विचारतेय म्हणजे निखिलने यांना काही नाही सांगितलंय पण आता काय सांगु?”इरा विचार करत होती.
अवनी कधीपासून तिचं निरीक्षणं करत होती.
“नक्कीच काहीतरी घडलंय त्याशिवाय ही शांत नाही बसणार.”
“अरे का त्रास देताय तिला आणि सांगण्यासारखं काही आसेल तर सांगेल ती”………..अवनी
इराने चमकुन अवणीकडे पहिलं,
“अवनी,अगं सांगण्यासारखं काही नाही तर काय सांगू आणि मी नाही काही ऐकून घेतलं त्याच तिथून निघून गेले”……इरा
“अगं, its ok इरा” म्हणेपर्येंत अवणीचा मोबाईल वाजला तर निखिलचा कॉल होता.
तिला खूप आश्चर्य वाटलं,
“हा मला का कॉल करतोय🤔,एक अर्जंट कॉल आहे आलेच मी म्हणत ती तिथून बाजूला गेली.
“हा निखील बोल ना”………….अवनी
“कुणीकडे आहेस तू आता ?कॉलेज मध्ये?”………निखील
“हो बोल ना काही काम होत?”………..अवनी
“हो ग,मला आता भेटु शकशील का कॉलेज जवळच्या cafe मध्ये?”……….निखील
“निखील काही सिरीयस आहे का?नाही म्हणजे इरा ही आल्यापासून शांत आहे”………….अवनी
“इरा आलीये कॉलेज ला😊?”…………निखील
“हो,का तुम्ही परत भांडला नाहीत ना😓?”………….अवनी
“तु भेट मला सांगतो सगळं, 10 मिनिटात पोहचोय मी कॅफेत”……………….निखील
“ok येते मी by”………….अवनी
अवनी तशीच ग्रुप कडे गेली.
‘gys, माझं जरा काम आहे मी निघते”……..अवनी
“ये तुझं काय काम ग? आणि आम्हाला सांगण्यासारखं नाही काय?”…………पल्लू
“अरे एक frnd आहे स्कूलची ती आलीये इथे जवळ तर जरा भेटून येते”अवणीने थाप मारली.
“चला बाय येते मी”म्हणत ती बाहेर पडली.
ती कॅफेत पोहचली तर निखील ऑलरेडी तिथे बसला होता.
“hi अवनी”………….निखील
“ते hi वगैरे नंतर कर,काय काम आहे ते बोल पटकन”………अवनी
“अगं जरा श्वास तर घे☺️”………………….निखील
“मी कसं बसं गंडवून सगळ्यांना इथे आलीये, तु आणि इरा पुन्हा भांडलात का?”…………अवनी
“अगं मी काय तुला भांडखोर दिसतो का?हा तुझी frnd म्हणत असशील तर तीच भांडत असते😀”…………..निखील
“ये इराला काही बोलायचं नाही हा😡,आणि ती का भांडेल उगाच तुझ्याशी,ती तर”…….आपण ज्यास्तच बोलतोय हे लक्षात येताच अवनी थांबली.
“थांबलीस का अवनी बोल ना,ती तर काय?”………..निखील
“ते सोड तु मला का बोलावलंस ते सांग😓”………..अवनी
“ती तर माझ्यावर प्रेम करते असच म्हनणार होतीस ना😊”……………निखील
“तुला कुणी सांगितलं ,म्हणजे इराने काल”………..अवनी
“हो अवनी इराने काल confess केलं की तिचं माझ्यावर प्रेम आहे”……………निखील
“oo म्हणूनच आज मॅडम एवढ्या शांत आहेत”……..अवनी
“तुला हे सगळं माहीत होतं ना”………..निखील
“हो माहीत होतं पण तिनं प्रॉमिस घेतल होत की कुणालाच काही सांगायचं नाही म्हणून त्यात तु आणि नेहा रेलशनशीप मध्ये आहात याचा खूप त्रास होतोय तिला”……….अवनी
“अगं असं नाहीये काही,मी आणि नेहा नाहींयोत रेलशनशीप मध्ये,माझं तर फक्त आणि फक्त इरावर प्रेम आहे,तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाच कधी विचार नाही केला मी,मान्य आहे आमच्यात खूप गैरसमज झाले तरीही तिला पाहिल्याशिवाय चैन नाही पडत मला☺️”. …………..निखील
अवनी तर भुत पाहिल्यासारखं निखीलकडे पाहत होती🙄
“अशी काय बघतेस☺️”………….निखील
“तु सांगितलंस का हे तिला?”………..अवनी
“नाही अजून”………….निखील
“तरीच ती एवढी टेन्शन मध्ये आहे सांगून टाक ना तिला,मी एक काम करते तिला इथंच बोलावून घेते”……….अवनी
“अगं थांब,सांगायचंय तिला पण इतक्यात नाही माझ्या style ने सांगणारे मी तिला आणि त्यासाठी मला तुझी हेल्प पाहिजे☺️”……………निखील
” ये बस का!इरासाठी काय पण ,तु फक्त सांग के करायचंय”………….अवनी
“सगळ्यात महत्वाचं तुझं तोंड बंद ठेवायचं🤐 यातलं इराला काहीही कळता कामा नये”………..निखील
“ok boss पण क्लू तरी दे काय करणारेस आणि तिला काय आवडत ते तरी माहितीये का तुला?”……..अवनी
“तिला पाणीपुरी खुप आवडते,fvrt कलर रेड,fvrt हिरो शाहरुख खान, fvrt हेरॉईन माधुरी, fvrt प्लेस महाबळेश्वर😊😀” ………….निखील
“नॉट बॅड,तु तर खूपच पुढे गेलास 😂”…………. अवनी
“तु नंतर काय खेचायची ते खेच माझी पण आता ऐक उद्या इराला घेऊन यायची जबाबदारी तुझी”……..……निखील
“ok done, उद्या येते मी तिला घेऊन”………..अवनी
“शार्प 11 am,place मी msg करतो”………..निखील
“ok चल by निघते मी आता”…………अवनी
“अवनी thank you”…………निखील
“अरे thank you उद्या बोल आताच काय😀”……..अवनी
“उद्यासाठी नाही कालच्यासाठी, काल तु बोलली नसती तर कदाचित”………..निखील
“ये गप आता senty नको मारू”त्याला थांबवतच अवनी बोलली,”तुमचं सगळं sort out झालं ना की party दे मला”😊………..अवनी
“हो ग नक्की चला आता निघायचं नाहीतर कुणी तरी पाहिलं”अस म्हणत ते बाहेर पडले.
इकडे इरा घरी आली विचार करतच,
“आज निखील नाही दिसला कॉलेजमध्ये,कॉलेजला आला नाही बहुतेक पण अस कधी करत नाही तो,का आला नसेल?काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना?देवा का विचार करतीये मी एवढा,एवढं ठरवूनही त्याच्यापासून लांब जाता नाही येत.त्यापेक्षा music ऐकते जरा शांत वाटेल म्हणत तिनं fm on केला,rj मनीष ने नेमकं लव्ह song प्ले केलं होतं,
रंग बवऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे,हे नाव ओठी कुणाचे,
का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे…..  मला वेड लागले प्रेमाचे,मला वेड लागले प्रेमाचे …….
“ooo गॉड या fm वाल्यांना पण आपल्या मनातले भाव कसे कळतात काय माहीत “म्हणत तिने fm बंद केला आणि झोपायला गेली.
(निखील आणि अवनी काय प्लान करतील पाहुया नेक्स्ट पार्ट मध्ये)

Article Categories:
प्रेम

Comments are closed.