बलिप्रतिपदा

Written by

आज बलिप्रतिपदेचा दिवस असून बळीराजाचा दिवस म्हणून याची ओळख आहे. शेतकरी राजा मोठ्याथाटात हा सण साजरा करतो. महाराष्ट्रातील सर्वच भागात वेगवेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो.

काही दिवसांपूर्वी आपल्या शेतकरी राजाला बैलपोळ्याच्या सण पाऊस न पडल्यामुळे चारा छावणीवर करण्याची वेळ आली होती. दुष्काळाच्या झळा इतक्या तीव्र होत्या की शेतकऱ्यांचा अवघा संसार त्यात होरपळून निघालं होतं. थोड्याफार पडलेल्या पावसाच्या जीवावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिके घेतली. पिकांवर आलेल्या रोगराईचे संकटे पेलत निसर्गाशी दोन हात करत शेतकरी राजाने कसेबसे पिके सांभाळली.
याच पिकांच्या जीवावर शेतकरी वर्ग कसाबसा आपल्या संसाराचा गाडा ओढत असतो. आपले सणवार साजरे करतो. मात्र यंदाच्या वर्षी निसर्गाच्या मनात नेमकं काय आहे, तेच कळत नाही. मागील आठवड्यात झालेल्या पावसाने सगळं होत्याचं नव्हतं केलं. (© खादीम सय्यद)

अति पावसामुळे शेतातील सोयाबीन,मका,इत्यादी सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामुळे शेतकरीवर्गा पुढं मोठी आर्थिक आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यांच्याकडे होते नव्हते ते तसेच कर्ज उसनवारी करून शेतकरी राजांनी काळ्या आईला अर्पण केले होते. मात्र निसर्गाच्या अस्मानी संकटाने त्याच्यावर घाला घातला आणि ऐन दिवाळीच्या वेळेत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवून नेला. बलिप्रतिपदा सारखा सण ही शेतकरी राजा दुःखात साजरा करत आहे.

सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेणे गरजेचे आहे, अन्यथा जगाचा पोशिंदाच जर उपाशी राहिला तर जगाचं पोट कसं भरणार ?
(© खादीम सय्यद)

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा