#बळ माणुसकीचे#

Written by

 

निसर्गाचा नियम बघा कसा चुकतोय…

जातीपातीच्या नावावर वाटलेला माणुस आपत्तित एकत्र येताय..

ग़रीब-श्रीमंत दोघेही एकाच पंगतीत जेवताय… अजानाच्या आवाजाने चिडणारे लोक आज मस्जितमध्ये झोपताय..

किती सहज  अनुभव येतात ना आपल्या जिवनात..

काल पर्यन्त शिव्या घालणाऱ्या ख़ाकी वर्दिला आज लोक सलाम ठोकताय…

घर,पैसा,सम्पत्ति,दाग़दागीने सगळे पाण्यात डुबताय.. अन्नाच्या प्रतिक्षेत लहान मोठे सगळेच वाट बघताय..

निसर्ग कोपला त्याच कारण लोक ईकडे तिकडे शोधताय…

चुकी तर आपलीच होती पाणी मुरायला ज़मीनच कुठे वाचलवी आहे…

देव शक्ति देवो पुरग्रस्तांना हिच प्रार्थना करतेय…. 

शेवटी उरली फक्त माणुसकी.. जग त्याच्याच बळावर चालताय…

©️अश्विनी दुरगकर.

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा