बाप नावाचा माणुस….

Written by

बाप तो बाप असतो…,

कितीही कणखर, कितीही दणकट..

तरीही मनातून कापसा सारखा मुलायम असतो..

बाप तो बाप असतो…

कळणार असते त्याला होणार तो बाप….

पारावार नाही आनंदाला, अश्रुंना करतो मोकळी ही वाट

अल्लडपणा सोडूनि होतीया जाणीव जबाबदारीची,

आता माझ्यासंगे माझे बाळ ही चालत राही..

कारण बाप तो बाप असतो.. //1//

 

आतुरतेने वाट बघतो नऊ महिण्याची, दिवस तो उजडती…

बाळ पडता हातात..काय करू.. काय नको..साठूनि ठेवी मनात….

आनंदाचे अश्रु वाही घळाघळा..आता माझ्यासंगे माझा लेकरू तो खरा..

आनंदाचा क्षण जगतो तो पुर्णत्वाने…साठवण ही ठेवी तो जन्मोजन्मीची..

कारण बाप तो बाप असतो.. //2//

 

रात्रभर घोरू घोरू झोपणारा…जागा होतो एकाच क्षणात

काय करी माझा बाळ म्हणत क्षणोक्षणी त्याला पाहणारा..

गोड निरागस चेहरा बघुनी..चित्त होऊनि प्रसन्न ,

बाळासंगे प्रत्येक जगणे, जगुनि तो उदात्तेने..

बाळासंगे बाळ होऊनि…खेळतो तो आनंदाने..

कारण बाप तो बाप असतो.. //3//

 

चित्रपटाच्या तिकीटासाठी कधीही रांगेत न लागता ब्लॅक मध्ये तिकीटे काढणारा

बाळाच्या ॲडमीशनकरीता घंटो लाईनित उभा असणारा..

पहाटे कधी न उठणारा..रात्रभर घारघुर झोपणारा..

पण मुलांना पहाटे शाळेसाठी उठविणारा..

कारण बाप तो बाप असतो.. //4//

 

शर्टाच्या आतमध्ये स्वत:च्या ईनर ला असतात दहा ठिगळे..

पण मुलांना घेऊनि देतो नवनविन वस्त्रे

उरले सुरले खाऊनि..दोन पैसे वाचविणारा..

पण मुलांना खाऊला पैसे देणारा..

कारण बाप तो बाप असतो..//5//

 

बघता बघता मुले होतात मोठी..आणि बाप म्हातारा..तरीही काहीतरी खाऊन घे म्हणारा तो बाप असतो..

 

सरिता खरबडे पुनसे

Article Categories:
कविता

Comments are closed.